मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक १३ ते १४ अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक १३ ते १४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १३ ते १४ Translation - भाषांतर अथाघनामाऽभ्यपतन्महासुरस्तेषां सुखक्रीडनवीक्षणाक्षमः ।नित्यं यदन्तर्निजजीवितेप्सुभिः पीतामृतैरप्यमरैः प्रतीक्ष्यते ॥१३॥वयस्य क्रीडतां श्रीकृष्णेशीं । देखतां संतोष सुरनरांसी । तेणें जळे निजमानसीं । देखावयासी अक्षम ॥४६॥पतंग देखों न शके दीप । कीं ते शूर्पनखी जानकीरूप । कीं शिवक्रीडेतें कंदर्प । देखोनि कोप प्रज्वळी ॥४७॥सन्मार्ग देखों न शके दुर्जन । कीं श्रीमंतातें दस्युगण । पतिव्रतेचें शुद्धाचरण । जेवीं स्त्रैण न साहे ॥४८॥तेवी कृष्णेंशीं कृष्णसखे । क्रीडतां अघात्मा देखों न शके । प्रयत्नीं पडला महा तवकें । सहोदरदुःखें दाटोनि ॥४९॥जया अघाच्या भयासाठिं । अमर सदा धाकटी पोटीं । कैसेनि मरे हा दुष्ट कपटी । कोणी जगजेठी न वधी या ॥२५०॥ज्यापासूनि मरणधाक । अमर वाहती साशंक । अक्षयाचा विवेक । कोणा निष्टंक स्फुरेना ॥५१॥कोणापासूनि हा दुर्जन । कैसेनि कोणा यत्नें करून । कोणे कालीं पावे मरण । हें सुरगण लक्षिती ॥५२॥निज जीवितरक्षणीं सादर । अमरही पाहती ज्याचें छिद्र । तो कृष्णक्रीडा देखोनि असुर । महाक्रूर क्षोभला ॥५३॥ते कृष्णक्रीडा म्हणाल कैसी । देव देखोनि निज मानसीं । नित्य करिती आकांक्षेसी । तें परियेसीं नृपवर्या ॥५४॥अमृत पिऊनि अमर झालों । परंतु हरिप्रेमा मुकलों । स्वर्गभोगें बंदीं पडलों । अंतरलों या हरिसुखा ॥२५५॥अमृतपानें जीवित सफळ । मूर्ख मानिती पैं केवळ । कृष्णलीलास्मरणशील । चित्सुखकल्लोळ भोगिती ॥५६॥भगवल्लीलामृताचें पान । करूनि झाले जे सुमन । ब्रह्मादि देव त्यां करिती नमन । पुनरावर्तन वर्जित ॥५७॥म्हणोनि जीविताशा धरूनि । अमर झाले अमृतपानी । ते इच्छिती मरणालागूनि । लीला वदनीं गावया ॥५८॥अमर म्हणती मरोनि जावें । मान्वलोकीं जन्म घ्यावें । श्रीकृष्णाचें कीर्तन गावें । नित्य प्यावें लीलामृत ॥५९॥अंगीं असतां अमरपण । कां पां न करिती कृष्णकीर्तन । कासया इच्छिती अमर मरण । हें विचक्षण परिसोत ॥२६०॥मत्स्य चालों न शके भूमी । मनुष्य वलघों न शके व्योमीं । पक्ष्या ऐसा न उडे कृमी । अविकें द्रुमीं न चढती ॥६१॥तेंवी अनेक यज्ञाचरणें । देवपणाचें लेइलें लेणें । ते योनीच्या विषयाविणें । अन्य सेवन घडेना ॥६२॥जैशी मानवां मिथुनीं रति । तैशी न घडे पक्ष्यांप्रति । नेत्रद्वारा केकी रमती । जळीं क्रीडती गजमिथुनें ॥६३॥तैसें देवासी सुधापान । सुख सुरगणमिथुनें । चैत्ररथनंदन क्रीडनें । स्रक्चंदनसुख वाढे ॥६४॥कैवल्यदायक कळल्यावरी । कां पां कीर्तन न किजे सुरीं । लाभ जाणोनि अव्हेरी । ऐसी परी न देखों ॥२६५॥तरी देखोनि पक्ष्यांची नभोगाति । मनुष्या दुर्लभ कळल्या चित्तीं । अभ्यासितां न चढे हातीं । तेवीं देवांप्रति वैराग्य ॥६६॥सुकृताधिक्यें स्वर्गसुख । दुष्कृताधिक्यें दुःखनरक । निष्कामकर्में वैराग्य देख । अप्राप्य अचुक परस्परें ॥६७॥हस्तापासूनि सुटतां शरे । ओढीपर्यंत गगनां भरे । मध्यें कोणाच्या प्रार्थनादरें । मागुता फिरे हें न घडे ॥६८॥कीं चंद्रज्योति नळे बाण । द्रव्यें भरलीं भिन्नभिन्न । अल्प चेतल्या थांबवीन । म्हणोनि यत्न न चाले ॥६९॥चंद्रज्योतीचा नव्हे बाण । नळा बाणाचा नोहे जाण । तेंवी अनिष्टमिष्टमिश्राचरण । फळ संपूर्ण भोग दे ॥२७०॥इष्टफळार्थ जन्मले स्वर्गीं । वैराग्य दुर्लभ तयालागीं । विरक्तीवीण हे वावुगी । म्हणती अवघी सुरतनु ॥७१॥यालागीं अमर इच्छिती मरण । म्हणती मृत्युलोकीं जन्मून । विषयीं विरक्त होऊन । कृष्णभजनसुख भोगूं ॥७२॥ऐशी कृष्णक्रीडा देखोनि दिठी । देव उत्कंठा धरिती पोटीं । हें देखोनि जळे कपटी । दैत्य हटी अघनामा ॥७३॥दृष्ट्वाऽर्भकान्कृष्णमुखानधासुरः कंसानुशिष्टः स बकीबकानुजः । अयं तु मे सोदरनाशकृत्तयोर्द्वर्योरथैनं सबलं हनिष्ये ॥१४॥कृष्णादि अर्भकांतें देखोनि । अघासुरें मनीं विवरोनि । ते ग्रासावया सर्प होऊनि । पथीं शयन तो करी ॥७४॥ऐसा अन्वय तृतीया श्लोकीं । संबंध ये वैशेषिकीं । आतां आरब्धपदीं पृथकीं । व्याख्या विवेकीं परिसावी ॥२७५॥आधींच मोह अघासुर । अनेक अघांचा गिरिवर । अहंकंसें बोधूनि वैर । करूनि क्रूर प्रेरिला ॥७६॥पूतना बहिणी बंधु बक । कृष्ण दोघांचा घातक । त्यांसी वधूनि वैर कलंक । फेडी निष्टंक आपुला ॥७७॥ऐसें कंसें देऊनि पुट । कृष्णहननार्थ पापिष्ट । प्रेरिला तेणें धरिली वाट । महाकपटें करूनि ॥७८॥दैवानुसार सर्वां मरण । निमित्त वैरासी कारण । मोहा चेतवी अभिमान । तैं अन्योन्य तो करी ॥७९॥होणार तैसें होऊनि गेलें आयुष्यक्षयीं प्राणी मेले । निमित्तमात्र एका केलें । तें निरसिलें विवेकें ॥२८०॥निमित्तधारी न मारितां । तरी काय प्राणी मरत होता । निमित्त देऊनि एकमाथां । काळ ग्रासिता सर्वांतें ॥८१॥ऐशा विवेकें मोह निरसे । अहंकारें तो आवेशे । अविवेकबळें रागद्वेषें । महारोषें फुंपाटे ॥८२॥बक बकीचा सहोदर । अहंकंसाचा ऐकोनि मंत्र । कुपथ्यें खवळे जीर्णज्वर । तेंवी असुर क्षोभला ॥८३॥कृष्णप्रमुख गोपकुमार । क्रीडतां देखोनि अघासुर । अग्रजवधाचें स्मरोनि वैर । करी विचार तो ऐका ॥८४॥पूतना बक मारिले गाढे । तो हा मारीन त्याचेनि सुडें । सहित वत्सेंशीं मग निवाडे पहुडेन ॥२८५॥माह्या अग्रजाचा अंतक । आजि हा मारीन सहित कटक । हेचि अग्रजा तिळोदक । येर व्रजौकस शव तुल्य ॥८६॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP