मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| आरंभ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीकृष्णपरमात्मने नमः । गोविंद सद्गुरु सुखनिधाना । तव पदभजनें सुखें नाना । लाहोनि वरिती नाना स्थाना । त्या संपूर्णा तुज नमो ॥१॥गोशब्दें बोलिजे मही । तवास्तिक्य तीच्या ठायीं । म्हणोनि आधार विश्वाधेयीं । झाली पाहीं पटुतर ॥२॥“ गामाविश्य च भूतानि । धरितो स्वतेजें करूनी ” । ऐसें अर्जुनालागोनी । तूं निजवचनीं बोधिसी ॥३॥“ पुण्यो गंधः पृथिव्यां च ” । ऐसें तुझेनि वदनें वाच्य । तेव्हां जगदाधार तूं हें साच । येर नटनाच आधेय ॥४॥येर्हवीं पांसूची ढेपुळी । केंवि राहे अंतराळीं । गोलाध्यायीं हें प्रांजळी । दैवशाली जाणिती ॥५॥जगदाधारत्वें संप्राप्त । म्हणोनि भूभर्ता गोविंद सत्य । जगद्रूप हा विवर्त । करीं भ्रांत नसतांही ॥६॥विवर्ताचा करूनि बोध । सन्मात्र बोधिसी एवंविध । यालागीं सद्गुरु स्वतःसिद्ध । म्हणती प्रबुद्ध श्रुतिशास्त्रें ॥७॥जें कां सच्चित्सुख केवळ । अक्षय तत्प्राप्तीचें स्थळ । तें स्वामीचें चरणकमळ । भजनशीळ सेविती ॥८॥देहाध्यासें विषयाभास । भ्रमवी जीवचैतन्यास । ते ते ठायीं तुझे दास । सुख निर्दोष भोगिती ॥९॥मरुदेशीं ग्रीष्मकाळ । तृषे जाकळी प्राणी सकळ । तेथ चातकां सुख सकळ । स्वेच्छा शीतळ जलपानें ॥१०॥फळाभिलाषें मीमांसकें । इहामुष्मिकें विषयसुखें । कल्पनिकें पृथक् पृथकें । ती आसिकीं तव चरणीं ॥११॥तुझेनि पादाब्जसेवनें । चित्सुख भोगिजे भोक्तेपणें । इये त्रिपुटीचेनि मरणें । सुखचि होणें तव कृपा ॥१२॥मानसपूजेचा सोहळा । दिव्योपचार देखिले डोळां । तरी द्वैताच्या विटाळा । पासूनि वेगळा स्वलाभें ॥१३॥तैसें भज्य भजता आणि भजन । केलें स्वामीनें अभिन्न । तथापि चरणीं पडकलें मन । तें येऊ मुरडून द्वैतासी ॥१४॥श्रीपादकमलाच्या न्याहाळीं । लाभे सुखाची नव्हाळी । तेथ कैवल्यप्राप्ति न तुळे सगळी । मा कैंचीं आगळीं येर सुखें ॥१५॥साधक दृश्यावरूनि दृष्टि । काढूनि मुरडिती उफराटी । त्रिकूटीं श्रीहठीं गोल्हांटीं । औटपीठीं थांबविती ॥१६॥ते मज वाटती करंटवाणें । जेंवि खद्योतें स्वपुच्छगुणें । सूर्यप्रभे अंतरणें । तेंवि नाडणें पदसेवे - ॥१७॥अनेक प्रतिमा व्रतें हवनें । मुद्रा लक्ष्यें विविधें ध्यानें । स्तनभावना चर्म चोखणें । सद्गुरुभजनें विण तैशीं ॥१८॥सगस्रदळादि सर्वांदेहीं । गुरुकृपेविण असोनि नाहीं । दास्य सोडूनि तें साधिलें जिहीं । ते नरदेहीं वंचले ॥१९॥यालागीं श्रीपादभजनप्रेमा । कृपावरें वोपिजे आम्हां । यदर्थ मम मना सकामा । कल्पद्रुमा गुरुवर्या ॥२०॥ऐसें ऐकोनि आर्तवचन । सद्गुरु म्हणती सावधान । सगुण निर्गुण उभय भजन । हें अवतरणें प्रेमाचें ॥२१॥उद्यममिसें धनें धन । जेंवि पावे अभिवर्धन । तेंवि तुझें सप्रेम स्तवन । वरद होऊनि तोषवी ॥२२॥दशमस्कंधींचा सोळावा । अध्याय भाषा वाखाणावा । आज्ञापालन हेचि सेवा । ठाव नेदावा अहंते ॥२३॥योगयुक्तीमाजि जें सार । तें हें स्वामीचें वरदोत्तर । चंद्रामृतें तोषे चकोर । आज्ञाधर तन्न्यायें ॥२४॥पंचदशीं धेनुक-हनन । करूनि सुसेव्य तालवन । विषोदकें गोगोपगण । मरतां श्रीकृष्णें जीवविले ॥२५॥षोडशाध्यायीं कालियदमन । तत्पत्नींचें ऐकोनि स्तवन । कालियाचे रक्षिले प्राण । अनुग्रहून श्रीकृष्णें ॥२६॥योगपति कौरवपति । जे कां श्रीशुक परीक्षिति । श्रोते वक्ते विशालमति । ते आजि पंक्तीं श्रोतयां ॥२७॥जैसा गौतमीचा ओघ । गंगाद्वारीं गौतमायोग्य । तेणेंचि पाडें पातकभंग । करी अव्यंग सेवितां ॥२८॥तैशीच हेही श्रीकृष्णकथा । भावें एके सभाग्य श्रोता । परीक्षितीसमान तो परमार्था । पावे अनर्था खंडूनी ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP