मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १६ वा| श्लोक ३६ ते ३८ अध्याय १६ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ श्लोक ३९ ते ४३ श्लोक ४४ ते ४७ श्लोक ४८ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६७ अध्याय ६ वा - श्लोक ३६ ते ३८ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ३८ Translation - भाषांतर कस्यानुभावोऽस्य न देव विद्महे तवांघ्रिरेणुस्पर्शाधिकारः । यद्वांछया श्रीर्ललनाचरत्तपो विहाय कामान्सुचिरं धृतव्रता ॥३६॥नागिणी म्हणती अहो जी देवा । एवढा कवण सुकृतठेवा । आम्ही नेणों याचिया दैवा । कीं या अधिकार व्हावा पदरजीं ॥४४०॥याचिया कोण्या पुण्यप्रभावें । तवांघ्रिरेणूचें स्पर्शन व्हावें । एवढा अधिकार कोण्या दैवें । हें न चोजवे आम्हांसी ॥४१॥तपोदानव्रताचरणीं । नानानियम तीर्थाटनीं । विविधयज्ञपुरश्चरणीं । इत्यादिगुणीं अलभ्य ॥४२॥पदरजःस्पर्शाधिकार होय । एवढ्या सुकृताचा समुदाय । गांठीं नसतां भाग्योदय । कैसा काय ययाचा ॥४३॥हें अचिंत्य कृपावैभव । तुवां वोपिलें करूनि कींव । तुझा हा उपकारचि अपूर्व । एरवीं देव न पवती ॥४४॥हेचि कीं श्लोकीं व्युत्पत्ति । नागपत्न्या वाखाणिती । कीं ब्रह्मादिकां देवांप्रति । दुर्लभ हे प्राप्ति तपादिकीं ॥४४५॥असो ब्रह्मादिकांची कथा । वामांगवासें जे सनाथा । ते लक्ष्मीस एवढ्या अर्था । नाहीं सर्वथा पात्रता ॥४६॥जयेच्या प्रसादलेशासाठीं । इंद्रादिश्रिया कोट्यानुकोटि । भरती तपांचे संकटीं । परी दुर्लभ भेटी जयेची ॥४७॥ते मुख्य लक्ष्मीस आपण । ललितलावण्यें संपन्न । उत्तमलक्षणीं परिपूर्ण । ललना अभिधान या हेतु ॥४८॥तेही तवांघ्रिरेणुस्पर्शा । अधिकारसिद्धीची धरूनि आशा । तपादि साधना सक्लेशा । श्री परेशा आचरे ॥४९॥सांडूनि सकळ विषयकाम । सुष्ठु वृत्तादि धरूनि नेम । चिरकाळ चिंती श्रीपादपद्म । होऊनि सहमदमसंपन्न ॥४५०॥अद्यापि फलसिद्धीचा समय । ब्रह्मादि अमरांचा समुदाय । ऐसाचि इच्छिती भाग्योदय । परी त्यां न होय अपैता ॥५१॥कमलाप्रमुखां दुर्लभ प्राप्ति । तो भाग्योदय सर्पाप्रति । कोण्या सुकृतें हें तर्कितां चित्तीं । कोणाप्रति न तर्के ॥५२॥केवळ तुझा कृतोपकार । एथ न घडो आन विचार । म्हणसी ब्रह्मादि पदें याहूनि थोर । तरी तीं अवर याहुनी ॥५३॥न नाकपृष्ठं न च सार्वभौमं न पारमेष्ठ्यं न रसाधिपत्यम् ।न योगसिद्धीरपुनर्भवं वा वांछंति तत्पादरजःप्रपन्नाः ॥३७॥कां पां ब्रह्मादि पदें गौण । ऐसें स्वामी झणें म्हण । इतुकें ययाचें कारण । जे तव पदप्रपन्न नादरिती ॥५४॥जे तव चरणा शरणागत । तव पदध्यानें नित्य तृप्त । ब्रह्मादिपदें ते तुच्छ करित । यां संप्राप्त कां रमती ॥४५५॥नाकपृष्ठ म्हणिजे स्वर्ग । जो शतमखसुकृतें पाविजे भोग । असुकृतियां नोहे लाग । येर अयोग्य सामान्य ॥५६॥सुरतरसिकां रंभाप्रमुखा । चितारल्या भूमिका । चैत्रनंदनादि वाटिका । जेथींच्या लोकां क्रीडार्थ ॥५७॥अनर्घ्य रत्नांचे जेथ आकर । कल्पद्रुमाचे आगर । मन्मथरंगप्रजागर । नाहीं संचार निद्रेचा ॥५८॥लोकपाळ यूथपति । मंत्रादेष्टा बृहस्पति । वसुरुद्रादित्यपंक्ति । सेनासंपत्ति जेथींची ॥५९॥सौरभ्य उळिगी कुसुमाकर । चिकित्से अश्विनीकुमार । सामान्य सुरांमाजीं थोर । साध्य पितर विश्वप ॥४६०॥गंधर्वांचीं तानमानें । किन्नरांचीं मधुरगानें । अप्सरांचीं सुनर्तनें । लास्यरसिकां प्रिय मान ॥६१॥जेथ सर्वां सुधापान । सर्वां सर्वदा नवयौवन । कोणा न शिवे जरामरण । सिद्धि अंगण झाडिती ॥६२॥ऐरावत स्तंबेरम । उचैःश्रवा अश्वोत्तम । घरोघरीं कल्पद्रुम । सर्वां साम्य जे लोकीं ॥६३॥चंद्रा ऐसे अमृतकुंभ । सूर्यासारिखे सुप्रभ । सर्वां सर्वत्र सुखलाभ । नेणती क्षोभ विषमाचा ॥६४॥ऐसें जें कां नाकपृष्ठ । नापेक्षिती हरिपदनिष्ठ । म्हणती एथींचें जें जें इष्ट । तें तें दुष्ट अवघेंची ॥४६५॥विपरीत ज्ञानाचा जैं भ्रम । चढतां मद्यरूप जो कां काम । जीवात्मबुद्धीचें धरूनि प्रेम । मानी विश्राम इत्यादि ॥६६॥ते तव पदरजःप्रपन्न । जाणती मृगाम्भापरी शून्य । स्वप्रतीति हेळसून । दृढ श्रीचरण आश्रयिती ॥६७॥सार्वभौमतो मनुपुत्र । पार्थिवैश्वर्य ज्या स्वतंत्र । सप्तद्वीपांमाजि गोत्र । संततिमात्र जयाची ॥६८॥पादप्रपन्नातें तें न रुचे । आहळे काळाचेनि काचें । म्हणऊनि प्रेम श्रीचरणाचें । केलें जीवाचें जीवन ॥६९॥आतां पारमेष्ठ्याची पदवी । चौदा भुवनां जे नांदवी । स्वजागृति अवघें दावी । ते मावळवी निद्रेतें ॥४७०॥भरतां युगें अष्ट सहस्र । जेथींचें लोटे अहोरात्र । परी तें अवघें कर्मतंत्र । नाहीं स्वतंत्र स्वानंदें ॥७१॥जैशी नदीनदादिजळें । ओघीं धांवती अतिचपळें । त्यांसि स्वतंत्र कैंचें बळ । भरती घननीळ वर्षतां ॥७२॥तैसें रजोगुणाचें ज्ञान । तेणें प्रकटे विश्वाभिमान । तें तूं अंतर्यामीं चिद्धन । प्रकाशघन उजळिसी ॥७३॥बीजांतूनिच निघे मोड । भुसाकणांचा सरिसा जोड । परी त्या उभयत्र अपाड । गोडागोड विवरितां ॥७४॥तैसे तुझेनि ब्रह्मादिक । पारमेष्ठ्यादि अखिल लोक । जैसें जीवन आणि पंक । ऐक्यविवेक जाणावा ॥४७५॥जळ तें सर्वांचें जीवन । चिखल पितां पाविजे मरण । जीवनेंचि आलें चिखलपण । परी तें भिन्न विजातीय ॥७६॥यालागीं जें विपरीत ज्ञान । ज्यासि पारमेष्ठ्य हें अभिधान । जेथ ब्रह्मा विश्वाभिमान । विराज होऊन राहिला ॥७७॥तव पदरजाचें विस्मरण । तंववरी वाटे हें मंडन । भाग्यें होतां पदप्रसन्न । तेव्हां शून्य अवघें हें ॥७८॥ऐशी पारमेष्ठ्याची मात । भोगी भोग कायसे तेथ । ज्याची म्हणिजे रसाधिपत्य । ज्या प्राकृत वांछिती ॥७९॥मुळीं स्वप्नचि जरे लटिकें । तेथ जोडलें धन कैं टिके । तरी श्लाघे जें मूर्ख ही ठके । तैशीं अल्पकें तोषती ॥४८०॥आतां योगसिद्धीचा महिमा । साधूनि योगाच्या संभ्रमा । अंतरोनि आत्मारामा । धरिजे प्रेमा सिद्धीचा ॥८१॥सिद्धि प्रकटे योगबळें । त्यां मी अभिन्न हें तों न कळे । भेदें ऐश्वर्य पुंजाळे । भोगी सोहळे संकल्पें ॥८२॥लटिका मृगजळाचा पूर । त्यामाजीं जे जे पोहणार । निस्तरोनि पावले पार । तैसे साचार सिद्धादि ॥८३॥आतां पुनरावृत्तिवर्जन । अपुनर्भव ज्या म्हणती सुज्ञ । ते नेच्छिती पदप्रपन्न । अलीक जाणोन अवघें हें ॥८४॥बागुलाशीं पडेल ठाठी । म्हणोनि बाळा चिंता मोठी । मिथ्या बागुल कळल्या पोटीं । भयाची गोठी मग कैंची ॥४८५॥भवभ्रमासी नाहीं ठाव । तरी कायसा अपुनर्भव । यालागीं प्रपन्नसमुदाव । त्या हे माव रुचेना ॥८६॥पादरजा जे प्रपन्न । ते काय वांछिती ऐसें हीन । ऐसें पदरजोमहिमान । लाहती धन्य सभाग्य ॥८७॥ऐशिया नागपत्न्या चतुरा । सामें वर्णूनि हरिउपकारा । आतां श्रेष्ठत्व स्वभर्तारा । अभेदप्रकारा बोलती ॥८८॥अभेद सामीचें लक्षण चौथें । तेंचि यथार्थ वदती एथें । श्रेष्ठत्व आपुल्या नाथातें । पातिव्रत्यें प्रशंसिती ॥८९॥तदेष नाथाप दुरापमन्यैस्तमोजनिः क्रोधवशोऽप्यहीशः । संसारचक्रे भ्रमतः शरीरिणो यदिच्छतः स्याद्विभवः समक्षः ॥३८॥नागिणी म्हणती चक्रपाणि । आमुच्या नाथासमान कोणी । सभाग्य न देखों त्रिभुवनीं । तवांगनिवासिविधिसहित ॥४९०॥अनेक सुकृती देहधारी । भ्रमत होत्साते संसारीं । पदरजःप्राप्तीची सामग्री । अभ्यंतरीं वांछिती ॥९१॥ब्रह्मादिकांची पदाभिमानें । होऊनि गेलीं मूल्यमानें । लक्ष्मी न लभे चंचलपणें । पदरजोनिधानें श्रमतांही ॥९२॥ऐशी दुर्लभ सर्वांप्रति । पदरजःप्राप्तीची संपत्ति । भाग्यें लाभेल आमुचे हातीं । म्हणोनि वांछिती सर्वदा ॥९३॥ते हे एथ न प्रार्थितां । प्राप्त झाली आपुल्या कांता । लक्ष्मीशिवादि विधाता । असाम्य तुळितां येणेंशीं ॥९४॥तमोयोनि सर्पशरीर । दीर्घद्वेषी अमर्षपर । विवेकासी कैंचा थार । न वसे विचार शांतीचा ॥४९५॥ऐशिया आणि एवढी प्राप्ति । म्हणसी झाली कोणे रीती । तरी हे स्वामीची अपरमूर्ति । अभेदस्थिति उभयत्र ॥९६॥डावे हातींचें उजवे हातीं । घेतां साधनें कोणाप्रति । तुमची एकात्मतेची स्थिति । तैशी चित्तीं जाणतसों ॥९७॥मत्स्यकूर्मादि अवतार । जैसे अद्यापि असती स्थिर । तैसा हाही सर्पशरीर । परी साचार तव मूर्ति ॥९८॥आमुचा भर्ता कालिय फणी । त्याचे मुकुटीं तूं इंद्रमणि । तरलसी तेणें समस्तमूर्ध्नि । अमूल्यभूषणभूषित ॥९९॥अमूल्यभूषण ज्याचे मुकुटीं । त्याच्या भाग्या नोहे कीं ठी । ऐशीं रत्नें ज्याचे गांठीं । वरिष्ठ सृष्टीं तो धन्य ॥५००॥लक्ष्मी विधाता विधुभरण । ज्या रत्नाचें सन्निधान । न पवती ते ज्या मौळाभरण । त्या ते धन्य म्हणती कीं ॥१॥प्रभूहूनिही आमुचा कांत । वरिष्ठ ऐसें जाणे चित्त । अशुक्लभूषण मौळिधृत । म्हणोनि सेवित सुरसिद्ध ॥२॥सभाग्य रत्न कीं रत्नवंत । ऐसें जाणती विपश्चित । याचे भूषणीं तूं अनंत । तरी हा समर्थ तुजहूनी ॥३॥सामींचें अभेदलक्षण । प्रतिपादूनि नागिणीगण । पातिव्रत्यें वरिष्ठपण । वदल्या संपूर्ण निजनाथा ॥४॥खुपों नेदितां अंतरा । श्रेष्ठत्व दाविलें भर्तारा । पतिव्रता नागिणी चतुरा । जाणोनि श्रीधरा संतोष ॥५०५॥पतिव्रता कां उपासक । सद्गुरुभजनीं शिष्यतिलक । यांवीण उत्कर्षविवेक । येर मायिक नेणती ॥६॥नागिणी म्हणती चक्रपाणि । तुझी मूर्ति हे लावण्यखाणी । षड्वार्षिकी मौळाभरणीं । नाथालागूनि आमुच्या ॥७॥शतशः फणा विस्तीर्ण थोर । लंबायमान विशाळ गात्र । मौळ रत्न तूं कमलामित्र । शोभा विचित्र उरगाची ॥८॥ऐसा मौळमणीशीं मंडित । जे जे ध्याती आमुचा कांत । त्यांसि न बाधी अकाममृत्यु । हा इत्यर्थ एथींचा ॥९॥मौलमणि चक्रपाणि । नटनें तरळे फणारंगीं । ऐसा ध्याती कालियफणी । त्यांलागूनि विधि वंदी ॥५१०॥आतां पांचवें सामलक्षण । तें वर्णिती गुणकीर्तन । स्वनाथेंशीं प्रभु अभिन्न । स्तवनीं भावून वंदिती ॥११॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP