मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर तावत्प्रविष्टास्त्वसुरोदरांतरं परं न गीर्णाः शिशवः सवत्साः । प्रतीक्षमाणेन बकारिवेशनं हतस्वकांतस्मरणेन रक्षसा ॥२६॥पुढें घालूनि वत्सें सकळ । मागें वत्सपांचा मेळ । असुरवदनीं उतावीळ । झाले तत्काळ प्रविष्ट ॥२९॥कोणी स्वेच्छें विवरीं रिघती । त्यांसी वर्जितां फिरोनि निघती । तेंवी वत्सपां श्रीपति । कां पां मागुतीं न बाहे ॥३३०॥तरी हें तैसें नव्हे राया । वत्सप वदनीं प्रवेशलिया । असुरें ग्रासूनि नेता विलया । गरें आहळून राहिले ॥३१॥पूतना बकातें जो मारी । तो कां नये अजूनिवरी । म्हणोनि कृष्णाची प्रतिक्षा करी । वैर अंतरीं स्मरोनि ॥३२॥एवं बकारिप्रवेशप्रतीक्षा करितां । तेणें वत्सवत्सपां समस्तां । ग्रासिलें देखोनि रमाकांता । आली द्रवता कारुण्यें ॥३३॥तान्वीक्ष्य कृष्णः सकलाभयप्रदो ह्यनन्यनाथान्स्वकरादवच्युतान् ।दीनांश्च मृत्योर्जठराग्निघासान् घृणाऽर्दितो दिष्टकृतेन विस्मितः ॥२७॥मामकातें मोह गिळी । तेव्हां वृथा मद्योगशैली । म्हणोनि कळवळिला हृत्कमळीं । श्रीवनमाळी जगदात्मा ॥३४॥ऐकोनि विधीचें प्रार्थन । ज्याचें सकळांसी अभयदान । अघें ग्रासितां त्याचेचि स्वगण । श्रीकृष्ण विस्मयें दाटला ॥३३५॥अमृतासीच आलें मरण । कल्पतरूसी पातलें दैन्य । हिंवें कांकडला हुताशन । कीं उष्णें जीवन तान्हेलें ॥३६॥तैसे कृष्णेंवीण जे अनाथ । म्यां श्रीकृष्णें जे सनाथ । त्यांतें गिळिता झाला दैत्य । दैव विपरीत हें कैसें ॥३७॥सकळां अभयद माझें नांव । त्या मज कृष्णाचे अवयव । गिळिता झाला अघदानव । हें लाघव दैवकृत ॥३८॥आपुला जेथ न पवे हात । तेथ वत्सपवत्सेंसहित । शिरकले देखोनि श्रीअच्युत । हृदयीं द्रवत कारुण्यें ॥३९॥अज्ञान बाळक धरिलें करीं । तें जेंवी गळोनि पडले विहिरीं । भक्तकारुण्यें श्रीहरि । द्रवे अंतरीं तैसाची ॥३४०॥मृत्युजठराग्नीवरी तृण । जळे वत्सें वत्सप गण । परम दीन जे अज्ञान । देखोनि सघृण कळवळिला ॥४१॥आतां एथ कोण उपाय । मनीं विवरी देवकीतनय । दैत्यां भय स्वजनां अभय । ओपी सदय तें ऐका ॥४२॥कृत्यं किमत्रास्य खलस्य जीवनं न वा अमीषां च सतां विनाशनम् ।द्वयं कथं स्यादिति संविचिंत्य तज्ज्ञात्वाऽविशत्तुंडमशेषदृग्घरिः ॥२८॥वत्सवत्सप गिळिले येणें । प्रतीक्षा करी मजकारणें । एथ उपाय कैसा करणें । हें श्रीकृष्णें विवरिलें ॥४३॥या दुष्टाचें जीवित न थरे । आणि स्वकीयामाजीं कोणी न मरे । हें द्विविध कार्य एकसरें । कोणा विचारें साधेल ॥४४॥ऐसें लाघव विचारूनी । निश्चय करूनि अंतःकरणीं । सर्वद्रष्टा चक्रपाणि । अघावदनीं प्रवेशला ॥३४५॥मोहअघासुरापोटीं । प्रवेशोनिया जगजेठी । स्वकीय जीववी कृपादृष्टी । मारी कपटी अघनामा ॥४६॥हें नेणोनि त्रिभुवनीं । कृष्ण पडला अघावदनीं । हाहाकारें आक्रोशध्वनि नरसुरगणीं वाजिला ॥४७॥तदा धनच्छदा देवा भयाद्धाहेति चुक्रुशुः । जहृषुर्ये च कंसाद्याः कौणपास्त्वघबांधवाः ॥२९॥तेव्हां विमानयानीं देव । मेघाआडूनि पाहती सर्व । अघें गिळितां श्रीकेशव । त्यांचे जीव घाबिरले ॥४८॥हाहाकारें शोक करिती । विपरीत कैशी कर्मगति । केवढी राक्षसाची शक्ति । अघें श्रीपति ग्रासिला ॥४९॥आतां कोण करील भूभारहरण । आणि हें धर्मसंस्थापन । साधुजनांचें पालन । निर्बर्हण असुरांचें ॥३५०॥ऐसे सशोक झाले देव । हर्ष पावले असुर सर्व । कौणपादि अघबांधव । दुर्मानव कंसादि ॥५१॥अघें कृष्ण गिळिला वनीं । दैत होते आपुले स्थानीं । कैसें कळलें त्यालागूनी । काय म्हणोनि हरिखले ॥५२॥तरी आच्छादिलिया श्रीकृष्णतरणी । तमें दाटली गगनधरणी । दैत्य जंबुकादि श्वापदश्रेणी । ते स्वसदनीं तोषले ॥५३॥जेव्हां देवता होती म्लान । तेव्हां दैत्यांसि उत्साह पूर्ण । जेवीं चांदणां तोषती सज्जन । दस्यु दुरजन काळवखा ॥५४॥एकें स्वातीच्या वृष्टिजळीं । पिकिजे कर्पुरादि मुक्ताफळीं । विषोत्पत्ति वृश्चिकव्याळीं । अविकल्पिही नाशिती ॥३५५॥तैसा गिळिता हृषीक्श । देवां दुःख दैत्यां तोष । म्लानामान उभयतांस । यश अपयश स्वभावें ॥५६॥कुणप म्हणजे प्रेत जाण । त्यातें करितीं जें प्राशन । ते कौणप म्हणिजेत राक्षसगण । कंसादि जाण अघबंधु ॥५७॥नैरृत्य कोणपांचा अधिपति । तो कोणप शब्दें बोलिजे निरृति । त्याचे जे जे राक्षस होती । ते म्हणिजती कोणप ॥५८॥द्रुमल्य दैत्याचा रेतजात । तो हा केवळ कंसदैत्य । कालनेमीचा अवतार मूर्त । हें विख्यात तुज कथिलें ॥५९॥देवदैत्यांचा खेद मोद । ऐकोनि अतींद्रिय गोविंद । अघवधाचा केला विनोद । तो तूं विशद अवधारीं ॥३६०॥तच्छ्रुत्वा भगवान् कृष्णस्त्वव्ययः सार्भवत्सकम् । चूर्णीचिकीर्षोरात्मानं तरसा ववृधे गले ॥३०॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो हा श्रीकृष्ण भगवान । मनोगत अघाचें जाणोन । काय विंदाण आदरिलें ॥६१॥सर्वांतरीं ज्याचा वास । सर्व विदित सर्वज्ञास । स्वयें अव्यय त्या कैंचा नाश । जो हृषीकेश जगदात्मा ॥६२॥अघासुराचें मनोगत । अर्भकवत्सेंशीं श्रीकृष्णनाथ । चूर्ण करीन निमेषांत । हें हृदयस्थ हरि जाणे ॥६३॥आपणातें चूर्ण करूं । इच्छिता जो कां अघासुरु । त्याचे त्वरेहूनि सत्वरु । वाढे श्रीधरु तत्कंठीं ॥६४॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP