मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८ वा| श्लोक ३२ ते ३५ अध्याय ८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३९ श्लोक ४० ते ५२ अध्याय ८ वा - श्लोक ३२ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३२ ते ३५ Translation - भाषांतर एकदा क्रीडमानास्ते रामाद्या गोपदारकाः । कृष्णो मृदं भक्षितवानिति मात्रे न्यवेदयन् ॥३२॥माता कोपोनि धर्षण करी । तेथील ऐश्वर्याची थोरी । नृपा निरोपी आश्चर्य भारी । शुकवैखरी ते ऐका ॥८६॥कोणे एके अपूर्वकाळीं । बलरामादिगोपाळबाळीं । मृत्तिका भक्षितो वनमाळी । मातेजवळीं हें कथिलें ॥८७॥अवघे खेळूं एकवट । मृत्तिका भक्षी हा कंबुकंठ । आम्हां वारितां नायके धीट । यालागीं बोभाट तुज कथिला ॥८८॥ऐसें उत्तर पडतां कानीं । परम स्नेहाळ अंतःकरणीं । बाळकाचे संरक्षणीं । मिथ्या कोपोनि ऊठिली ॥८९॥सा गृहीत्वा करे कृष्णमुपालभ्य हितैषिणि यशोदा भगसंभ्रांतप्रेक्षणाक्षमभाषत ॥३३॥मग ते कृष्णातें धरूनि करीं । ताडणा दुसरा कर उगारी । यशोदाताडणभयें हरि । सभय करी निज डोळे ॥३९०॥मृद्भक्षणें रोगोत्पत्ति । झणें होईल बाळकाप्रति । यालागीं कळवळोनि चित्तीं । धर्षीं हितार्थीं यशोदा ॥९१॥सभय हालती नेत्रपातीं । ग्लानि दाऊनि नेत्र भ्रमती । वामहस्त प्रतिकारार्थीं । आड श्रीपति वोडवी ॥९२॥सात्वतनिर्जरपरित्राणा । जो हस्त वोडवी वैकुंठराणा । तो यशोदाभयत्रासहरणा । निजरक्षणा वोडवी ॥९३॥सभय पाहे यशोदेकडे । कांहीं स्फुंदे कांहीं रडे । तनु संकोचें कांहीं दडे । मुखापुढें कर धरी ॥९४॥देखोनि भयभीत कुमार । पोटीं मृदु वरी निष्ठुर । यशोदा बोलिली उत्तर । जैसें हितकर भेषज ॥३९५॥कीं निगमोत्तमांगप्रबोध । करी विषयप्रवृत्तिबोध । कीं काम्यकर्मांचा निषेध । करी प्रसिद्ध सद्गुरु ॥९६॥मृषा सकोप प्रश्नोक्ति । धर्षण करी कुमराप्रति । निर्भर्त्सूनि यशोदा सती । बोले हितीं तें ऐका ॥९७॥यशोदा उवाच - कस्मान्मृदमदांतात्मन्भवान्भक्षितवान् रहः । वदन्ति तावका ह्येते कुमारास्तेऽग्रजोऽप्ययम् ॥३४॥दमन नाहीं इंद्रियग्रामा । ज्याचिया तो अदांतात्मा । पात्र करूनि ऐसिया नामा । तो परमात्मा संबोधी ॥९८॥यशोदा म्हणे रे अनावरा । किमर्थ मृत्तिका भक्षिसी कुमारा । कांहीं न्यून झालें उदरा । कीं होणारा सूचिसी ॥९९॥कीं पूर्वजन्मीं होतासि कमठ । म्हणोनि मृत्तिका लागे मिष्ट । कां हें आठवलें अरिष्ट । ताडणें कष्ट पावसी ॥४००॥कोणा नकळत एकांतीं । कां रे कृष्णा खादली माती । तुझे संवगडे वर्जिती । त्यांची उक्ति न मानिसी ॥१॥जरे तूं म्हणसी भक्षिली नाहीं । संवगडे तुझेचि सांगती पाहीं । तुझ अग्रज स्नेहाळ तोही । देतो ग्वाही प्रत्यक्ष ॥२॥ऐकोनि जननीचें भाषण । काय बोले करुणापूर्ण । आश्वासावया तिचें मन । करी विंदान तें ऐका ॥३॥नाहं भक्षितवानंब सर्वे मिथ्याऽभिशंसिनः । यसि सत्यगिरस्तर्हि समक्षं पश्य मे मुखम् ॥३५॥कृष्ण म्हणे वो जननीये । नाहीं मृत्तिका भक्षिली माये । यशोदा म्हणे लटिकें काय । सांगती जिये लेंकुरें ॥४॥कृष्ण म्हणे लटिकाचि आळ । मजवरी घालिती हे गोपाळ । तैसाचि मिथ्या बोले बळ । मी केवळ सत्यवादी ॥४०५॥अवघें ब्रह्मांड माझिये उदरीं । माती नुरेचि मज बाहेरि । ऐसिया अभिप्रायें श्रीहरी । सत्य वैखरी प्रतिपादी ॥६॥ज्याचें ऐश्वर्य अव्याहत । तो प्रतिपादी आपुलें सत्य । असंभावनापरिहारार्थ । निज सामर्थ्य प्रकटवी ॥७॥मातेसि म्हणे हीं लेंकुरें । बोलती तें जरी मानिसी खरें । तरी माझे मुखीं पाहे बरें । चित्तैकाग्रें सादर ॥८॥प्रत्यक्ष वदनीं पाहें दृष्टीं । मग तूं मजला ताडीं यष्टीं । मिथ्या अवघींच कारटीं । यांचे गोष्टीं न लागें ॥९॥ऐसें ऐकोनि बोलणें । यशोदा श्रीकृष्णातें म्हणे । माती खाऊनि नाहीं म्हणणें । धीटपणें कोठवरी ॥४१०॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP