मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ५१ ते ५५ अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ५१ ते ५५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५५ Translation - भाषांतर गत्या ललितयोदारहासलीलाऽवलोकनैः । माध्व्या गिरा हृतधियः कथं तं विस्मरामहे ॥५१॥कृष्णपरिष्वंगाकारणें । कात्यायनीव्रताचरणें । प्रथम हेमंतीं यमुनास्नानें । केलीं अरुणें नुदैजतां ॥७७॥तया व्रताच्या शेवटीं । कृष्णें येऊनि यमुनातटीं । चीरें हरिलीं चुकवूनि दृष्टि । कदंबापृष्ठीं वळघला ॥७८॥शीतार्दिता यमुनाजळीं । बैसोनि प्रार्थितां वनमाळी । तेणें अभीष्ट केली रळी । ते तुजजवळी सांगतसों ॥७९॥तुम्ही व्रतस्था नग्न स्नानें । करितां घडलीं सुरहेळणें । तस्मात् प्रायश्चित्त करणें । मदनुशालनें वनिता हो ॥५८०॥नीपानिकटीं अवघ्या जणी । येऊनि वंदावा दिनमणि । हें ऐकोनि अंतःकरणीं । करी झडपणी जनलज्जा ॥८१॥तथापि अभीष्ट सुखाची प्राप्ति । यास्तव लज्जा ठेविली परती । निःशंक येऊनि कृष्णाप्रति । जोडल्या हस्तीं रवि नमिला ॥८२॥तेव्हां प्रसन्न होऊनि हरि । वरद वदला अभीष्टोत्तरीं । पुण्योदयाच्या येतील रात्री । कामना पुरी तैं करीन ॥८३॥तेथूनि आशा लागली मना । वाढली दिवसेंदिवस कामना । कृष्णें करितां वेणुगायना । भरलों वना हृतचित्ता ॥८४॥कृष्णीं जाऊनि मिनलों कैशा । नधरत सागरीं सरिता जैशा । कृष्णसंगें क्रमिल्या निशा । त्या मानसा आठवती ॥५८५॥वनीं जीवनीं पुलिनीं भुवनीं । श्रीकृष्णाच्या आलिंगनीं । सुख भोगिलें तें अनुदिनीं । विस्मृति मनीं पडों नेदी ॥८६॥रासक्रीडेचीं इंगितें । श्रीकृष्णाचीं विचेष्टितें । त्यांचा विसर पाडितां चित्तें । न पडे कल्पांतीं पैं आम्हां ॥८७॥श्रीकृष्णाची ललितगति । सस्मित उदार अपांगपातीं । सुधा न सरे तन्मधुरोक्ति । इहीं इंगितीं मन मोही ॥८८॥चित्तें हिरोनि नेलीं ऐसीं । नुसतीं प्रेतें फिरतों पिसीं । आतां विस्मृति पडेल कैसी । निजमानसीं तूं विवरीं ॥८९॥ऐसें बोलोनि उद्धवाप्रति । त्म्व जाकळी कृष्णास्मृति । तेणें विवश कृष्ण स्मरती । तें तूं नृपति अवधारीं ॥५९०॥हे नाथ हे रमानाथ व्रजनाथार्तिनाशन । मग्नमुद्धर गोविंद गोकुलं वृजिनार्णवात् ॥५२॥श्वसित म्हणती भो भो नाथा । तुज विण दिसतसों अनाथा । आम्हां जाकळी विरहव्यथा । कीं समर्था नेणसी तूं ॥९१॥रमानाथ तूं त्रिजगद्भर्ता । कृपापांगें निवविसी आर्ता । प्रपन्नार्तिहर सुखकर्ता । आमुची वार्ता कां त्यजिली ॥९२॥ इंद्र वरुण मम कुबेर । अग्नि नैरृति वायु ईश्वर । ऐसे तुझे पादुउकाधर । आम्हां सहचर तो कीं तूं ॥९३॥अनंत ब्रह्माण्डपालनपटु । व्रजीं अवतरूनि आम्हां निकटु । क्रीडाकौतुकें एकवटु । केलीं निपट स्निग्धत्वें ॥९४॥सकळव्रजाचा तूं नाथ । तुवां त्यजितां व्रज अनाथ । अर्थ स्वाअर्थ्ह आणि परमार्थ । आम्हां सत्पथदर्शक ॥५९५॥इंद्र वर्षतां सक्रोध घणवा । व्रजार्थ गिरिवर धरिला कवणा । व्रज वांचविला गिळूनि वणवा । तैं भेरी पणवा सुर वाती ॥९६॥ऐशा अनेक व्रजार्ति हरिल्या । सुरसंपदा व्रजीं भरिल्या । प्रेमपोषका व्यक्ति धरिल्या । बहु उद्धरिल्या व्रजरामा ॥९७॥आतां निष्ठुर जालासि कैसा । अक्रोरें नेतां दूरदेशा । हरिलें आमुचिया मानसा । तें कां परेशा नाठविसी ॥९८॥कें प्रथुरेचा राज्यलोभ । रमानथ तूं पद्मनाभ । आमुचें पुरवूनि बालभ । कें दुर्लभ हों पाहासी ॥९९॥गोविंद तूं गोगणवेत्ता । तरी कां नेणसी गोकुलव्यथा । आमुची जाणूनि विरहावस्था । भो व्रजनाथा ते निरसीं ॥६००॥तूं गेलासि मथुरापुरीं । गोकुळ बुडतें भवदुस्तरीं । दुःखार्णवापासूनि तरीं । धांव मुरारि कृपाळुवा ॥१॥हा हा करूनि चुरिती हात । कंठ दाटोनि स्फुंदती रुदत । म्हणती आमुचा प्राणनाथ । कां पां समर्थ अंतरला ॥२॥अहा अहा रे अदृष्टा । नाहीं पुरतां सुकृतसांठा । कृष्ण भोगूनि असंतुष्टा । शेखीं संकटा वरपडलों ॥३॥करुणवत्सला मुरारि । गोकुळ पडलें दुःखसागरीं । निष्ठुर न होईं अंतरीं । तारीं झडकरी कृउपाळुवा ॥४॥शुक म्हणे गा परीक्षिति । ऐशा विरहिणी विलपती । उद्धवें देखोनि आपुल्या चित्तीं । म्हणे यां श्रीपति तुष्टला ॥६०५॥श्रीशुक उवाच - ततस्ताः कृष्णसंदेशैर्व्यपेतविरहज्वराः । उद्धवं पूजयांचक्रुर्ज्ञात्वाऽत्मानमधोक्षजम् ॥५३॥त्यानंतरें कौरवपाळा । कृष्णसंदेश ऐकोनि अबळा । वरपडिलिया विरहानळा । उद्धवें सकळा निवविल्या ॥६॥कृष्णप्रणीत अध्यात्मयुक्ति । उद्धवें बोधितां बोधकशक्ती । प्रतीति येतां वनिताचित्तीं । सुखविश्रांति पावल्या ॥७॥प्रतीति म्हणाल कैसी कोण । तरी नंदनंदन नोहे कृष्ण । ज्याहूनि अर्वाक् अक्षजज्ञान । तो हा भगवान अधोक्षज ॥८॥आत्मा व्यापक अधोक्षज । सर्वात्मकत्वें तेजःपुंज । आपण तोचि अभिन्न सहज । हें निजगुज उमजल्या ॥९॥जाणोनि अधोक्षज आपण । सर्वात्मकत्वें पाहती कृष्ण । ऐशा अनुभवें संपन्न । पूजिती पूर्ण उद्धवा त्या ॥६१०॥उद्धवें त्यांचिया प्रेमभावें । विशेषप्रार्थनागौरवें । कृष्णकौतुकाविष्टजीवें । केला स्वभावें व्रजवास ॥११॥उवास कतिविन्मासान्गोपीनां विनुदञ्छुचः । कृष्णलीलाकथां गायन्नमयामास गोकुलम् ॥५४॥गोपिकांचें श्रमापहरण । करावयार्थ प्रेरी कृष्ण । हरि आज्ञा हे मुकुटीं धरून । उद्धव आपण स्थिर झाला ॥१२॥सकळां व्रजौकसांची भक्ति । नंदयशोदेची ही आर्ति । जाणोनि निववी मधुरा उक्ती । हरिगुणकीर्ति वर्णूनी ॥१३॥कृष्णगुणांचें करिती कथन । तेथें सादर करी श्रवण । प्रेमें परिसती त्यापें पूर्ण । हरिगुणवर्णन स्वयें करी ॥१४॥ऐसा व्रजजन निजसंगती । गातां ऐकतां कृष्णकीर्ति । उद्धवें पावविली विश्रांति । अहोराती नित्य नवी ॥६१५॥एवं कित्तेक मासवरी । उद्धवें राहूनियां व्रजपुरीं । गोपिकांचा संताप दुरी । केला यापरी कृतवर्या ॥१६॥यावंत्यहानि नंदस्य व्रजेजऽवात्सीत्स उद्धव । व्रजौकसां क्षणप्रायाण्यासन्कृष्णस्य वार्तया ॥५५॥नंदगोकुळीं जितके दिवस । केला होता उद्धवें वास । क्षणप्राय तो व्रजौकसांस । वाते क्लेशपरिहारें ॥१७॥हरिगुणकीर्तनसुधापानें । नितांत निवती श्रवणें मनें । उद्धवसहवास येणें गुणें । अल्प मानणें व्रजौकसीं ॥१८॥व्रजौकसांचें आर्तिहरण । ना तें उद्धवा प्रेम गहन । कृष्णक्रीडावनोपचरन । निवे पाहोनि तें ऐका ॥१९॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP