मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक ७ ते १० अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक ७ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ७ ते १० Translation - भाषांतर केचिद्वेणून्वादयन्तो ध्मांतः शृंगाणि केचन । केचिद्भृंगैः प्रगायन्तः कूजन्तः कोकिलैः परे ॥७॥कित्येक मधुर वाहती वेणू । ऐकोनि वैखरी धरी मौन । प्रणव ग्रासूनि मातृकागण । होय निर्गुण अनाहत ॥१६॥कृष्णसुखाच्या स्वानंदें । अनाहतप्रणव नांदे । अद्यापि योगी तेणें नादें । ब्रह्मानंदें डुल्लती ॥१७॥एक वाजविती विषाणें । संगीतसप्तस्वरांचिये खुणे । गंधर्व लाजोनि ठेले तेणें । सामगायनें पारुषलीं ॥१८॥तेथ स्थावरजंगम याति । तया नादसुखाची भोक्ती । वेगें उन्मन होऊनि ठाती । देहस्मृति विसरोनी ॥१९॥कित्येक कृष्णसारूप्यें भ्रमर । देखोनि रुंजती भ्रमराकार । तेथ होऊनि शिक्षापर । येर विकार विसरती ॥१२०॥सेवितां श्रीकृष्णचरणकमळें । वृत्तीसहित मन पांगुळे । तेणें देहस्मृति मावळे । ऐसिये कळे अनुकरिती ॥२१॥कमलगर्भासि न होतां ठावें । तेथिंचें सौरभ्य भ्रमरीं न्यावें । वेधें तन्मय होऊनि गावें । येणें लाघवें अनुकरिती ॥२२॥भृंगा ऐशी रुंजी करिती । कृष्णप्रेमें तन्मय होती । वेधें विसरोनि देहस्मृति । डुल्लताती स्वानंदें ॥२३॥पंचमस्वरीं कृष्णपिका । कूजतां वेध लागला एकां । ते पडकले तेथिंच्या सुखा । बाह्य कौतुका विसरोनि ॥२४॥कोकिळ कूजती माधवागमनें । माधवावीण धरिती मौनें । तैसें माधवगुणकीर्तनें । गाती गानें संवगडे ॥१२५॥वायस विषयिकाचिये खोंपे । कृष्णपिकांचें जोडपें । अज्ञाननिवृत्तीपर्यंत जपे । परी न लिंपे तत्कर्में ॥२६॥माधवागमनीं तेथूनि निवडे । पंचमस्वरें कूजे कोडें । माधवेंवीण जठरचाडे । चांचुवडे उमलीना ॥२७॥वायस विषयविष्ठा देखती । तियेच्या लाभें गलबला करिती । मांदी मिलवूनि भोंवतीं । मग विखुरती कश्मला ॥२८॥कैंचा नियम त्यां तामसां । उकरिती खटींच्या रक्तमांसा । कृमिकीटकां कणा कणिसां । दाही दिशा झोंबती ॥२९॥अपार वायसांच्या थाटी । सदोषउपसर्गें पीडिती सृष्टीं । वसंतेंवीण कोकिळा दृष्टी । न पडे दृष्टी हुडकितां ॥१३०॥काय खाती कोठें असती । हें न कळेचि कोणाप्रति । पंचमस्वरें माधवकीर्ति । गातां जगती तोषविती ॥३१॥ऐकोनि भेकाचें बहुभाषण । प्रावृट्काळीं धरिती मौन । माधवागमनीं मधुरनान । करूनि सज्जन तोषविती ॥३२॥ऐशी अनेक गुणसंपत्ति । देखोनि कृष्णाचे सांगातीं । कृष्णपिका ऐसे वृत्ती । आनंदती सप्रेमें ॥३३॥पक्ष्यादिकांपासूनि गुण । घेऊनि सांडिती जे अवगुण । ते कृष्णाचे पार्षदगण । प्रेमें श्रीकृष्ण गोंविती ॥३४॥विच्छायाभिः प्रधावन्तो गच्छन्तः साधुहंसकैः । बकैरुपविशंतश्च नृत्यन्तश्च कलापिभिः ॥८॥विहंगम मार्गाचे अभिव्यक्ति । छाया देखोनि धांव घेती । तेणें कृष्णासि उपजे प्रीति । निजविश्रांति ओपी त्यां ॥१३५॥एक वत्सप साधुवृत्ति । हंसचाली चालताती । अजपामार्गें सहजस्थिति । सोहंहंसा लक्षूनी ॥३६॥एक बकाचिये पैं रीती । सांडूनि लौकिकी प्रवृत्ति । मनमीनातें लक्षीं धरिती । करूनि वसति निजजीवनीं ॥३७॥दंभें वाढवी शब्दज्ञान । दंभें प्रियकरें मानी जन । प्रतिष्ठापिंजरीं गोवून । विषयदानें रक्षिती ॥३८॥ऐशी पडोनि ठेलिया गुंती । खुंटे चिद्गगनींची गति । पराधीन दुःखावर्ती । कीर पडती मुखदोषें ॥३९॥ऐसें जाणोनि मौनस्थिति । ध्यान धरूनि बक राहती । आंवरूनि इंद्रियवृत्ति । सुख भोगिती स्वानंदें ॥१४०॥तृष्णा स्वार्थ पक्ष दोन्ही । निश्चळ बैसले आवरूनी । दैवाधीन तनु वर्तनीं । मुद्रा नयनीं निस्पृहता ॥४१॥अगत्य शरीरनिर्वाहमात्र । व्यावया चंचळ करी गात्र । उरल्या काळें सुख स्वतंत्र । स्थिति विचित्र बकाची ॥४२॥म्हणोनि बकासारिखे एक । बैसोनि होती अंतर्मुख । कृष्णप्राप्तीचें चित्सुख । गडी अमनस्क सेविती ॥४३॥एक मेघश्यामगुणीं । मयूर झाले घनगर्जनीं । नाचती अष्टांगें पसरूनी । ढळती नयनीं बोधाश्रु ॥४४॥सात्त्विकाष्टकीं पसरूनि पक्ष । अंतर्मुख श्रीकृष्णलक्ष्य । आनंदाश्रु भरूनि अक्ष एक मुमुक्षु नाचती ॥१४५॥विकर्षंतः कीशवालानारोहंतश्च तैर्द्रुमान् । विकुर्वंतश्च तैः साकं प्लवंतश्च पलाशिषु ॥९॥फलाशासकामकर्मठ । द्रुमीं देखोनि मर्कट । त्याच्या चेष्टा दाविती स्पष्ट । स्वयें संतुष्ट हरिप्रेमें ॥४६॥धरूनि वानरांची पुसांटीं । बळें ओढिती त्या तळवटीं । तयाचि सरिसे दाटोदाटीं । द्रुमीं जगजेठी वळघती ॥४७॥दांत काढूनि वानरांपरी । पिलंगूनि गर्जती भुभुःकारीं । उड्या घेती द्रुमावरी । वानरांपरी देव्हडिया ॥४८॥डोळे करूनि भिगूळवाणें । नाकें पसरिती ओष्ठस्फुरणें । दांत विचकूनि वदनें । दश दिशा लक्षिती * ( कपि अनुकरणे दाविती ॥४९॥ ) ॥४९॥फळें डांसळोनि पाहती डोळां । टाकूनि झोंबतो आणिकां फळां । ऐसे विकार गोळांगुळां । वत्सप खेळा दाविती ॥१५०॥( पैठण पोथींतील श्लोक - दोहि हाती दोहि कुसी । खाजविती लाघवेसी । ऊर्ध्व पाहती आकासी । दचकोनी दशदिशा लक्षिती ॥१५०॥ ) साकं भेकैर्विलंघंतः सरित्प्रस्रवसंप्लुताः । हसंतश्च प्रतिच्छायाः शप्म्तश्च प्रतिस्वनान् ॥१०॥सकाम बेडुकाचे परी । याज्ञिक निमज्जती संसारीं । गुंतलें असतां षड्विकारीं । मानिती घरीं अमरत्व ॥५१॥सकाम इष्टीचिय अंतीं । होमशाळेंत बेडुकाकृति । उडोनि मानिती ऊर्ध्वगति । उपहासती त्यां एक ॥५२॥संसारसरिताप्रस्रवोदकीं । तरोनि फिरोनि मारिती डुबकी । देवत्व पावोनि बुडती नरकीं । कर्दममुखीं भक्षिती ॥५३॥त्याचे करूनि उपहास । वत्सप दाविती विन्यास । एक आपुल्या प्रतिबिंबास । सविकरा हाम्सती ॥५४॥प्रतिबिंबोनि अविद्याजळीं । विपरीत बोधें भासले तळीं । आपल्या आपण भेदबहळी । करिती रळी क्षोभोनि ॥१५५॥गायक गायका उपहासिती । पंडित पंडितां शब्द ठेविती । मांत्रिक मांत्रिकांतें छळिती । परी नातळती प्रतिबिंब ॥५६॥मल्ल मल्लां पडखळिती । शूर शूरां पडिताळिती । अविद्या बिंबत भेदभ्रांतीं । अभेद नेणती आपणा ॥५७॥एक सिद्धांती हाक मारूनि । पोरोवपक्षाच्या प्रतिस्वनीं । क्षोभोनि शापिती धिक्कारूनी । तूं मी म्हणोनि गर्जती ॥५८॥अथातो ब्रह्मजिज्ञासा । ऐशिया गर्जे दिर्घ घोषा । तेथ प्रतिध्वनि धर्मजिज्ञासा । ऐकोनि आवेशा चडताती ॥५९॥तूं तूं म्हणोनि धिक्कारिती । बाष्कळ म्हणोनि प्रक्षोभती । निष्फळ म्हणोनि गर्जती । ऐसे शापिती प्रतिस्वना ॥१६०॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP