मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर आत्मा ज्ञानमयः शुद्धो व्यतिरिक्तोऽगुणान्वयः । सुषुप्तिस्वप्नजाग्रद्भिर्मायावृत्तिभिरीयते ॥३१॥शुद्ध बुद्ध नित्य मुक्त । निष्प्रपंच विकाररहित । त्यासि भूतगुणादि रूपत्व प्राप्त । हें अघटित सर्वत्र ॥१२॥गुणी असोनि गुणातीत । कैसा म्हणाल शुद्ध शाश्वत । तरी अगुणान्वयपदें ख्यात । गुणीं न मिळत गुणसाक्षी ॥१३॥ज्ञातृत्व अमळत्व संतोष । इत्यादि सत्वगुणोत्कर्ष । प्रकाशूनि स्वकाश । निःसंग उदास अस्पृष्ट ॥१४॥रागतृष्णाप्रवृत्तिप्रचुर । इत्यादि राजस गुणविकार । आत्मसत्तायोगें सधर । आत्मा अविकार अनुस्यूत ॥४१५॥प्रमाद अबोध जडता तम । इत्यादि तामास गुणसंभ्रम । वातशीतोष्णामाजि व्योम । दावी संगम असंगत्वें ॥१६॥एवं गुणान्वयव्यतिरिक्त । ज्ञानस्वरूप आत्मा नित्य । म्हणाल अवस्थाप्रत्यय बहुत । तरी तो वृत्तांत अवधारा ॥१७॥ज्ञानस्वरूप स्वसंवेत्ता । तरी प्राज्ञतैजसविश्वात्मा । इत्यादि प्रत्ययें पृथगवस्था । तैं स्वसंवेत्तृता केंवि घडें ॥१८॥इये शंकेच्या परिहारा । ऐका साध्वी हो विचारा । मायाकार्यमनोविकाराम । माजि उभारा पृथक्त्वा ॥१९॥मंचकशिबिकाअश्वयानीं । एकचि भूप पृथगासनीं । सेवितां तद्गत सेवकजनीं । पृथगभिमानी प्रत्यय ये ॥४२०॥कीं बाल्य प्रागल्भ्य वार्धक्य । त्रिधा अनुभविता पुरुष एक । पृथक् प्रत्यय ते वार्ष्मिक । नहोनि नावेक प्रकाशी ॥२१॥एवं आत्मा अवस्थाभेद । मायागुणकार्ययोगें विशद । प्रकाशी तो प्रत्ययानुवाद । येर्हवीं स्वतःसिद्ध शुद्धात्मा ॥२२॥मुख्य बिंब जैं गगनीं लोपे । न लोपितां तैं प्रतिबिंब हारपे । तद्गतविकारचांचल्यकंपें । केंवि साटोपें वसिजेल तैं ॥२३॥तैसें निरोधिलिया मन । विकार राहती तैं कोठून । तें व्यतिरेकें प्रतिपादन । दृष्टांत भिडवून दार्ष्टांती ॥२४॥येनेंद्रियार्थान्ध्यायेत मृंषा स्वप्नवदुत्थितः । तन्निरुंध्यादिंद्रियाणि विनिद्रः प्रत्यपद्यत ॥३२॥स्वप्नामाजि लटिका विषय । मनोविकारजनित होय । तैजस आत्मा सत्प्रत्यय । तद्विपर्यय जागलिया ॥४२५॥जागृतिबोधें स्वप्न रोधे । बाधितवृत्तांतप्रत्यय नांदे । तद्वद्दीशिकोपनिषद्बोधें । विवर्त रोधे मिथ्यात्वें ॥२६॥परंतु निद्रोत्थिता जैसें । लटिकें गतस्वप्न स्मरणीं गवसे । बाधितविषया मनोध्यासें । साचासरिसें अनुभविती ॥२७॥अनिद्र अजड निरालस्य । तथापि उरे विषयाध्यास । आवरूं न शके तो ज्ञानास । भर्जितसस्य जेंवि नुगवे ॥२८॥बाधितविषयाची अनुभूति । शरीरयात्रामात्रवृत्ति । परंतु निजात्मवंतांप्रति । आत्मप्रतीति अविरुद्ध ॥२९॥तो तेव्हांचि कृतार्थ जाला । जैं स्वात्मप्रत्यय बोधो आला । तो हा निःसंशय दादुला । शुक बोलिला कीं हरि हो ॥४३०॥एतदंतः समाम्नायो योगः सांख्यं मनीषिणाम् । त्यागस्तपो दमः सत्यं समुद्रांता इवापगाः ॥३३॥तोचि मनोनिरोध कैसा । जेणें अपवाद दृश्याभासा । अंतःशब्दार्थें हा परिसा । पूर्णाभ्यासापर्यंत ॥३१॥मनोनिरोधाचें फळ । अभ्याससमाप्तिपर्यंत अटळ । सम्यक आम्नाय वेदवित्कुशळ । जिज्ञास्य केवळ अवगमी तो ॥३२॥ब्र्रह्मजिज्ञास्य ब्रह्मनिष्ठा । ब्रह्मप्राप्तीसि अनेक वाटा । म्हणसी तरी त्या एकवटा । होती चोहटा प्राप्तीच्या ॥३३॥मनोनिरोध शेवटवरी । सम्यक म्हणिजे बरव्या परी । कोण्या एक्या मार्गें तर्ही । दृढनिर्द्धारें सुखदानी ॥३४॥तेचि ऐका मार्गभेद । अष्टांगदियोग विशद । आत्मानात्म सांख्यबोध । त्याग तो प्रसिद्ध संन्यास ॥४३५॥भवविरागें स्वधर्माचरण । सप्रेम विश्वास भक्ति प्रधान । एतन्निष्ठ तनुशोधन । तपोभिधान त्या म्हणिजे ॥३६॥वासनानाश इंद्रियदमन । दमशब्दाचें हें व्याख्यान । सत्य म्हणिजे समदर्शन । सबाह्य शोधन तें शौच ॥३७॥इत्यादि मार्ग पैं अनेक । परंतु फळप्राप्ति सकळां एक । बहुविध नद्यांचें जेंवि उदक । पावे ऐक्य समुद्रीं ॥३८॥तेंवि आत्मप्राप्तिवेर्ही । मनोनिरोध कोण्हेपरी । जालिया संसृति उदयो न करी । हा निर्धारीं सिद्धांत ॥३९॥ऐसें बोलोनि बल्लवींसीं । पुन्हा उद्धव म्हणे त्यांसी । तुमचें अभिप्रेत मानसीं । त्या गुह्यासि अवधारा ॥४४०॥म्हणाल ब्रह्मविद्येच्या बोधें । आम्हां झकविलें कां मुकुंदें । आमुचीं करपलीं हृदयारविंदें । विरहवेधें कृष्णाच्या ॥४१॥विश्वश्रियेसि भुलवणें । केलें जयाचिया लावण्यें । सनकादि मुक्तां गुणगणपूर्णें । केलीं बंधनें ध्यानमिसें ॥४२॥ज्याच्या कारुण्यें संसृति । भक्ति प्रियतम पुढत पुढती । माजूनि अवतारांची पंक्ति । केली विश्रांति त्रिजगातें ॥४३॥ज्याच्या आस्तिक्यें लटिका भव । साच मानोनि भ्रमले जीव । त्या भवसागरामाजि नाव । तारक नांव पैं ज्याचें ॥४४॥त्या तुज विश्वसुंदरा हरि । आम्ही रतलों रानटा नारी । आतां विरहाच्या जोहरीं । केंवि मुरारि लोटिसी ॥४४५॥आम्ही साहों न शकों विरह । ऐसा तुमचा अभिप्राव । यदर्थीं काय वासुदेव । वदला गौरव तें ऐका ॥४६॥यत्त्वहं भवतीनां वै दूरे वर्ते प्रियो दृशाम् । मनसः सन्निकर्शार्थं मदनुध्यानकाम्यया ॥३४॥ज्या कारणास्तव वियोग तुमसीं । करणें रुचला मम मानसीं । तुम्ही नेणां त्या गुह्यासी । वृथा खेदासि पावतसां ॥४७॥अह्म म्हणिजे मी जो हरि । तुम्हांसि प्रियतम सर्वांपरी । तुमच्या नेत्रांपासूनि दुरी । मधुरापुरी माजि वर्तें ॥४८॥याचें रहस्य ऐसें जाणा । सन्निध असतां घडे अवज्ञा । दूरी प्रेष्ठ तैं सप्रेम ध्याना । कारण माना मानिनी हो ॥४९॥कन्या जाय सासुरवासा । माता भजान होय ध्यासा । खातां पितां घेतां ग्रासा । क्रिया अशेषा तन्निष्ठा ॥४५०॥आणिका आळवी तिचेचि नांवें । दुचितीं उठे उदित खेंवे । तिचें स्वरूप ध्यानीं फावे । कृत्य आठवे तच्चरित ॥५१॥त्याहूनि प्रेष्ठतमाच्या ठायीं । ध्यानें वृत्ति वेधती पाहीं । त्या ध्यानाचें कारण काई । ऐका तेंही हरि सांगे ॥५२॥ध्यानें मनाचें आकर्षण । होतां होय मन उन्मन । वास्तव मत्प्राप्तिकारण । गुह्य संपूर्ण हें उमजा ॥५३॥तिहीं श्लोकीं स्पष्टतर । हें निरूपी मुरलीधर । तुम्ही होऊनि सादर । परिसा समग्र चतुरी हो ॥५४॥यथा दूरचरे प्रेष्ठे मन आविश्य वर्तते । स्त्रीणां च न तथा चेतः सन्निकृष्टेऽक्षगोचरे ॥३५॥पितापुत्र परस्परीं । वियोगें वर्तत असतां दुरी । इतुकी न बाधी त्यां अवसरी । नारी अंतरीं जेंवि झुरती ॥४५५॥अक्षगोचर सन्निकृष्ट । वर्तत असतां प्रियतम प्रेष्ठ । तैसा न वते स्नेहाभीष्ट । हा स्वभाव दुष्ट स्त्रियांचा ॥५६॥जैसा दुरी प्रियतम असतां । तेथूनि उगंड नोहे चित्ता । ध्यानीं मानसीं तन्निष्ठता । अनुभव पुरता न मना का ॥५७॥सामान्य स्त्रियांची हे रीति । ऐका मत्प्रेमाची उक्ति । जेणें निरसे पुनरावृत्ति । कैवल्यप्राप्ति मम विरहें ॥५८॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP