अध्याय १२ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततोऽतिकायस्य निरुद्धमार्गिणो हुद्गीर्णदृष्टेर्भ्रमतस्त्वतस्ततः ।
पूर्णोंऽतरंगे पवने निरुद्धो मूर्धन्विनिष्पाप विनिर्गतो बहिः ॥३१॥

त्यानंतरें रमावर । पर्वतप्राय जो अजगर । त्याचे कंठीं वाढला थोर । पवनद्वार बुजविलें ॥३६५॥
कंठीं वाढला गोपाळ तेणें कोंडला प्राणानिळ । झाला अघासुर व्याकुळ । करी तळमळ प्राणांतें ॥६६॥
नेत्र वाटारले भयंकर । गरगरा फिरती चक्राकार । पवनें पूर्ण अभ्यंतर । झाला असुर घाबरा ॥६७॥
आज्ञाचक्र निरोधिलें । कां कीं मुख विकासलें । ब्रह्मरंध्र संपूर्ण भरलें । मग उघडिलें मूर्ध्नीतें ॥६८॥
बळें करूनि मूर्ध्निभेद । बाहेर निघाला प्राणवृंद । पुढें वर्तला जो विनोद । तो तूं विशद परियेसीं ॥६९॥

तेनैव सर्वेषु बहिर्गतेषु प्रानेषु वत्सान्सुहृदः परेतान् ।
दृष्ट्या स्वयोत्थाप्य तदन्वितः पुत्रर्वक्त्रान्मुकुंदो भगवान्विनिर्ययौ ॥३२॥

अघामाजीं वत्सें वत्सप । प्राणेंद्रियेंशीं पावले लोप । तिहींशीं अघप्राणांचा कळप । मूर्ध्निमागें निघाला ॥३७०॥
बाहेर निघाले असतां प्राण । वत्सें वत्सप गतप्राण । अमृतदृष्टी त्या जीववून । काढी श्रीकृष्ण मुखमार्गें ॥७१॥
वत्सें वत्सपांसमवेत । मुखापासोनि श्रीकृष्णनाथ । बाहेर निघाला पैं तरित । जेंवी भास्वत घनीहुनी ॥७२॥

पीनाहिभोगोत्थितमद्भुतं महज्ज्योतिः स्वधात्मा ज्वलयदिशो दश ।
प्रतीक्ष्य खेऽवशितमीशनिर्गमं विवेश तस्मिन् मिषतां दिवौकसाम् ॥३३॥

पीन म्हणिजे अतिमांसळ । अजगरी कलिवर विशाळ । मूर्ध्ना भेदूनि चित्कल्लोळ । तेज बंबाळ निघालें ॥७३॥
परमज्योति जे महाद्भुत । रजतममळांपासूनि मुक्त । विरोधभजन प्रेमयुक्त । कृष्णस्पर्शें शोधिलें ॥७४॥
सांख्ययोगें क्रमें शुद्ध । निवडे तत्पद जें विशुद्ध । लक्षूनि लक्ष्यांश स्वतःसिद्ध । पावे प्रसिद्ध समरस ॥३७५॥
ते अघासुरज्योति त्वंपद । तत्पद प्रतीक्षा करी विशद । चरम देहींचा जो हृदय । आनंदकंद निवडला ॥७६॥
स्थिरावोनि नभपोकळीं । स्वतेजें दशांतें जे उजळी । सायुज्यपदातें न्याहाळी । सुरीं सकळीं ब्रह्मांडीं ॥७७॥
अजगरवदनींहोनि निर्गम । केव्हां करील पुरुषोत्तम । म्हणोनि अघासुराचें धाम । बसवूनि वोम लक्षीतसे ॥७८॥
तंव राक्षस वदनाबाहेरीं । वत्सवत्सपेंशीं । श्रीहरि । तेजःपुंज सहस्र करीं । जैसा तमाचा अरी प्रकटला ॥७९॥
विमानीं दिवौकसांच्या पंक्ति । परमाश्चर्य नयनीं पाहती । कृष्णीं अघासुराची ज्योति । सायुज्य मुक्ती पावली ॥३८०॥

ततोऽतिहृष्टाः स्वकृतोऽकृतार्हणं पुष्पैः सुरा अप्सरसश्च नर्तनैः ।
गीतैः सुगा वाद्यधराश्च वाद्यकैः स्तवैश्च विप्रा जयनिःस्वनैर्गणाः ॥३४॥

सायुज्य पावल्या अघासुर । सुरवर आनंदें निर्भर । स्वकार्यार्थ रमावर । अतितत्पर जाणोनि ॥८१॥
ज्यापासूनि अमरपंक्ति । रात्रंदिवस मरणा भीती । त्यांसी ओपूनि सायुज्य मुक्ति । साधिलें निगुती सुरकार्य ॥८२॥
स्वकार्यकर्ता जो श्रीकृष्ण । त्यातें अर्चिती निर्जरगण । आपुलाले विशेष गुण । कृष्णार्पण करिताती ॥८३॥
देव वर्षती दिव्य सुमनें । अप्सरा अक्रिती सुकीर्तनें गंधर्व गाती साभगानें । तानमाने किन्नरी ॥८४॥
ताल मृदंग विणावेणु । गति गमकें कला प्रविण । वाद्यकांदे विचित्र गण । करिती अर्पण निजविद्या ॥३८५॥
सात्वत पढती हरिचरित्रें । विष्णुसूक्तें नाना स्तोत्रें । वेदघोष महर्षिवक्त्रें ।स्तुतिस्तवन हरिप्रियें ॥८६॥
उपनिषद्भागीं सनकादि मुनि । स्तविती आनंदें गर्जोनि । उर्जित विजयघोष ध्वनि । सिद्धादिगणीं यक्षलक्ष्मी ॥८७॥
साध्य चारण किं पुरुष । कृष्णविजयाचा उत्कर्ष दुंदुभीचा प्रलयघोष । ब्रह्मांड घोष गाजविती ॥८८॥

तदद्भुतस्तोत्रसुवाद्यगीतिकाजयादिनैकोत्सवमंगलस्वानान् ।
श्रुत्वा स्वधाम्नोंऽत्यज आगतोंऽचिराद्दृष्ट्वा जगाम विस्मयम् ॥३५॥

ते अनेकद्भुत कृतोत्साह । गीतनृत्यवाद्यसमूह । स्वलोकां निकटिं भारतीनाहो । ऐकोनि पाहों प्रवर्तला ॥८९॥
विरातमूर्ध्नि तो सत्य लोक । ऐसा कोण सुकृती देख । कोणा पुण्याचा परिपाक । तो विवेक विपरावया ॥३९०॥
सत्वर भूतळा येऊनि स्वामिमहिमा विलोकूनि । परमाश्चर्य पावला मनीं । पद्मयोनि ते काळीं ॥९१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP