अध्याय ११ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तत्तत्राद्यैव यास्यामः शकटान्युंक्त मा चिरम् । गोधनान्यग्रतो यांतु भवतां यदि रोचते ॥२६॥

ऐसें सुखकर वृंदावन । एथ उत्पातभय दारुण । यास्तव तेथ आजिच गमन । शकट जुंपून करूं चला ॥६७॥
विचारणा जे केली बरवी । मान्य कीजेल तुम्हीं सर्वीं । तरी गोधनें पुढें न्यावीं । त्वरा करावी समस्तीं ॥६८॥

तच्छ्रुत्वैकधियो गोपाः साधु साध्वितिवादिनः । व्रजान्स्वान्स्वान्समायुज्य ययू रूढपरिच्छदाः ॥३७॥

ऐकोनि तें उपनंदनवचन । एकचित्त बल्लवगण । सर्वीं संतोषें केलें मान्य । साधु म्हणोन गौरविला ॥६९॥
मग गोकुळवासिये सकळ । जावया लागीं उतावीळ । सिद्ध झाले पैं सकळ । शकटीं बैल जुंपूनी ॥१७०॥
गृहसमृद्धि सर्वोपकरणें । दांवीं दावनी पशुबंधनें । वत्सें बालकें धनें वसनें । घेऊनि प्रयाण आदरिती ॥७१॥

वृद्धान्बालांस्त्रियोः राजन्सर्वोपकरणानि च । अनस्स्वरोप्य गोपाला यत्ता आत्तशरासनाः ॥२८॥

शुक म्हणे गा कुरुभूषणा । गोप घेऊनि धनुष्यबाणा । पृष्ठीं तूण खङ्गें नाना । कटिप्रदेशीं बांधिलीं ॥७२॥
वृद्धें बाळें आणि स्त्रिया । अनेक सदनसामग्रिया । सर्वीं शकटीं भरूनियां झाले जावया सन्नद्ध ॥७३॥

गोधनानि पुरस्कृत्य शृंगाण्यापूर्य सर्वतः । तूर्यघोषेण महता ययुः सहपुरोहिताः ॥२९॥

पुढें करूनि गोधनथाट । मागें चालती मंद शकट । महावाद्यांचा बोभाट । बिरुद भाट वानिती ॥७४॥
श्रृंगें वाजती नानापरी । घन कांसोळ वंश मोहरी । पुरोहितेंशीं उत्साहगजरीं । गोपाळभारीं चालती ॥१७५॥

गोप्या रूढरथा नूत्नकुचकुंकुमकांतयः । कृष्णलीला जगुः प्रीता निष्ककंठ्यः सुवाससः ॥३०॥

नूतन कुचकलशांच्या व्यक्ति । वरी चर्चित कुंकुमकिंजल्ककांति । सालंकृता विराजती । गोपयुवती रथस्था ॥७६॥
महामूल्यें ग्रैवेंयकें । परिधानें अमूल्य अंशुकें । कृष्णलीला गाती मुखें । प्रेमोत्कृष्टें संतुष्टा ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP