मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक १ ते ४ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय १६ वा - श्लोक १ ते ४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ४ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच :- त्रिलोक्य दूषितां कृष्णां कृष्णः कृष्णाहिना विभुः ।तस्या विशुद्धिमन्विच्छन् सर्पं तमुदवासयत् ॥१॥दैत्य मारूनि रासभजाति । तालफळें भक्षूनि तृप्ति । कळानिधान जो श्रीपति । नाचे प्रीतीं अहिमाथां ॥३०॥कालियाचे विस्तीर्ण फणीं - । वरी नाचे चक्रपाणि । संगितशिक्षेच्या साधनीं । शिवभवानीछात्रत्वें ॥३१॥कौरवचक्रचूडारत्ना । ऐकें परीक्षिते सज्ञाना । कालियविषें दूषित यमुना । देखोनि कृष्णा आवेश ॥३२॥रक्षेमाजीं लोपला अग्नि । तरी आवेशे शुष्केन्धनीं । तैसा श्रीकृष्ण गोपपणीं । विभु म्हणोनि न झांके ॥३३॥ईषन्मात्र वक्र भृकुटि । कृष्णें करितां ब्रह्मांडकोटि । होऊनि लपती मायेपोटीं । गोवळनटीं नटला तो ॥३४॥ऐसा समर्थ स्वसामर्थ्यें । तेणें विभुत्वें कृष्णनाथें । सर्प दवडूनि कालिंदीतें । निर्विष करूं भाविलें ॥३५॥यमुना करावी निर्मळ । ऐसें इच्छूनि गोपाळ । कालियसर्पातें तत्काळ । दवडी केवळ विभुत्वें ॥३६॥ऐसें वदला द्वैपायनि । ऐकोनि शंका नृपा मनीं । झाली तयेचे निरसनीं । करी विनवणी मुनिवर्या ॥३७॥राजा उवाच :- कथमंतर्जलेऽगाधे न्यगृह्णाद्भगवानहिम् । स वै बहुयुगावासं यथाऽसीद्विप्र कथ्यताम् ॥२॥म्हणे अहो जी योगिराजा । इतुका संशय निरसा माझा । जळीं कालिय कवणें ओजा । युगें बहुतें स्थिरावला ॥३८॥कालिय जलचर नव्हे कांहीं । तेणें वसति जलाचे ठायीं । बहुत युगें करावया पाहीं । कारण कांहीं मज सांगा ॥३९॥स्थलचरेंही मनुष्यादिकें । जळीं क्रीडती यथासुखें । परंतु होऊनी स्थायिकें । युगें अनेक न वसती ॥४०॥तरी तें अगाध यमुनाजळ । तदंतरीं करूनि स्थळ । जलचर नसोनि बहुत काळ । कां पां व्याळ राहिला ॥४१॥आणि दुसरी ऐका गोष्टी । बहुत युगें यमुनेपोटीं । वसत होता दुर्विषहठी । केंवि जगजेठी निगृही त्या ॥४२॥अथवा प्रावृट्काळीं यमुना । न वाहवी सर्पस्थाना । उभय तीरींचे ग्राम नाना । विषोल्बणा केंवि साहति ॥४३॥बालपणें म्यां केला प्रश्न । देवें करावें निरूपण । सहसा न म्हणावें आडरान । हे कथा संपूर्ण कृष्णाची ॥४४॥ब्रह्मन् भगवतस्तस्य भूम्नः स्वचंदवर्तिनः । गोपालोदारचरितं कस्तृप्येतामृतं जुषन् ॥३॥भूमान् म्हणिजे अपरिच्छिन्न । स्वजनच्छंदें ज्या वर्तन । भगवंताची लीला पूर्ण । गोपक्रीडननाट्याची ॥४५॥सुमनमाळेमाजील दोरा । साठीं धरिती त्या आमोदसारा । तेंवि भगवद्गुणचरिता उदारा । साठीं इतरा इतिहासा ॥४६॥ब्रह्मनिष्ठां अग्रमणि । तो तूं सर्वत्र बादरायणि । हरिगुणप्रेमा अंतःकरणीं । जाण सज्ञानी तूं माझा ॥४७॥सेवितां हरिगुणकथामृत । विरिंचिसांबही अतृप्त । तेथ अस्मदादि प्राकृत । केवीं संतृप्त होती पैं ॥४८॥एकमेकांचे हृदयवासी । कीं जन्मले नाभिदेशीं । चरितामृत त्या न निगे कुसीं । मा येरां कायशी संतृप्ति ॥४९॥म्हणोनि विस्तारेंशीं आम्हां । निरूपिजे जी द्विजोत्तमा । श्रवणीं देखोनि नृपाचा प्रेमा । शुकपरमात्मा तोषला ॥५०॥श्रीशुक उवाच - कालिंद्यां कालियस्यासीद् ह्रदः कश्चिद्विषाग्निना ।श्रप्यमाणपयो यस्मिन् पतंत्युपरिगाः खगाः ॥४॥शुक म्हणे गा परीक्षिति । यमुनेमाजीं एके प्रांतीं । अगाध डोहो ज्यामाजी वसति । करी दुर्मति कालिय ॥५१॥महापुराचा येतां लोट । तैंचि कालवे एकवट । एरवीं एकला यमुनेनिकट । ह्रद दुर्घट विषयोगें ॥५२॥पूरप्रवाह पात्रांतरीं । ह्रद तो कालिंदीमाझारीं । सौम्यप्रवाहापासूनि दुरी । एके तीरीं ह्रद असे ॥५३॥( येथे ५४ नं. नाही. ) यालागीं यमुनेचा प्रवाह । वाहवूं न शके सर्पसमूह । अंतर्जलीं करूनि गृह । चिरकाल राहे या हेतु ॥५५॥कालियतुल्य विषोल्बण । दारापुत्रादि सर्पगण । सहस्रें सहस्र गणी कोण । तेणें दारुण विषवारि ॥५६॥भाते लावूनि आटिती धातु । अष्टलोह द्रवीभूत । शीतळवातें ज्वाळा निघत । त्या नभांत पसरती ॥५७॥भोंवताला तिर्यक्पवन । विषाक्त झगटे ह्र्दावरून । तेणें प्रलयहुताशन । भूतें भरून उचंबळे ॥५८॥जीवन सळसळां डोहीं कढे । भवंता वाफांचा वळसा पडे । तप्तअयःपिंडापाडें । तापे चहूंकडे भूभाग ॥५९॥जीवन भुवन दहन पवन । विषोल्बणचि झालें गगन । ऐसा पंचभूतांचा गण । विषें संपूर्ण कोंदला ॥६०॥खेचर गगनीं जळोनि पडती । तीर्यक्पवनेंचि करपती । भूचर भूसंस्पर्शें मरती । मा जळें वांचती कैसेनी ॥६१॥वळसा सामान्य विहंगमीं । क्रौंचादि विशेष ऊर्ध्वगामी । तेही विषें आहाळोनि व्योमीं । पडती भूमीं करपोनी ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP