मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर अन्येष्वथकृता मैत्री यावदर्थविंडबनम् । पुंभिः स्त्रीषु कृता यद्वत्सुमनः स्विव षट्पदैः ॥६॥अन्यत्र कार्या पुरती जनीं । मैत्री सोंगसंपादनी । अर्थ संपलिया परतोनी । पुन्हा हुंकोनि न पाहती ॥५४॥तैसीच कां जारपुरुषांहीं । मित्री कीजे स्त्रियांच्या ठाईं । जैसा भ्रमर सुमनसोई । गंधलोभें लुडबुडी ॥५५॥चटुलचाटुवदनें कपटी । कामप्रलोभ उपजवूनि पोटीं । कार्यापुरत्या मधुर गोठी । त्यजिती शेवटीं हळहळित ॥५६॥सुमन सुके सुगंध उपखे । तेव्हां पूर्वील प्रेम फिकें परतोनि शब्द न वदे मुखें । स्नेह लटिकें कार्यार्थ ॥५७॥नवप्रसूनीं आमोदभरें । पूर्विलाहूनि प्रेमादरें । लंपट होतां पहिलें विसर । स्नेह न स्मरे रतिभुक्त ॥५८॥एवं अर्थसंपादना । पर्यंत मैत्रीलाघव नाना । कार्याअंतीं समान तृणा । मानी ललना जार नर ॥५९॥सुकल्या सुमनीं न फिरे भ्रमर । तैसाचि भोगूनि जाय जार । रतिपूर्वील स्नेहादूर । विसरे सत्वर कृतघ्नवत ॥६०॥ एवं मातापितरां आप्तांविणें । कार्यापुरती मैत्री करणें । कार्य संपल्या ओसंडणें । कोणा कोणें ज्या परी ॥६१॥निःस्वं त्यजंति गणिका अकल्पं नृपतिं प्रजाः । अधीतविद्या आचार्यमृत्विजो दत्तदक्षिणम् ॥७॥स्व म्हणिजे धनाचें नाम । सधन देखोनि नर सकाम । गणिका वाढवी स्नेहसंभ्रम । सुरतप्रेम बहु लावी ॥६२॥धन देवोनि निःस्व होये । तैं त्या गणिका लोटी पायें । पूर्वस्नेहाची न रखे सोय । रमती होय आणिकेंसीं ॥६३॥कीं अष्टांगप्रकृतिहीन राजा । अक्षम शासन रक्षणकाजा । देखोनि त्यागिती समस्त प्रजा । प्रतापपुंजा आश्रयिती ॥६४॥कीं विद्या घेतलिया गुरूतें । छात्र त्यजोनि जाती परौते । कीं पालाश पत्र हातें । भोजनांतीं त्यागिती ॥६५॥कीं यज्ञसिद्धि सुकृतग्रहणा । ऋत्विजां दिधलिया दक्षिणा । ते मग त्यजिती यजमाना । अन्य याजना क्षण घेती ॥६६॥खगा वीतफलं वृक्षं भुक्त्वा चातिथयो गृहम् । दग्धं मृगास्तथाऽरण्यं जारो भुक्त्वा रतां स्त्रियम् ॥८॥कीं जाली देखोनि फळांची झाडी । पक्षिवर्ग द्रुमातें सांडी । कीं जेविल्यानंतरें न धरी गोडी । अतिथि सोडी भुक्तगृहा ॥६७॥कीं दावानळें जळालें वन । त्यागूनि जाती मृगांचे गण । तैसेचि जारपुरुष निर्घृण । जाती सांडून कुलटांतें ॥६८॥इत्यादि निरूपणाचा हाचि अर्थ । आपुला जार श्रीकृष्णनाथ । तेणें भोगोनि रतिकार्यार्थ । निष्ठुर चित्त केलें कीं ॥६९॥शुक म्हणे गा कुरुवैडूर्या । ऐसी गोपींची सप्रेम चर्या । दुर्लभ योगियां जपियां तपियां । मुख्यज्ञानियां आदिकरूनी ॥७०॥इति गोप्यो हि गोविंदे गतवाक्कायमानसाः । कृष्णदूते व्रजं याते उद्धवे त्यक्तलौकिकाः ॥९॥उद्धव श्रीकृष्णाचा दूत । व्रजा पातला असतां तेथ । गोपी मिळोनियां समस । वदल्या संकेत तो कथिला ॥७१॥उद्धव व्रजा आला असतां । गोपी जाल्या लौकिकरहिता । कायवाड्मानसें अनंता । जाल्या निर्रता तन्निष्ठा ॥७२॥कृष्णीं वेधल्या वाड्मन । लौकिक व्यवहार स्मरे कोण । निःशंक गाती कृष्णाचरण । तें निरूपण अवधारीं ॥७३॥गायंत्यः प्रियकर्माणि रुदत्यश्च गतह्रियः । तस्य संस्मृत्य संस्मृत्य यानि कैशोरबाल्ययोः ॥१०॥धन सुत वनिता वृत्ति क्षेत्र । प्रियतम मानिती हें सर्वत्र । ज्या कारणास्तव तें स्वगात्र । प्रेमपात्र सर्वांसी ॥७४॥तया शरीराचाही उबग । रोग वियोग कां विपत्तियोग । कीं वार्धक्यें करणवर्ग । विकळ व्यंग जालिया ॥७५॥शरीराचाही उबग धरी । परी क्षुधेतृषेच्या अवसरीं । प्राणवर्गाचें रक्षण करी । प्रीति भारी प्राणांची ॥७६॥त्या प्राणांचें आकर्षण । करूनि करिती आत्मसाधन । तो आत्माही द्विविध भिन्न । जीव आणि परमात्मा ॥७७॥जिवाचिये प्रीतीस्तव । इहलोकींचे विषय सर्व । त्यागूनि इच्छिती दिविवैभव । इंद्रादिदेव हुआवया ॥७८॥पुण्यक्षयीं अधःपतन । होतां वृथाचि दिविसाधन । तेव्हां विरक्त होऊनि पूर्ण । आत्मनिर्वाण संपादि ॥७९॥परमात्मयाचें अपरोक्ष ज्ञान । आत्मनिष्ठ ते सभाग्ये पूर्ण । निष्काम स्वधर्म विहिताचरण । शमदमसंपन्न विरक्त ॥८०॥ऐसे निष्काम स्वधर्मशील । सांख्यीं योगीं अभ्यासबळ । लाहोनि सच्चिदानंद केवळ । लाहती निर्मळ आत्मत्व ॥८१॥तो हा जगत्प्रियतम कृष्ण । सगुण गोपीप्रियकर प्राण । त्या प्रियाचें कर्माचरण । गाती विसरोन जनलज्जा ॥८२॥कोमलबाल्यलीलाचरणें । रिम्गण निवेश अन्वेषणें । संस्तीभनें आलिंगनें । निरीक्षणें आठविती ॥८३॥श्रीकृष्णाची राजस गोडी । कृष्ण सविलास डोळे मोडी । कृष्णचुंबनसुखाची घडी । करी बापुडी भवस्वर्गा ॥८४॥पूतना शकट तृणावर्त । जृंभनमृद्भक्षणवृत्तांत । विश्व दाविलें वदनाआंत । इत्यादि समस्त आठविती ॥८५॥यमलार्जुनाचें उन्मूलन । कृष्णानिमित्त वृंदावन । सेविलें तेथील लीलाचरण । निःशंक होऊन त्या गाती ॥८६॥वत्सासुराचें निबर्हण । तैसेंचि बकासुरमर्दन । अघासुरा सायुज्यदान । तें आख्यान आठविती ॥८७॥धेनुक मर्दिला तालविपिनीं । कालिय नाथिला यमुनाजीवनीं । मुखें प्राशिला दावाग्नि । जळतां वनीं व्रजवासी ॥८८॥भांडीरवनीं प्रलंब वधिला । मुंजारण्यीं वणवा गिळिला । प्रावृट्शरत्काळलीला । विविध क्रीडला तें स्मरती ॥८९॥मधुवन तालवन कुमुदवन । बेलभांडीरबहुळवन । ईषिकाविपिन कामवन । क्षुद्रवन नीपादि ॥९०॥ब्रृहद्वन वृंदावन । एवं द्वादशवनक्रीडन । द्वादशोपवनविहारपूर्ण । गोवर्धनादि आठविती ॥९१॥धातुगुंजाप्रवालमिश्र । बर्हप्रसूनें अळंकार । रामकृष्णादि गोपभार । विहारपर त्या स्मरती ॥९२॥वेणुवादनें सप्तस्वरीं । अमृतोपम ते रसमाधुरी । प्राणिमात्रां वेध करी । स्मरोनि अंतरीं झुरताती ॥९३॥त्रिभंगीं देहुडें ठाण ठकार । नीलोत्पलदलकोमल गात्र । सविलास अपांग व्यंकट नेत्र । ध्यान विचित्र आठविती ॥९४॥वेणुवादनें वेधिलीं मनें । तैं जियें मिथा केलीं कथनें । मानस मोहिलें मनमोहनें । अंतःकरणें तें स्मरती ॥९५॥कुरवंडूनियां मन्मथकोटी । कृष्णलावण्य स्मरती पोटीं । त्याची प्राप्ति व्हावयासाठीं । भजती गोरटी कात्यायनी ॥९६॥तदर्थ व्रतस्था हेमंतीं । प्रातःस्नाना यमुने जाती । कात्यायनी तुष्टली भक्ती । हरि व्रतांतीं भेटला ॥९७॥वस्त्रें घेऊनि कदंबावरी । गेला कौतुकें मुरारी । सव्रीड बैसोनि जळांतरीं । विनविला हरि तें स्मरती ॥९८॥कृष्णआज्ञा मानूनि साच । नग्न सलज्ज तनुसंकोच । नमस्कारिला चंडवर्च । निष्प्रपंच निगमात्मा ॥९९॥ते काळींचीं मधुरोत्तरें । आश्वासिलें वरदकरें । तें त्तें स्मरतां अभ्यंरें । नयनीं पाझरे बाष्पांबु ॥१००॥नंदें करितां वासवमख । कृष्णें निषेधिला तो सदोष । गोवर्धनार्चा क्रतु सम्यक । करितां दुःख अमरेंद्रा ॥१॥विद्युत्पात वृष्टि वारें । जलोपलादि वर्षतां इंद्रें । तैं गोवर्धन धरिला करें । ऐसीं चरित्रें आठविती ॥२॥इंद्रें कृष्णा अभिषेक केला । स्नान करितां नंद नेला । कृष्ण वरुणलोका गेला । नंद आणिला तें स्मरती ॥३॥वैकुंठदर्शनें गोपांप्रति । यमुनेमाजि नेऊनि निगुती । दाविता जाला कमलापति । तें त्या गाती व्रजललना ॥४॥गोपीकंदर्पोद्रेक । हृदयीं जाणूनि यदुकुलतिलक । वेणुवादन रासरसिक । वनीं सम्यक आदरितां ॥१०५॥विह्वळ जाल्या बल्लवललना । विस्मृतप्रपंचकर्माचरणा । अस्ताव्यस्तवस्त्राभरणा । गेल्या विजना त्या स्मरती ॥६॥कृष्णें धर्मप्रवृत्तिबोधें । बोधितां अभीष्टप्राप्तिरोधें । म्हणोनि श्रीकृष्णचरणांवरविंदें । धरितां मुकुंदें रमविल्या ॥७॥ते या सुरतरसिका गोठी । आठवतां त्या विह्वळ पोटीं । निर्लज्ज रुदती गाती वोठीं । होती कष्टी हरिविरहें ॥८॥स्वलावण्या भुलला हरि । ऐसा गर्व अभ्यंतरीं । उठतां अंतरला मुरारि । मग कांतारीं हुडकिती ॥९॥ तें त्तें स्मरती अन्वेषण । पुन्हा पुलिनीं हरियशोगान । करितां प्रकटला भगवान । चिद्रसघन तो स्मरती ॥११०॥तया सुखासि नाहीं पार । त्याहूनि रासरससागर । स्वयें जाला नर्तनपर । मंडलाकार मुग्धांसीं ॥११॥स्थळजळक्रीडा व्यवाय विविधा । तें तें विविच्य स्मरती मुग्धा । निर्लज्ज रुदती वदती शब्दा । जनविरुद्धा न स्मरती ॥१२॥शंखचूडाचा मौळच्छेद । स्मरती अरिष्टासुराचा वध । अक्रूरागमनीं पावल्या खेद । तदनुवाद त्या गाती ॥१३॥ऐशीं कैशोरबाल्यकर्में । स्मरता गोपीमानस विरमे । गाती रुदती वदती मर्में । मानुषधर्में सांडवल्या ॥१४॥विरहावस्थेमाजिवडिया । तत्संकल्पें देती बुडिया । वदती अन्योक्ति सवडिया । सप्रेम वेडिया तद्वेधें ॥११५॥त्यांचिया व्यंग्योक्तींची परी । कुरुवरवरिष्ठा अवधारीं । भ्रमरगीतव्याख्यानकुसरी । श्रोतीं चतुरीं परिसिजे ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP