मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक ६२ ते ६७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६२ ते ६७ Translation - भाषांतर योऽस्मिन्स्नात्वा मदाक्रीडे देवादींस्तर्पयेज्जलैः । उपोप्य मां स्मरन्नर्च्चेत्सर्वपापैः प्रमुच्यते ॥६२॥इये माझिये क्रीडास्थानीं । स्नान करूनि जो जो प्राणी । ये ह्रदींच्या जलेंकरूनी । पितरांलागूनि संतर्पी ॥६९५॥देवऋषिमनुष्यगण । यथोक्त करूनि संतर्पण । तीर्थविधीसि उपोषण । माझें स्मरणपूर्वक ॥९६॥विप्रार्चन सुरार्चन । सदर्चन मदर्चन । करितां कल्मषापासून । मुक्त होऊन उद्धरती ॥९७॥ऐसा वर देऊनि हरि । पुन्हा सर्पाचें भय हरी । अभय देऊनि वरोत्तरीं । पुन्हा श्रीमुरारि गौरवी ॥९८॥द्वीपं रमणकं हित्वा ह्रदमेतमुपाश्रितः । यद्भयात्स सुपर्णस्त्वां नाद्यान्मत्पादलांछितम् ॥६३॥तूं आपुलें पूर्वस्थान । रमणकद्वीप सांडून । ज्याच्या भयें पलायन । केलें उद्विग्न होउनी ॥९९॥निर्भय जाणोनि यमुनाह्रद । एथ वससी सांडूनि खेद । ज्याच्या भयें तो न करी द्वंद्व । तुजशीं विषद मद्वरें ॥७००॥माझे चरणांचें लांछन । तुझे मस्तकीं देखोनि पूर्ण । गरुड न भक्षी तुम्हांसि जाण । हें वरदान पैं माझें ॥१॥ध्वजवज्रादिलांछितपदें । तुझे मस्तकीं देखोनि विषदें । गरुड विसरोनि पूर्वद्वंद्वें । आप्तवादें तोषेल ॥२॥ऐसें ऐकोनि प्रभूचें वचन । कालिय सहितपत्नीगण । गरुड निर्वैर जाणोन । सुखसंपन्न हृत्कमळीं ॥३॥आपुलीं सांडूनि वृत्तिनिलयें । एथें क्रमितां नष्टचर्यें । आजि निःशल्य झालीं हृदयें । हें साधलें कार्य हरिकृपें ॥४॥मत्पादलांछन देखोनि नेत्रीं । गरुड तुम्हांशीं करील मैत्री । ऐसें निघतां श्रीकृष्णवक्त्रीं । चक्षुःश्रोत्रीं ऐकिलें ॥७०५॥दुःख हरोनि देइजे सुख । कीं विष वर्जूनि पाजिजे पीयूख । तैसा सर्पासि संतोख । श्रीहरिवाक्य परिसोनी ॥६॥श्रीशुक उवाच - एवमुक्तो भगवता कृष्णेनाद्भुतकर्मणा । तं पूजयामास मुदा नागपत्न्यश्च सादरम् ॥६४॥षड्गुणैश्वर्यपरिपूर्ण । यालागिं अद्भुतकर्मा कृष्ण । तेणें सर्प बोधितां जाण । सुखसंपन हृतकमळीं ॥७॥तुटलें गरुडाचें अनादि वैर । लाधला श्रीकृष्ण अभयंकर । स्वपदलाभाचा जीर्णोद्धार । आनंदनिर्भर कालिया ॥८॥तेणें आनंदें उचंबळोन । श्रीकृष्णाचें करी पूजन । अत्यादरें नागिणी पूर्ण । प्रेमें श्रीकृष्ण पूजिती ॥९॥दिव्यांबरस्रड्मणिभिः परार्ध्यैरपि भूषणैः । दिव्यगंधानुलेपैश्च महत्योत्पलमालया ॥६५॥दिव्यरूप धरूनि फणी । तैशाचि दिव्यरूपा पद्मिनी । यथोपचारीं चक्रपाणि । दिव्याभरणीं पूजिती ॥७१०॥पूजापूर्वांग संपादून । दिव्यांबरें केलीं अर्पण । अमूल्य रत्नमणिसुवर्ण । देदीप्यमान निजतेजें ॥११॥जया मणींच्या किरणांपुढें । दिसे चंडकिरण बापुडें । ऐसे रत्नमणींचे कोडें । हार निवाडें अर्पिले ॥१२॥पदभूषणें कटिमेखळा । वरी फांकती रत्नकिळा । अमोघतेजाचा उमाळा । शिरीं सोज्वळा तो मुकुट ॥१३॥दिव्य कुंडलें मकराकृति । कंठीं कौस्तुभ श्रीवत्सपंक्ति । अनर्घ्यरत्नें ओप देती । बाहीं मिरवती अंगदें ॥१४॥कीर्तिमुखें वाहुवटीं । वीरकंकणें श्रीमणगटीं । दशांगुळीं मुद्रिकादाटी । क्षुद्रघंटिका कांचीतें ॥७१५॥ऐशीं भूषणें अर्धातीत । तिहीं भूषिला श्रीभगवंत । दिव्यसुगंधें मघमघित । पन्नगनाथ समर्पी ॥१६॥निढळीं रेखूनि त्रिपुंड्रटिळा । सुरंग अक्षतमाणिक्यकिळा । चंदन चर्चूनि सुपरिमळा । सुगंधरोळा उधळिला ॥१७॥भोगिभुवनींचीं दिव्य सुमनें । कल्पतरु लाजती जेणें । तीं अर्पूनि कद्रुनंदनें । उत्पलमाला अर्पिली ॥१८॥जये उत्पलमाळेतळीं । प्रियतम वनमाळा लोपली । वैजयंती लाजोनि ठेली । प्रेमबहळीं मघमघित ॥१९॥महती म्हणिजे महत्त्वा योग्य । ब्रह्मादि लघुत्वें अयोग्य । तें अर्पूनियां श्रीरंग । पूजिला साङ्ग फणिनाथें ॥७२०॥अपि या अव्ययाचा अर्थ । नैवेद्य फलताम्बूलसहित । सर्वोपचारी जगन्नाथ । सप्रेमभरित पूजिला ॥२१॥पूजयित्वा जगन्नाथं प्रसाद्य गरुडध्वजम् । ततः प्रीतोऽभ्यनुज्ञातः परिक्रम्याभिवंद्य तम् ॥६६॥पत्नींसहित कालियफणी । ऐसा पूजूनि चक्रपाणि । प्रदक्षिणाअभिवंदनीं । नम्र होऊनि तोषविला ॥२२॥जो या अखिल जगाचा नाथ । गरुडध्वज श्रीसमर्थ । कालिय त्यातें होऊनि विनत । आज्ञा घेत प्रयाणीं ॥२३॥देखोनि तयाचा शुद्ध भाव । संतोषोनि वैकुंठराव । आज्ञा देऊनियां स्वयमेव । पूर्वस्थाना पाठविला ॥२४॥हरीची आज्ञा लाहोनि फणी । माथा ठेऊनि कृष्णचरणीं । कुटुंबेंशीं तत्क्षणीं । सव्य घेऊनि निघाला ॥७२५॥सकलत्रसुहृत्पुत्रो द्वीपमब्धेर्जगाम ह । तदैव साऽमृतजला यमुना निर्विषाऽभवत् । अनुग्रहाद्भगवतःक्रीडामानुषरूपिणः ॥६७॥मनुष्यदेहाची घेतली बुंथी । परी तो भगवान् विश्वपति । तदनुग्रहें निर्भय चित्तीं । द्वीपाप्रति चालिला ॥२६॥पुत्र कलत्र सोयरे सकळ । निःशेष घेऊनि अवघें कुळ । यमुनाजलमार्गें तत्काळ । आनंदबहळ चालिला ॥२७॥बळीच्या संग्रामीं निर्जरीं । सांडूनियां अमरपुरी । कालक्षेप गिरिकंदरीं । केला ज्यापरी संकटीं ॥२८॥पुन्हा विष्णूच्या पक्षपातें । बळीशीं सख्य जोडूनि निरुतें । सिंधु मथूनि ऐश्वर्यातें । लाहोनि स्वर्गातें सेविलें ॥२९॥तैसाचि गरुडभयें फणी । यमुनाह्रदीं होता लपोनी । कृष्णवरें आनंदोनी । पुढती सदनीं प्रवेशे ॥७३०॥सिंधुगर्भीं द्वीप रमणक । त्यामाजि सकुटुंब पन्नक । झाला प्रवेशता निःशंक । लाहोनि पदांक कृष्णाचा ॥३१॥गुह्य सांगे स्वजातीसी । पशु अथवा मनुष्यासीं । सहसा न डंखिजे कोणासी । कृष्णवरासि स्मरोनी ॥३२॥मनुष्यां अथवा चतुष्पादां । तुमचें विष न चढे कदा । ऐशा श्रीकृष्णवरदा । सर्वीं सर्वदा जाणावें ॥३३॥तैंहूनि विरोळियांच्या जाति । जळीं निर्विष न डंखिती । कृष्णवराची हे ख्याति । जगीं जाणती सर्वज्ञ ॥३४॥कालिय रमणकद्वीपा गेला । यमुनाप्रवाह निर्विष झाला । अम्रुता ऐसा स्वाद आला । त्या उदकाला हरिवरें ॥७३५॥कालिय जातांचि तत्काळ । यमुना झाली अमृतजळ । हरली विषाची हळहळ । वाहे निर्मळ सुसेव्य ॥३६॥पशुपक्ष्यादि सर्व जाति । यमुना स्वइच्छा सेविती । ऐशी श्रीकृषाण्ची ख्याति । ऐके परीक्षिति शुकमुखें ॥३७॥तें हें श्रीमद्भागवत । महापुराण श्रीव्यासोक्त । वैयासकि नृपा कथित । स्कंध त्यांत दशम हा ॥३८॥त्याही माजि कालियामथन । हा अध्याय सोळावा ऐकोन । पुन्हा सप्तदशीं करील प्रश्न । तें सज्जन परिसोत ॥३९॥द्वीप नामें जें रमणक । तें कां कालियपन्नक । टाकूनि लपला साशंक । यमुनाह्रदीं चिरकाळ ॥७४०॥या प्रश्नाचें निरूपण । करील व्यासाचा नंदन । सप्तदशीं हें कथाश्रवण । सभाग्य श्रवण करीतील ॥४१॥श्रीजनार्दनस्वाधिष्ठानीं । सत्ता सन्मात्र सिंहासनीं । एकनाथ अद्वयभुवनीं । पूर्णपणें म्राजिष्ट ॥४२॥चिदानंदचरनसेवे । स्वानंदसाम्राज्यगौरवें । गोविंदनामस्मरणदैवें । वैष्णव आघवे सभाग्य ॥४३॥त्यांचिया पादप्रक्षालनीं । दयार्णवाचें प्रज्ञापाणी । लागतां पदरजांच्या श्रेणि । सुकृतखाणी जोडल्या ॥४४॥तया सुकृताचेनि बळें । वरदव्याख्यान भाषामेळें । श्रोतयांचीं हृदयकमळें । प्रेमकल्लोळें निववीत ॥७४५॥भरला केवळ दयार्णव । तो हा ग्रंथ सद्गुरुराव । भवभ्रमाचीं बुडवूनि नाव । वाढे अथवा स्वानंदें ॥४६॥निरपेक्ष विरक्त सद्गुरुभक्त । तो येथ रिघावया समर्थ । रिघोनि शेषशायी पर्यंत । त्यासि एकांत फावेल ॥४७॥दयार्णवाची हे विनवणी । सद्भाव धरितां येथींच्या श्रवणि । स्वयें तुष्टोनि चक्रपाणि । योग्यता आणि न मागतां ॥४८॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरविरचितायां कालिय - निर्यापणं नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥६७॥ टीकाओवी ॥७४८॥ एवं संख्या ॥८१५॥ ( सोळावा अध्याय मिळून ओवीसंख्या ९८१७ ) सोळावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP