मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ३९ श्लोक ४० ते ५२ अध्याय ८ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर त्वं हि ब्रह्मविदां श्रेष्ठः संस्कारान् कर्तुमर्हसि । बालयोरनयोर्नॄणां जन्मना ब्राह्मणो गुरुः ॥६॥वेदविहित जें धर्माचरण । षोडश कर्में मीमांसज्ञ । समाधीपर्यंत ब्रह्मज्ञान । तूं श्रेष्ठ तपोधन ब्रह्मवेत्ता ॥९२॥ज्योतिःशास्त्राचा तूं ब्रह्मा । भाग्यें जोडलासि कल्पद्रुमा । उभयकुमारांच्या संस्कारकर्मा । द्विजसत्तमा संपादीं ॥९३॥उभयकुमारांचें नामकरण । करावयासि समर्थ पूर्ण । आहेसि म्हणोनि हें कारण । अंतःकरण सूचवी ॥९४॥जरी तूं म्हणसी गुरूचें कृत्य । यदर्थीं ऐकें गा निवांत । मनुष्यमात्रांचा श्रीगुरु सत्य । श्रुतिसंमत ब्राह्मण ॥९५॥ऐकोनि व्रजपतीची वाणी । गर्ग तोषला अंतःकरणीं । आतां तत्कार्य आचरणीं । रहस्यकरणी बोधितों ॥९६॥गर्ग उवाच - यदूनामहमाचार्यः ख्यातश्च भुवि सर्वदा । सुतं मया संस्कृतं ते मन्यते देवकीसुतम् ॥७॥पाया शोधूनि घालिजे भिंती । साक्षमुद्रापत्रें वृत्ति । श्रुतिप्रणीतकर्मप्रवृत्ति । शोधूनि करी सर्वज्ञ ॥९७॥प्रवर शोधूनि कीजे लग्न । कीं भूमि शोधूनि कीजे यज्ञ । तेंवि नंदाचें अंतःकरण । शोधी दाऊनि बिभीषा ॥९८॥न शोधितां अंतःकरण । उपदेशिलें ब्रह्मज्ञान । तें अवघेंचि वृथा जाण । जेंवि गुळें पाषाण माखिला ॥९९॥ब्रह्मज्ञान तो दुर्लभ सत्य । परी सामान्यही जे जे वस्त । शुद्धतेवीण होय व्यर्थ । सर्व कार्यार्थ सर्वदा ॥१००॥पात्र न शोधितां पय । सांठविलें तें नासोनि जाय । क्षेत्रशुद्धीवीण काय । बीज होय सफळित ॥१॥एथ नंदाचें अंतःकरण । दृढाविजे हेंचि शोधन । यदर्थीं गर्ग विचक्षण । बोले वचन तें ऐका ॥२॥गर्ग म्हणे व्रजनायका । संस्कार करविसी निजबाळकां । एथें असे एक आशंका । ते करीं विवेका माजिवडी ॥३॥मी यदुकुळींचा पुरोहित । संस्कारितां तुझा सुत । कंसें ऐकिल्या हा वृत्तांत । महा अनर्थ होईल ॥४॥कोण सांगेल कंसापाशीं । ऐसें प्रत्युत्तर जरी देसी । तरी मी विख्यात त्रिजगासी । गोष्टी ऐसी लोपेना ॥१०५॥संस्कारकर्मोत्सवाच्या ठायीं । याचकवर्ग मिळेल पाहीं । सूत मागध ठायीं ठायीं । गोष्टी कांहीं फांकविती ॥६॥वाद्यगीतनृत्यकारें । गोष्टी फांके येणें द्वारें । भूरि संभावना आदरें । येती सत्पात्रें तव गृहा ॥७॥त्यांसि विदित माझें ज्ञान । सर्वत्र करिती ते प्रशंसन । गर्गें संस्कृत नंदन । म्हणती धन्य व्रजपति ॥८॥ऐशिया द्वारें फांकेल गोष्टी । झणीं ऐकेल दुष्ट कपटी । तेव्हां वितर्क करील पोटीं । क्रूर रहाटी तयाची ॥९॥म्हणसी कंसासी कळोनि काय । त्याचा ऐसा अभिप्राय । मी यादवांचा आचार्य । मोथें भय इतुकेंचि ॥११०॥म्यां संस्कारिल्या बाळक । मानील वसुदेवाचें तोक । एथ तूं जरी करिसी तर्क । रोहिणी अर्भक म्हणूनि ॥११॥रोहिण्यादि अनेक प्रमदा । वसुदेवासि म्हणसी नंदा । एक देवकीतनय कैंचा कदा । तरी ऐक भेदा येथींच्या ॥१२॥कंसः पापमतिः सख्यं तव चानकदुंदुभेः । देवक्या अष्टमो गर्भो न स्त्री भवितुमर्हति ॥८॥पापमति हा कंसासुर । केवळ विकल्पांचा सागर । म्हणे देवकीचा अष्टम कुमार । स्त्री होणार न कदा तो ॥१३॥याचि कार्यासी अनेक चार । प्रेरूनि सूक्ष्म समाचार । करी गवेषणा विचार । चिंतातुर सर्वदा ॥१४॥तुजशीं वसुदेवाशीं सख्य । तो हें रहस्य जाणे मुख्य । हे गोष्टी कथितांचि वार्तिक । करील तर्क दुष्टात्मा ॥१५॥कंस निर्मथना प्रेरी चार । ऐक तयाचा विचार । देवकीकुमारीचा संहार । करूं असुर प्रवर्तला ॥१६॥तंव गगना गेली ते खेचरी । कंस खोंचला अंतरीं । त्यातें म्हणे तुझा वैरी । स्थळांतरीं वाढतसे ॥१७॥तिचें वचन मानूनि सत्य । चार हरे लावूनि गुप्त । शोध करी अतंद्रित । तो हे मात ऐकतां ॥१८॥इति संचिंतयन्श्रुत्वा देवक्या दारिकावचः । अपि हंतागताशंकस्तर्हि तन्नोऽनयो भवेत् ॥९॥म्हणेल देवकीचा अष्टम सुत । नंदसदनीं वाढे गुप्त । तरीच गर्गें संसारकृत्य । जाऊनि तेथ सारिलें ॥१९॥ऐशी शंका गेलिया मनीं । जरी तो प्रवर्तला बालहननीं । तैं एवढी अन्यायकरणी । आम्हांपासूनि घडली कीं ॥१२०॥जाणोनि एवढा अन्याय । आम्हीं करणें हें उचित काय । ऐसें म्हणतां मुनीचे पाय । बल्लवरायें वंदिलें ॥२१॥नंद उवाच - अलक्षितोऽस्मिन् रहसि मामकैरपि गोव्रजे । कुरु द्विजातिसंस्कारं स्वस्तिवाचनपूर्वकम् ॥१०॥नंद म्हणे गा द्विजोत्तमा । विश्वप्रिया अमृतोपमा । मम कल्याणीं विशेष प्रेमा । ऐसें आम्हां जाणवलें ॥२२॥जितुका केला हितोपदेश । तो मज अमृताहूनि विशेष । तथापि मानसीं एक आस । ते निराश न करावी ॥२३॥संशय कथिला यथार्थ । परंतु माझा मनोरथ । तो प्रूण केलिया कृतार्थ । झालों सत्य मुनिवर्या ॥२४॥तुजसारिखा महानुभाव । भेटला म्हणूनि सफळ दैव । पूर्ण करोनि मनोभाव । करीं सदैव मजलागीं ॥१२५॥अवश्य संस्कार द्विजातीसी । मूर्ति जोडिली तुम्हां ऐशी । स्वमंत्रें माझिया कुमारांसी । गुप्तत्वेंसि संस्करीं ॥२६॥स्वस्तिवाचनपूर्वक । विधि संपादीं सम्यक । बाह्य लौकिक तौर्यत्रिक । सहसा दांभिक नकरीं मी ॥२७॥मामकांसी न पडे ठावें । जेथ वायूचा प्रवेश नव्हे । ऐशिये एकांतीं भूदेवें । संस्कारावें मम कुमारां ॥२८॥जाणों न शकती पंच भूतें । चार वार्तिक कैंचा तेथें । परम गूढ एकांत जेथें । कृत्य समर्थें हें कीजे ॥२९॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP