मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक २५ ते २७ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक २५ ते २७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २५ ते २७ Translation - भाषांतर तं जिह्वया द्विशिखया परिलेलिहानं द्वे सृक्किणी ह्यतिकरालविपाग्निदृष्टिम् ।क्रीडन्नयुं परिससार यथा खगेंद्रो बभ्राम सोऽप्यवसरं प्रसमीक्षमाणः ॥२५॥अतिकराल भयंकर । विषाग्नीचे प्रलयांगार । तैसे प्रज्वलित ज्याचे नेत्र । तो विखर धुधुवत् ॥४॥लळलळा लाळी जिह्वा तिखा । एकएकीतें दोन शिखा । जैशा सरळ शस्त्रांच्या झाडिती शिखा । तैशा प्रतिमुखा माझारीं ॥३०५॥कीं विद्युल्लता प्रलयघनीं । तैशिया जिह्वाद्वय सृक्किणी । आवाळीं चाटिती चपळपणीं । फूत्कारोनि सरोंख ॥६॥त्या ऐशिया सर्पाप्रति । खगेंद्राचिये विक्रमगति । मूर्ध्नि वलघोनि श्रीपति । भ्रमराकृति क्रीडत ॥७॥जये मूर्ध्नीसि हाणी चरण । तेथ शतशा धांवती वदनें । लघिमासिद्धिचपळपणें । करी नर्तनें श्रीकृष्ण ॥८॥सर्प पाहे प्रतीकारसंधि । तंव तो श्रीकृष्ण विशाळबुद्धि । क्रीडा करी नर्तनविधि । जो कलानिधि जगदात्मा ॥९॥श्रीकृष्ण काळियाचे मूर्ध्नि । चढोनि प्रवर्ते जंव नर्तनीं । तेव्हां जयशब्द त्रिभुवनीं । केला सुरगणीं आनंदें ॥३१०॥शतशः मुखें डंखूं धांवे । गरला वमी सक्रोध हांवे । चपळांगेंशीं वेष्टूं पावे । परी नागवे श्रीचरण ॥११॥एवं परिभ्रमहतौजसमुन्नतांसमानम्य तत्पृथुशिरः स्वधिरूढ आद्यः ।तन्मूर्धरत्ननिकरस्पर्शातिताम्रपादांबुजोऽखिलकलादिगुरुर्ननर्त ॥२६॥ऐशियापरी कालियमाथां । नृत्य करितां श्रीकृष्णनाथा । चमत्कारें परिभ्रमतां । परम व्यथा फणी पावे ॥१२॥पदविन्यास तालबद्ध । तांडवमंडित श्रीमुकुंद । भ्रमरी देतां फणावृंद । दुःसह खेद पावला ॥१३॥ऐसा कालिय हतौजस । जों जों उच्च उभारी अंश । तों तों वळघोनि आदिपुरुष । लववूनि त्रास पाववी ॥१४॥विशाळ चंचळ फणापृष्ठ । लववी नाचोनि वैकुंठ । तेणें सर्पासि होती कष्ट । अतिगरिष्ठपदप्रहारें ॥३१५॥त्रासें फणा लववी सर्प । अन्य उभारी जंव सदर्प । तेही वळघोनि कंदर्पबाप । दर्प अमूप लोपवी ॥१६॥म्हणाल कालिय महाव्याळ । कृष्ण सहा वर्षांचें बाळ । त्याचेनि भारें लववी मौळ । हें प्रांजळ न बोधे ॥१७॥वक्ता श्रीशुक याचिसाठीं । हेतु देऊनि सांगे गोठी । आद्य जो कां श्रीजगजेठी । सर्पा मुकुटीं वळघला ॥१८॥ब्रह्मांडकोटि रोमविवरीं । अखिलैश्वर्यकलाधारी । आद्यपुरुष तो मुरारि । नाचे शिरीं सर्पाचे ॥१९॥तेजःपुंज अमूल्यमणि - । मंडित कालियाचे फणी - । वरी नाचतां यदुकुलतरणि । जडला चरणीं मणिरंग ॥३२०॥फणिमणींची अरुणप्रभा । चरणीं जडली पंकजनाभा । बालार्काच्या अंतरगार्भा । तुळितां शोभा ते न पवे ॥२१॥म्हणाल फणिमणिंचा स्पर्शरंग । श्रीकृष्णचरणींचा सुरंग । अरूप अमल तो अव्यंग । हा चरित्रभाग भक्तांचा ॥२२॥नामरूपक्रियागुण । भक्तीं लेवविले संपूर्ण । कालियमौळें रंगले चरण । हें कां गौण मानावें ॥२३॥पूतनास्तनींएं गरल प्याला । काळकूटें त्या काळा झाला । कीं तृणावर्तें गगना नेला । तैंहूनि झाला घनतनु ॥२४॥क्षुधित मातेच्या वत्सल्यप्रेमें । विह्वळ गोपींच्या सकामकामें । तैशीं रंगविलीं पादपद्में । भुजगोत्तमें निजमौळीं ॥३२५॥तालबाध फणारंगीं । कैसा नाचे तो शार्ङ्गी । तरळ वदन गरलआगी । झगटे सर्वांगीं दुःसह ॥२६॥तेणें झाली तनु सांवळी ।फणिमाणिक्यें पादतळीं । अरुणरंगी प्रभा झाली । भक्तीं धरिली जे हृदयीं ॥२७॥पूर्वीं कमलाकुचकुंकुमें । मर्दितां रंगलीं पादपद्में । एथ कालियाच्या भक्तिप्रेमें । मौळरत्नीं रंगलीं ॥२८॥म्हणाल फणीचा फणामेळ । क्रोधें विह्वळ अतिचंचळ । त्यावरी सहा वर्षांचा बाळ । केवी सुताल हरि नाचे ॥२९॥तरी तो अखिलकलागुरु । ब्रह्मादिकां उपदेष्टारु । जेथूनि वक्तृत्वविचारु । भारतीचा प्रवर्ते ॥३३०॥तयासि हें अवघड काय । फणिमणीवरी ठेऊनि पाय । करी नाचोनि आनंदमय । लोकत्रय निजसत्ता ॥३१॥श्रीप्रभूच्या इच्छामात्रें । तया नृत्याचीं सर्व तंत्रें । वीणामुरजादि विचित्रें । जाले स्वतंत्रें तें ऐका ॥३२॥तं नर्तुमुद्यतमवेक्ष्य तदा तदीयगंधर्वसिद्धसुरचारणदेववध्वः ।प्रीत्या मृदंगपणवानकवाद्यगीतपुष्पोपहारनुतिभिः सहसोपसेदुः ॥२७॥नृत्याकारणें श्रीकृष्णातें । देखोनि उद्योगवंत तेथें । त्याचे किंकर वोळगते । आले तेथें तें ऐका ॥३३॥जाणोनि रायाचें चेष्टित । घेऊनि उपकरणें तदुचित । उपचारसामग्री समवेत । येती धांवत अनुयायी ॥३४॥तैसें जाणोनि हरिचें नटन । हरीचे जे किंकरगण । गंधर्वादि सिद्धचारण । आले धांवोन सवेग ॥३३५॥सुरनरकिन्नरपन्नग । वसुसाध्यादित्यप्रमुख । लोकपाळांचें अष्टक । एकेंएक पातले ॥३६॥देवांगना लास्यकुशला । सप्तस्वरीं रागमाला । गीत संगीतनाट्यकला । धरिती ताला सांवरूनि ॥३७॥कृष्णप्रेमें आकर्षिलीं । आत्मप्रियत्वें सप्रेमभुली । कृष्णमोहरीं मोहरलीं । नाचों लागलीं तच्छंदें ॥३८॥मृदंग होऊनि पुरंदर । स्वयेंचि होय वादनपर । तालबद्ध घनगंभीर सप्तस्वर वाजवी ॥३९॥वल्लकी होऊनि मृडानी । वाजवी स्वयें मधुरध्वनीं । अलौकि कृष्णनर्तनीं । तालाभ्यसनीं प्रवर्ते ॥३४०॥डमरुढांकारे डमरेश्वर । लोकपाल सुतालधर । सामसवनें ब्रह्मकुमार । तारमंद्र विवळिती ॥४१॥षड्ज ऋषभ गांधार । मध्यम पंचम धैवत स्वर । निषादादिसारिगमपर । देवकिन्नर आळविती ॥४२॥पनव आनक कांसोळ घन । इत्यादि वाद्यें वाद्यप्रवीण । मूर्च्छनाकुशल सुपर्वाण । संगीतज्ञ हरिरंगीं ॥४३॥नंदनोद्भवें प्रसूनें भलीं । कुसुमाकरें संसारिलीं । अमरीं सप्रेम आणिलीं । कृष्णपाउलीं अर्पावया ॥४४॥आपादमाळा सुमनहार । सुगंध द्रव्यांचे प्रकार । अमृतोमय फलोपाहर । पूजोपचार स्तुति नुति ॥३४५॥युक्त इत्यादि उपचारीं । सिद्धचारणगंधर्वसुरीं । येऊनि सेविला श्रीहरी । नाचतां शिरीं सर्पाचे ॥४६॥जे कां अपूर्व नृत्यरीति । तेणें मिषें दुर्मदशांति । सर्प पावला उपहति । ते तूं नृपति अवधारीं ॥४७॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP