मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३ रा| श्लोक १ ते ३ अध्याय ३ रा आरंभ श्लोक १ ते ३ श्लोक ४ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ अध्याय ३ रा - श्लोक १ ते ३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ३ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - अथ सर्वगुणोपेतः कालः परमशोभनः । यह्येवाजनजन्मर्क्षं शान्तर्क्षग्रहतारकम् ॥१॥गर्भी स्तवूनि श्रीभगवान । स्वधामा गेलिया सुरगण । तेव्हां सकलमंगलायतन । काल शोभन सुखतर ॥४४॥त्या काळाचें विशेषण । आठां श्लोकीं शुक भगवान । वाखाणील तें निरूपण । श्रोते सज्जन परिसोत ॥४५॥सर्वसद्गुणीं सालंकृत । शोभनकाळ जेव्हां प्राप्त । देवकीगर्भी रमाकांत । आविरासीत् तत्समयीं ॥४६॥अजन म्हणजे विष्णु जाण । त्यापासून याचें जनन । अजनजन्मा हें अभिधान । यालागून विधीचें ॥४७॥तें ब्राह्मर्क्ष रोहिणी । परमशोभन सकळ गुणीं । निर्वेध सकळ तारकागणीं । शुभग्रहगणीं वीक्षित ॥४८॥विराजपुरुष नारायण । तो सृष्टीचा सृजनाभिमान । तयापासोनि ज्याचें जनन । तो प्रजापति जाण अजानजन्मा ॥४९॥तो नक्षत्रदेवता प्रजापति । म्हणोनि प्राजापत्य ऐसें म्हणती । एवं रोहिणीची व्युत्पत्ति । दोहीं रीतीं उपजविली ॥५०॥अजनशब्दें आदिपुरुष । विराज तयाचा अंशविशेष । हें कळावें श्रोतयांस । द्विरुक्तीस हें मूळ ॥५१॥वर्त्तमानयुग द्वापर । विरोधीनामसंवत्सर । वर्षाऋतु अयन अपर । दक्षिणायन ज्या नाम ॥५२॥श्रावणमास पक्ष बहुल । जयाष्टमी जयदशीळ । वंशाभिमानी वासरमेळ । बुध निर्मळ चंद्रज ॥५३॥रोहिणी नक्षत्र वज्र योग । कौलवकरणाचा संयोग । उत्तम लग्न उत्तमांग । सिंहीं भग शशी उक्षीं ॥५४॥जेव्हां हरीचा जन्मकाल । काळासी सुखाचा सुकाळ । होऊनि सर्वांगें अनुकूळ । जन्मकाळ तो साधी ॥५५॥कोण्ही अतिचार कोण्ही वक्र । शुभग्रहीं पातले खेचर । उच्चासनीं बैसोनि चंद्र । घे जुहार सर्वांचा ॥५६॥गुरुतल्पकें सलांछन । वंशीं जन्मतां त्रीभगवान । होऊनि जगत्पूज्यपावन । उच्चासन स्वीकारी ॥५७॥केंद्रीं आणि उच्चस्थानीं । राज्यभुवनीं कां स्वसदनीं । होऊनि शुभ फळाचे दानी । केला ग्रहगणीं उत्साह ॥५८॥लग्नीं ग्रह अनुकूळ सकळ । होरा द्रेष्काण निर्मळ । सप्तांश नवांश द्वादशांश अमळ । शुद्ध सफळ त्रिंशांश ॥५९॥सिद्धा दशा सिद्धिदा पूर्ण । शुभग्रहांचें लग्नेक्षण । बळें उपबळें भावसाधन । जातकाभरण हरिजन्म ॥६०॥अब्दादिक पाहतां मुळीं । वृथा न म्हणावी वाचाळी । शंका जालिया हृदयकमळीं । भविष्योत्तरीं पाहिजे ॥६१॥काळें आपुलिया कल्याणकार्या । श्रीकृष्णाच्या जन्मसमया । अलंकारिलें तें कुरुवर्या । सौभद्रतनया परियेसीं ॥६२॥दिशः प्रसेदुर्गगनं निर्मलोडुगणोदयम् । मही मङ्गलभूयिष्ठपुरग्रामव्रजाकरा ॥२॥दिशा सुप्रसन सकळ । गगन निरभ्र निर्मळ । उदय पावला तारकामेळ । वर्षाकाळ असतांही ॥६३॥मंगलभूयिष्ठ जाली धरा । खेटखर्वटपत्तनपुरां । घोषग्रामव्रजा आकरा । बळेंचि घरा श्री आली ॥६४॥मंगलोत्साह घरोघरीं । शोभनानंद नगरोनगरीं । दुःख शोक दोष दरिद्री । सुखसागरीं बुडाले ॥६५॥हृदयशल्यें विरोनी गेलीं । ब्रह्मानंदें मनें निवालीं । सहृद्भावें प्रेमाथिलीं । भूतें भूतळीं परस्परें ॥६६॥अद्यापिही भक्तांहृदयीं । आविर्भवतां शेषशायी । ऐशा चिन्हांची नवाई । सर्वां ठायीं उमटते ॥६७॥मुखीं स्वयंभ नामावळि । हृदयीं ध्यानें ठसावलीं । दृष्टि हरिरंगें रंगली । वोरंगली भवभानीं ॥६८॥आंगीं क्षमेचीं बाणलीं त्राणें । माजी दयेचें बैसलें ठाणें । स्वधर्माचरण अलंकरणें । सर्वही करणीं लेइलीं ॥६९॥नगरोनगरीं घरोघरीं । प्रतिशरीरीं सर्वांतरीं । ब्रह्मानंदाचिये गजरीं । गोष्टी दुसरी हारपली ॥७०॥आला जाणोनि प्राणवल्लभ । आलिंगनाचा लक्षूनि लाभ । पतिव्रतेचा विरहक्षोभ । समारंभ जेवीं करी ॥७१॥तैसें भूयिष्ठ सर्वत्र सर्वीं । सालंकृत धरादेवी । निजनाथाची प्रेमपदवी । कोण्हा न वदवी प्रकटत्वें ॥७२॥श्रीकृष्णाचा जन्मकाळ । तेणें आनंदभरित जळ । सर्वभूतात्मा गोपाळ । सुखसुकाळ सर्वांसी ॥७३॥नद्य प्रसन्नसलिला ह्रदा जलरुहश्रियः । द्विजालिकुलसंनादस्तबका वनराजयः ॥३॥नद्या वाहति प्रसन्नजळें । शुद्धसत्त्वात्मकें सुविमळें । त्यजिलीं रजतमाचीं डहुळें । शुद्धमेळें ज्याचेनी ॥७४॥डोहो भरले अगाधसलिलीं । अनुभवाची अगाध खोली । माजीं पंकजें विकासलीं । जीं सेविली सद्भ्रमरीं ॥७५॥नीलोत्पलें श्वेतोत्पलें । कुमुदें कल्हारें निर्मळें । कुशेशयें हेमकमळें । रातोत्पलें रत्नाभ ॥७६॥इंद्रोत्पलें गजोत्पळें । मल्लिका सरसिजें कुड्मळें । श्रीशतपत्रें सहस्रदळें । सुपरिमळें मघमघति ॥७७॥पद्माप्राणेश्वराचे जन्म । म्हणोनि पद्मेसि आनंद परम । तिनें अलंकारिलें धाम । पद्माराम पद्माकर ॥७८॥मानसादि सरोवरें । भागीरथ्यादि सरितातीरें । पुष्करपृथूदकादि अपरें । पुण्योदारें सुतीर्थें ॥७९॥एवं सर्वही जलाशय । श्रिया जुष्ट आनंदमय । तेथ द्विजकुलांचे समुदाय । त्रिदशप्राय संतुष्ट ॥८०॥अनंत तपें तपूनि मुनि । जन्म पावले पक्षियोनीं । श्रीकृष्णाचें जन्म भुवनीं । देखों नयनीं याहेतु ॥८१॥गंधर्व जन्मले भ्रमरकुळीं । श्रीकृष्णावतार भूमंडळीं । तया सुखाची नवाळी । सुकृतबहळीं सेवावया ॥८२॥जंववरी कृष्णावतारचरित्र । तंववरी तृणादि प्राणिमात्र । अपारपुण्यें धरोनि गात्र । कैवल्यपात्र पैं जालें ॥८३॥गंधर्व स्तविती सामगायनीं । मुनीश्वरांच्या वेदध्वनि । तैसे द्विजालिकुळांचे पंकजवनीं । मधुरध्वनि विराव ॥८४॥ऐशा सनाद नाना गुच्छ - । पंक्ति शोभा दाविती स्वच्छ । हरिप्रेमापुढें तुच्छ । इहामुत्रेच्छ नेच्छिती ॥८५॥भूमि जळ आणि आकाश । तिहीं भूतांचा कथिला तोष । आतां वायु आणि जो हुताश । त्यांचा विशेष मुनि बोले ॥८६॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP