मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर काचिन्मधुकरं दृष्ट्वा ध्यायन्ती कृष्णसंगमम् । प्रियप्रस्थापितं दूतं कल्पायित्वेदमब्रवीत् ॥११॥उद्धवीं देऊनि दौत्यदृष्टि । भ्रमरमिसें व्यंग्यगोष्टी । कृष्णसंगम चिंतूनि पोटीं । बोले गोरटी व्रजललना ॥१७॥कृष्णसंगम ध्यात असतां कोणीएक भ्रमर अवचिता । देखोनि म्हणे गा दूत तत्त्वता । प्राणप्रियें पाठविला ॥१८॥ममांतरींचा विषयशीण । निरसूनि करावया प्रसन्न । मधुकररूपी दूत कल्पून । बोले वचन तें ऐका ॥१९॥गोप्युवाच - मधुप कितवबंधो मा स्पृशांघ्रिं सपत्न्याः कुचविलुलितमालाकुंकुमश्मश्रुभिर्नः । वहतु मधुपतिस्तन्मानिनीनां प्रसादं यदुसदसि विडंब्यं यस्य दूतस्त्वमीदृक् ॥१२॥अरे मधुपा म्हणे ते वधू । केवाळ कपटियाचा तूं बंधु । तुझा स्पर्शही निषिद्धु । आमुचें पद न नमीं तूं ॥१२०॥माझिये प्रसन्नतेलागूनी । माथां ठेवूं पाहसी चरणीं । तरी हे अनर्ह तुमची करणी । आम्हांलागूनि अश्लाघ्य ॥२१॥किमर्थ अश्लाघ्य ऐसें म्हणसी । तरी तूं कृष्णाचा सहवासी । वनमालेच्या आमोदरसीं । सदा लुंटसी त्यासरिसा ॥२२॥कृष्णातुल्य तुझी कांति । हा निश्चय आमुच्या चित्तीं । आजि विपरीत चिह्नावाप्ति । तें मजप्रति जाणविलें ॥२३॥कृष्ण गेला मथुरापुरीं । तेथील नागरा नव सुंदरी । तेहीं भोगिला मुरारि । चातुर्यकुसरीं स्मरलास्यें ॥२४॥कोणें कथिलें तुम्हांपासीं । हें जरी कांहीं आम्हां पुससी । तरी तें तुझिये प्रतीतीसी । साक्षी देसी तूं येथें ॥१२५॥कैसी साक्ष म्हणसी जरी । तरी आमुचे संवतिचिये उरीं । गाढालिंगन देतां हरि । माळा माझारी कुचुंबली ॥२६॥कुंकुम माखलेलं संवतीकुचां । सुमनां लेपलें वनमाळेच्या । तुवां स्वादितां आमोदा तिच्या । लोहींवरुचा स्मश्रूतें ॥२७॥तयावरून कळलें आम्हां । कीं तूं कृष्णदूत दौत्यकामा । विनवावया आलासि आम्हां । पादपद्मा नमूं पाहसी ॥२८॥तरी तूं आतां तेथेंच जाय । त्या संवतीचे वंदीं पाय । त्याचीच प्रसन्नता होय । त्या उपायें विनवीं कां ॥२९॥आमुचे प्रसन्नतेवीण । काय तयासि कारण । जाऊनि त्याचेचि धरीं चरण । करीं प्रसन्न कृष्णा त्या ॥१३०॥कृष्ण त्यांचाचि प्रसाद लाहो । आणि त्यांचाचि हो कां नाहो । यादवसभेचा समुदाय पाहो । हें लाघव सोंगाचें ॥३१॥सोंग कैसें म्हणसी जरी । दूत ओळखों आम्ही नारी । मा तो यादवसभा चतुरीं । केंवि मुर्रारि न लक्षिजे ॥३२॥माळा रुळती कुचकुंकुमीं । अंजनांक वदनपद्मीं । दशनक्षतीं अधरलक्ष्मी । कीं सभा ललामीं न लक्षिजे ॥३३॥ऐसें उपहासासि कारण । यादवसभेसि ज्याचें चिह्न । मागें पुढें थोर लहान । वितर्क जन करी ज्याचे ॥३४॥जरी तूं म्हणसी कृष्णें काय । तुमचा अपकार केला आहे । तरी कथितों उकलूनि हृदय । परिसता होय सारंगा ॥१३५॥सकृदधरसुधां स्वां मोहिनीं पाययित्वा सुमनस इव सद्यस्त्यज्यतेऽस्मान्भवादृक् ।परिचरति कथं तत्पादपद्मं तुज पद्मा ह्यपि बत हृतचेता उत्तमश्लोकजल्पैः ॥१३॥जैसियां तैसाचि आवडे । समानशीळां मैत्र घडे । तुल्यव्यसना समान कोडें । आनन्न जोडे सौहार्द ॥३६॥तुजचि सारिखा मुकंद । म्हणोनि दोघांचा मित्रवाद । कैसा म्हणसी तरी तूं विशद । ऐक सावध चंचरीका ॥३७॥तुवां दुर्मनें सुमनीं रति । धरूनि कार्यापुरती प्रीति । त्याजिसी आभोदसेवनांतीं । पुन्हा परती न करिसी ॥३८॥अन्य सुमनीं जाऊनि रमसी । गुंजारवें तथेंचि भ्रमसी । पूर्वस्नेहाचिये विषीं । नव्हे मानसीं आठवण ॥३९॥मधुपा म अधुप तैसाचि हरि । सबाह्य कृष्ण तुझिया परी । आम्हां अधारामृतमाधुरी । एके अवसरीं प्राशविली ॥१४०॥सप्तस्वरीं वेणुमयी । श्रवणीं पडतां विश्व मोही । तिणें मोहितां देहीं गेहीं । सर्व विषयीं विस्मरण ॥४१॥मग त्या अधरसुधेच्या पाना । भाळोनि आम्ही भरलों राना । भुलोनि कृष्णाच्या लावण्या । नाना छळणा साहिलें ॥४२॥वनीं फिरलों पिशाचवत् । विरहें पुलिनीं गाइलें गीत । त्याच्या छंदें केलें नृत्य । अमोघसुरत तैं केला ॥४३॥अगाध प्रीति आम्हांचिवरी । प्रेमा वाढला परस्परीं । आतां सांडूनि सुमनापरी । गेला मुरारि तुज ऐसा ॥४४॥मथुरेचिया नवनागरा । भुलला र्त्यांच्या स्मरसंगरा । मार आमुच्या करी मारा । हें श्रीधरा कळेचिना ॥१४५॥एवढें निष्ठुर ज्याचें चित्त । तो कृतघ्न कृतकायार्थ । मैंद जैसा होऊनि आप्त । करी घात नैर्घृण्यें ॥४६॥अरे द्विरेफा हें आश्चर्य । खेदें आमुचें फुटतें हृदय । ऐसियाचेही सेविते पाय । पद्म काय म्हणोनियां ॥४७॥तोही कळला आम्हांसि भाव । उत्तमश्लोक हें ऐकोनि नांव । बहुतेक तिचा भुलला जीव । महानुभावयशःकथनें ॥४८॥उत्तमश्लोक पुण्यश्लोक । अभेद अव्यय विश्वव्यापक । आनंदकंद जगत्पालक । हा स्तवनघोष श्री भुलवी ॥४९॥रमा भुलली लटिक्या कथा । हा जरी सर्वांतरात्मा असता । तरी आमुची विरहव्यथा । स्वयें नेणता निजहृदयीं ॥१५०॥रमा अविचक्षण बापुडी । कीर्ति ऐकोनि जाली वेडी । नेणे याच्या कापट्यखोडी । दिधली बुडी दृढ चरणीं ॥५१॥तैशा नहों आम्ही ललना । तत्कापट्यचर्याभिज्ञा । पुन्हा न भुलों त्या कृतघ्ना । वृथा वल्गना कां करिसी ॥५२॥किमिह बहु षडंघ्रे गायसि त्वं यदूनामधिपतिमहगृहणामग्रतो नः पुराणम् ।विजयसखसखीनां गीयतां तत्प्रसंगः क्षपितकुचरुजस्ते कल्पयतीष्टमिष्टाः ॥१४॥शुक म्हणे गा कुरुपाळका । स्वभावें गुंजतां चंचरीका । तें ऐकोनि कृतवितर्का । व्रजनायिका बोलती ॥५३॥आमुचें मोहरावया मन । भ्रमर गातसे कृष्णगुण । ऐसा वित्तर्क मनीं कल्पून । बोलती वचन मधुपेंसीं ॥५४॥अरे भ्रम किमर्थ येथ । बहुधा गासी यदुवरनाथ । आम्हांसि त्याचे गुण समस्त । पूर्वींच विदित कविवदनें ॥१५५॥आम्हांपुढें त्याची कथा । तूं गासील तितुकी वृथा । आम्ही जाणतों त्याचिया चरिता । पूर्ववृत्तांता मुळींहुनी ॥५६॥अगृहाण जे अपरिग्रही । परमहंसादि वेषें पाहीं । ज्यातें बहुधा कवळिती हृदयीं । निर्लज्जदेहीं सर्वदा ॥५७॥पूर्वीं बहुतीं अनुभविला । पुराणपुरुष हा दादुला । वृथा त्या गुनगणमाळा । न रुचे आम्हांला तव वदनें ॥५८॥श्रीकृष्ण जो विजयसखा । मथुरेचिया ललना सुमुखा । सांप्रत त्याचिया जाल्या सख्या । तूं या कौतुका गा तेथें ॥५९॥प्रस्तुत त्या प्रियतम त्यासी । तयांपुढें तूं तद्यश गासी । हरिइष्टा त्या अभीष्टासी । श्रवणतोषीं तुज देती ॥१६०॥म्हणसी कैशा त्या हरिइष्टा । हृदयीं कवळूनियां वैकुंठा । क्षपिती कुचामया दुष्टा । रतिसंतुष्टा हरिसंगें ॥६१॥तोही रंगला त्यांचेनि रंगीं । भजलीं परस्परें अंगांगीं । तंव गायनें तत्प्रसंगीं । वोपिती शुभांगी अभीष्टा ॥६२॥जरी तूं म्हणसी अवो माय । ऐसें बोलणें उदास काय । तुम्हांसि स्मरोनि कृष्णहृदय । व्याकुळ होय स्मरतापें ॥६३॥तेणें स्वमुखें आज्ञावचनीं । तुम्हांसि विनवावयालागुनी । मज धाडिलें वृंदावनीं । ऐसें वदनीं जरी वदसी ॥६४॥तरी ऐकें रे अळिउळतिळका । कृष्ण आम्हांसि आहे ठाउका । त्या दुर्लभ तिहीं लोकां । माजि नायिका कवण असे ॥१६५॥दिवि भुवि च रसायां काः स्त्रियस्तद्दुरापाः कपटरुचिरहासभ्रूविजृंभस्य याः स्युः ।चरणरज उपास्ते यस्य भूतिर्वयं काअपि च कृपणपक्षे ह्युत्तमश्लोकशब्दः ॥१५॥स्वर्गमृत्युपाताळभुवनीं । दुष्प्राप वनित्ता त्यालागुनी । ऐसी न लक्षे आमुच्या नयनीं । काय म्हणोनि तें ऐका ॥६६॥पद्मफुल्लार वदनकमळ । वाचा चंदनाहूनि शीतळ । हृदयीं कर्तरी कातर कुटिळ । हें चिह्नें केवळ धूर्ताचीं ॥६७॥जळीं गळांतें गिळी मासा । लोभें भाळूनि बडिशामिषा । मग मत्स्यघ्र वोपी क्लेशा । पंचत्वदपशापर्यंत्र ॥६८॥कीं अंडजां टाकुनि कण । निषाद विश्वासें करी हनन । तैसाचि कितव कामिनीगण । भुलवी वेधून स्मितवक्त्रें ॥६९॥कपटरूप रुचिरहास । व्यंकट कटाक्ष पैं सविलास । लावण्यरसिका इंगितास । दावूनि वनितांस वश करी ॥१७०॥हें तों प्रतीत आमच्या देहीं । आणिकांसि पुसणें काई । रमा मोहिली या उपायीं । तेथ पाड काई इतरांचा ॥७१॥बापुडी नेणे याचिया कपटा । विश्वमोहिनी भुलली नटा । चरण उपासी धरूनि निष्ठा । तेथ आम्ही रानटा केउतिया ॥७२॥अरे कपट्या चंचरीका । पूर्ण कपटियाच्या सेवका । जाऊनि बोधीं निजनायका । नामविवेका विवरोनी ॥७३॥यद्यपि ऐसा जर्ही कितव । तथापि उत्तमश्लोक नांव । वागवी त्याचा अभिप्राव । कां पां स्वयें विवरीना ॥७४॥कृपणा दीनावरी अनुकंपा । जैसी माउली कळवळी स्तनपा । तैसा सदय पुरुष तोचि मधुपा । उत्तमश्लोक बोलावा ॥१७५॥मधुपा जाऊनि कृष्णापासीं । प्रकट गोष्टी बोलें ऐसी । जे उत्तम अभिधानासी । कळंक न लवीं कापट्यें ॥७६॥इंदिरादि आम्ही ललना । भुललों उत्तमश्लोकाभिधाना । आतां याचिया कितवपणा । जालों अभिज्ञा विरमोनी ॥७७॥उत्तमश्लोकनामत्रपा । धरूनि कांहीं पूर्व कृपा । अभिवर्द्धवीं ऐसें मधुपा । कंदर्पबापाप्रति बोलें ॥७८॥ऐशा वितर्कें विरहिणी । भ्रमराप्रति बोलती वचनीं । तंव तो पादांगुष्ठाहुनी । पुढें सरकोनि पातला ॥७९॥इतुक्यावरूनि विशेष तर्का । करिती जाली व्रजनायिका । तें तूं एकें कुरुवरतिलका । हरिगुणरसिका श्रवणज्ञा ॥१८०॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP