मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ११ वा| श्लोक ४१ ते ५० अध्याय ११ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ११ वा - श्लोक ४१ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ५० Translation - भाषांतर तं वीक्ष्य विस्मिता बालाः शशंसुः साधु साध्विति । देवाश्च परिसंतुष्टा बभूवुः पुष्पवर्षिणः ॥४१॥हें देखोनि बल्लवबाळ । परम विस्मित झाले सकळ । दैत्य मारिला महा विशाळ । म्हणती गोपाळ भला भला ॥३४॥संतोष झाला त्रिदशां मनीं । सुमनें वर्षती गगनींहूनी । कृष्णकीर्ति वदती वचनीं । दुंदुभिध्वनि गजरेंशीं ॥२३५॥ऐसें वत्सासुरमर्दन । व्रजीं बाळकीं केलें कथन । ऐकोनि गोपी गोपगण । विस्मयापन्न जाहले ॥३६॥तौ वत्सपालकौ भूत्वा सर्वलोकैकपालकौ । सप्रातराशौ गोवत्सांश्चारयंतौ विचेरतुः ॥४२॥आणीक कोणे एके दिवशीं । रामकृष्ण गोपाळेंशीं । निघाले वत्सें चारावयासी । निजमानसीं सुखभरित ॥३७॥जे अखिललौकैकपाळक । तिहीं घेऊनि वत्सपवेख । वत्सें चारिती सकौतुक । क्रीडा अनेक दावूनि ॥३८॥जाळिया सुरसान्नीं भरूनी । गडियांसहित रामकृष्णीं । वनभोजनाचे प्रीतीकरूनी । कंठीं घालूनि वागविल्या ॥३९॥गोवत्सांच्या पुढें हरि । मागें बलराम मुरारि । नाना क्रीडाकौतुकगजरीं । यमुनातीरीं विचरती ॥२४०॥स्वं स्वं वत्सकुलं सर्वे पाययिष्यंत एकदा । वत्वा जलाशयाभ्याशं पाययित्वा पपुर्जलम् ॥४३॥ऐसे सर्वदा क्रीडा करिती । तंव अपूर्व वर्तलें ऐक नृपति । आपुलाल्या वत्सांप्रति । जल समस्तीं पाजितां ॥४१॥रामकृष्णादि एके दिवशीं । जाऊनि जलाशयापाशीं । जल पाजूनि वांसुरासी । स्वइच्छेशीं ते प्याले ॥४२॥ते तत्र ददृशुर्बाला महासत्त्वमवस्थितम् । तत्रसुर्वज्रनिर्भिन्नं गिरेः शृंगमिव च्युतम् ॥४४॥तंव त्या जलाशयाच्या ठायीं । पक्षी एक विशाळदेही । गोपाळ देखोनि अवघेंही । त्रास हृदयीं पावले ॥४३॥जैसें महागिरीचें श्रृंग । वज्रघातें पावलें भंग । तैसा प्राणी विशाळ अंग । अचळ अभंग बैसला ॥४४॥त्यासि देखोनि त्रासले गडी । आली बहुतेकां हुडहुडी । वळली एकाची मुरकुंडी । पडली बोबडी मुखासी ॥२४५॥एक कांपती गदगदां । एक पडताती बदबदां । एक आश्रयिती गोविंदा । भयें अनुवादा न करूनि ॥४६॥राया म्हणसी तो पक्षी कवण । बकासुरनामा दैत्य जाण । पूतना अघ बक तिघें कठिण । विघ्नदारुण भावंडें ॥४७॥पूतना मारिली गोकुळीं । तें दुःख स्मरोनि हृदयकमळीं । बकासुरें मांडिली कळी । श्रीवनमाळी ग्रासावया ॥४८॥स वै बको नाम महानसुरो बकरूपधृक् । आगत्य सहसा कृष्णं तीक्ष्णतुंडोऽग्रसद्बली ॥४५॥तोचि बकासुर दारुण । कपटें बकाकृति धरून । जैसा बगळा गिळी मीन । तैसा कृष्ण गिळूं आला ॥४९॥कृष्ण देखोनियां समीप । अकस्मात घालूनि झडप । पतंग गिळूं धांवे दीप । तेंवि सकोप हरि गिळी ॥२५०॥वज्रपाय तीक्ष्ण तुंड । वेगें पसरूनियां प्रचंड । ज्यामाजीं अवघेंचि ब्रह्मांड । त्याचा पिंड तो ग्रासी ॥५१॥कृष्णं महाबकग्रस्तं दृष्ट्वा रामादयोऽर्भकाः । बभूवुरिंद्रियाणीव विना प्राणं विचेतसः ॥४६॥श्रीकृष्णातें ग्रासितां बक । देखोनि रामादिक अर्भक । प्राणेंविण इंद्रियादिक । विकळ अशेख ते तैसे ॥५२॥रामादि पडिले विचेष्टित । परी राम जाणे तच्चेष्टित । श्रीकृष्ण जैसें अनुष्ठित । अधिष्ठित स्वयें तेंची ॥५३॥तं तालुमूलं प्रदहंतमग्निवद्गोपालसूनुं पितरं जगद्गुरोः ।चच्छर्द सद्योऽतिरुषाऽक्षतं बकस्तुंडेन हन्तुं पुनरभ्यपद्यत ॥४७॥जिव्हा ओष्ठ तालुमूल । गिळितां कृष्ण लागला जाळूं । तेणें बक झाला व्याकुळू । लागला उगळूं कृष्णातें ॥५४॥कोमळ गौळियांचें बाळ । मानूनि गिळिता झाले खळ । तंव तो केवळ प्रलयानळ । कंठीं इंगळ पोळला ॥२५५॥जगाचा जनक जो विधाता । त्या विधात्याचा जो पिता । अग्नीमाजीं दाहकसत्ता । ते तत्त्वतां जयाची ॥५६॥केवळ जैसा प्रलयानळ । तैसा जाळितां कंठनाळ । तेणें बक झाला व्याकुळ । उगळी तत्काळ कृष्णातें ॥५७॥गिळिला तैसाची उगळिला । अक्षत भूमंडळीं पडला । कोठें नाहीं क्षति झाला । बक क्षोभला पुनरपि ॥५८॥क्रोधें टोंचूनि तीक्ष्णतुंड । करूं पाहे खंडविखंड । पुन्हा पसरोनि जाभाड । देऊनि झडप वर पडला ॥५९॥तमापतन्तं स निगृह्य तुंडयोर्दोर्भ्यां बकं कंससखं सतां पतिः । पश्यत्सु बालेषु ददार लीलया मुदावहो वीरणवद्दिवौकसाम् ॥४८॥बकें मारितां सवेग झडें । श्रीकृष्ण प्रतापमार्तंडें । परमलाघवें स्वदोर्दंडें । धरिलीं जाभाडें निग्रहूनी ॥२६०॥कृष्णप्रियकर जे संवगडे । कृष्णाभोंवते मागें पुढें । घाबरे पाहती चोहोंकडे । दूरी देव्हडें ठाकूनी ॥६१॥तीक्ष्ण चंचूचे अधोर्ध भाग । निग्रहूनि धरितां बक । करी प्राणातें तगबग । लागवेग चालेना ॥६२॥पक्ष झाडि फडफडाटें । रोंवूं धांवे नखें तिखटें । सोडवूं पाहे निजमुखवटें । न सुटे हटें कष्टतां ॥६३॥कृष्णीं पडलिया वज्रमिठी । कैंची तेथूनि पुढती सुटी । द्वेषें मैत्रें पडल्या गांठी । लटक्या गोष्टी सुटकेच्या ॥६४॥कंसाचा जो प्राणसखा । कृष्णें धरितां तया बका । पाहतां निर्जरांचिया हरिखा । ब्रह्मा लेखा करूं न शके ॥२६५॥अवघे गोपाळ पाहतां क्षितीं । गगनीं विमानीं निर्जरपंक्ति । सर्वां देखतां कृष्णेंहातीं । बक निघातीं चिरियेला ॥६६॥जैशी निर्ग्रंथी तृणाची काडी । बाळ स्वलीला चिरूनि सांडी । तेंवि चंचूची जाभाडी । उघडूनि फाडी भक्तपति ॥६७॥चिरूनि केलीं दोन्ही शकलें । लटिकें कपट हरपोनि गेलें । असुरदेह विशाळ पडिलें । देखिलें तें सुरनरीं ॥६८॥तदा बकारिं सुरलोकवासिनः समाकिरन्नंदनमल्लिकादिभिः ।समीडिरे चानकशंखसंस्तवैस्तद्वीक्ष्य गोपालसुता विसिस्मिरे ॥४९॥तेव्हां सकल निर्जरगणीं । नंदनवनींच्या दिव्य सुमनीं । वृष्टि केली गगनींहुनी । नानास्तवनीं स्तविताती ॥६९॥नाना सूक्तीं जयजयकारीं । स्तवनीं स्तविताती बकारि । पुष्पवृष्टि करिती शिरीं । वाद्यगजरीं उत्साहें ॥२७०॥पवण पटह ढक्का शंख । अनेक दुंदुभि गोमुख । तंव वितंत तौर्यत्रिक । वाद्यें अनेक गर्जती ॥७१॥ऐसें देखोनि पशुपबाळ । कृष्णापाशीं मिळाले सकळ । देखोनि दैत्यदेह विशाळ । विस्मय केवळ मानिती ॥७२॥मुक्तं बकास्यादुपलभ्य दारका रामादयः प्राणमिवविन्द्रियो गणः । स्थानागतं तं परिरभ्य निर्वृताः प्रणीय वत्सान् व्रजमेत्य तज्जगुः ॥५०॥बकें गिळिला होता कृष्ण । तो त्याचिया मुखापासून । मुक्त झाला दैवेंकरून । आम्हां लागून सांपडला ॥७३॥इंद्रियवर्ग येतां प्राण । स्थानीं स्थानीं सचेतन । कीं अवर्षणीं वर्षतां घन । अवनि सतृण टवटवी ॥७४॥तेंवी रामादि वत्सपाळ । कृष्णा देखोनि उताविळ । आलिंगिती सप्रेमळ । सुखकल्लोळ पावती ॥२७५॥मग वत्सें एकवटूनि । अवघीं पाजूनिया पाणी । वत्सें सहित वृंदावनीं । येऊनि वदनीं हे गाती ॥७६॥व्रजीं सांगती वत्सपाळ । बळ पक्षियां अतिविशाळ । तेणें येऊनि तत्काळ । कृष्ण घननीळ ग्रासिला ॥७७॥पुन्हा उगळूनि टाखिला क्षिती । मारूं पाहे चंचुघातीं । चंचू धरोनि दोहीं हातीं । टाकी श्रीपति चिरूनी ॥७८॥कृष्णावरी उमलली फुलीं । पाउसाची सरी वरिखली । आणि वाजंत्रें वाजिन्नलीं । व्योमगर्भीं विचित्रें ॥७९॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP