मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक ३५ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३५ Translation - भाषांतर सत्त्वं न चेद्धातरिदं निजं भवेद्विज्ञानभिदापमार्जनम् ।गुणप्रकाशैरमुमीयते भवान् प्रकाशते यस्य च येन वा गुणः ॥३५॥सप्रेमभजनें कर्मफलद । यालागीं धातृशब्दें निर्जरवृंद । संबोधिती श्रीगोविंद । परमानंद परमात्मा ॥४३॥देव म्हणती कैवल्यदानी । तुझिया सगुनविग्रहावांचोनि । अपरोक्ष ज्ञान तें कोठूनि प्राणिगणीं प्रकाशे ॥४४॥तुझें निजसत्त्व निर्मळ । जेथ अस्पृष्ट रजतममळ । तेणें सगुण श्रीगोपाळ । ज्ञानकल्लोळ सुखसिंधु ॥६४५॥पुटीं घालूनि तोडिती हीन । त्या शुद्ध हेमापरी सज्जन । रजतमनाशें सत्त्वसंपन्न । होऊनि विज्ञान पावती ॥४६॥विशुद्ध सत्त्व तुझें तैसें । नोहे पुटीच्या सोन्या ऐसें । जांबूनद स्वप्रकाशें । स्पर्शलें नसे रजतमा ॥४७॥डोळ्यामाजीं असोनि दृष्टि । सूर्य न प्रकाशे जंव सृष्टीं । तंववरी अंधत्वें रहाटी । शास्त्रकोटी दीपेंशीं ॥४८॥जंव सगुण नाहीं हरिगुणभजन । तंववरी न प्रकटे विज्ञान । यालागीं तुझें सगुण ध्यान । तें जीवन परमार्था ॥४९॥गार चकमक तूळद्रव्य । निर्वातसंयुक्त कृतोपाय । अव्यक्त वह्नि व्यक्त होय । तेवीं सगुणसोय ज्ञानाची ॥६५०॥विनय चकमक सद्भावगारे । नमन तूळद्रव्योपचारें । निष्ठा निर्वात श्रवणादरें । सद्गुरुवरें संयुक्तोपाय ॥५१॥सर्वांतरी आहे ज्ञान । अनादिमायाप्रवाहेंकरून । परिणमलें विपरीत होऊन । बहिर्मुखपण यालागीं ॥५२॥भूतें एका स्फुरणापोटीं । परंतु त्यांची भिन्न रहाटी । कठिणें पातळें दाहकें मोठीं । एकें पळपटीं पोकळें ॥५३॥अग्नि असे तंववरी जाळी । परंतु भेटों न शके जळीं । वायु धांवे पैं धुमालीं । ज्ञानें आंधळीं परतंत्रें ॥५४॥तैसेंचि स्रष्टा करी सृजन । सृष्टिपरचि त्याचें ज्ञान । रागतृषाकर्मप्रधान । जें उपादान संसृति ॥६५५॥प्रजा तैशाच तदंकुरें । संसारसंभ्रमाच्या भरें । रागतृष्णादि विकारें । मानिती खरें भवभान ॥५६॥शाश्वतचि मानिती जन्म । शाश्वतची वृत्तिग्राम । शाश्वतची हेमधाम । भवसंभ्रम वाढविती ॥५७॥तंव तमोगुण महाबळी । कामक्रोधादिकां खवळी । भूतें भूतक्षोभें गिळी । करी समूळीं संहार ॥५८॥मळिण सत्त्वगुण तेथें । दोन्ही वारूनि विवेकहातें । सृष्टिचाळणी प्रवर्ते । ज्ञानें विपरीतें सज्ञान ॥५९॥ऐसे नियुक्त कर्मापुढें । ज्ञान नेण अती बापुडे । तुझें प्रकटे सगुण रूपडें । तैंचि उघडे विज्ञान ॥६६०॥तें विज्ञान म्हणसी कैसें । जेणें अज्ञानेशीं भेद नासे । सहितनिद्रा स्वप्न जैसें । जागृतीं निरसे अशेष ॥६१॥कोण अज्ञान कैसा भेद । ऐसें निरूपिजेल विशद । अज्ञान गाढमूढ अविद । दृश्यकोविद भेदज्ञ ॥६२॥आधीं रज्जूचा विसर । त्यावरी भासे सर्पाकार । भेद तो पुच्छ शीर शरीर । दशनंदष्ट्राग्र भयजनक ॥६३॥जेव्हां रज्जु उमजविला । तेव्हांचि विसर हारपला । अवयवभेद तो नाथिला । मिथ्या झाला सर्पेशीं ॥६४॥व्हावया विज्ञानप्रकाश । करावा शास्त्राचा अभ्यास । एथ सगुणभक्तीचा । वायां विशेष पोसिला ॥६६५॥तरी अंतःकरणचतुष्टय । तेणें इंद्रियसमुदाय । डोळस होऊनि संसारमय । रचिला होय भवभ्रम ॥६६॥तिहीं कीजे शास्त्रपठण । तैं कल्पित होय ब्रह्मज्ञान । जयासि बोलिजे अनुमान । तें लक्षण अवधारा ॥६७॥जेथ अग्नि तेथचि धूम । भूमार्दव तेथचि द्रुम । क्रियेवरूनि जाणिजे काम । स्नेहसंभ्रम जाणवी ॥६८॥तैसें अचेतन देह पडे । तेव्हां व्यवहार कांहीं न घडे । मग नासोनि जाय रोकडें । केवळ मढें अचेतन ॥६९॥पुनरपि करी उठणें । तरी सुषुप्ति होती ऐसें म्हणणें । तैसेंचि आत्मत्व अनुमानें । शास्त्रज्ञानें जाणावें ॥६७०॥बुद्ध्यादिकातें प्रकाशी । तो चिदात्मा हृदयाकाशीं । सच्चित्सुखाचा मिरासी । ब्रह्म यासी म्हणावें ॥७१॥वस्तु आहे सर्व घटीं । तेणें होय इंद्रियरहाटी । ऐशा अनेक अनुमानगोष्टी । शास्त्रपरिपाटी बोलती ॥७२॥तुझिये सगुणभक्तीवीण । ऐसें आनुमानिक शास्त्रज्ञान । तेणें न तुटे बंधन । ऐसें सुरगण बोलती ॥७३॥बुभुक्षु कल्पित अन्नरसें । जेवितां क्षुधा जरे निरसे । तरीच कल्पित ज्ञानें नासे । संसारपिसें आविद्यक ॥७४॥यालागीं तुझें सगुण ध्यान । सप्रेमभक्तीसी कारण । भक्तिप्रेमें अंतःकरण । होय प्रसन्न शुद्धत्वें ॥६७५॥अंतःकरणाची प्रसन्नता । अपरोक्षज्ञानाची ते माता । अपरोक्षज्ञानें कृतार्थता । हरिगुरुभक्तां अनाथासें ॥७६॥मनें कल्पिला संसार । दुस्तर दुःखाचा सागर । तें भजनीं होतां मन तत्पर । मग संसार कोणासी ॥७७॥भजनें मनाचे हरले मळ । ध्यातां हरिरूप निर्मळ । समरसोनि अमळीं मळ । होय केवळ चिन्मात्र ॥७८॥शुद्धसत्त्वात्मक तुझें सगुण । भावें भक्तांसि भज्यमान । तैसेंचि होय अंतःकरण । निष्काम भजने सप्रेमें ॥७९॥ऐसे निष्कामभजनभाग्यें । श्रीचरणाचेनि अनुरागें । बाह्यविषयांचेनि विरागें । हाती निजांगें चिन्मय ॥६८०॥ऐसे तुझेनि गुरुप्रसादें । भक्त पावती मोक्षपदें । तेंहि उमाणितां भजनानंदें । होफळ शब्दें हेळिती ॥८१॥लटक्या बंधनाच्या नाशें । साच मोक्ष कैसा दिसे । बंध मोक्ष जैसें तैसे । भजनसौरस उमजे हें ॥८२॥एवं निजसत्त्वप्रधान । तुझे अवतार अनेक सगुण । भक्तनुग्रहार्थ धरिसी जाण । द्विविध लक्षण तयांचें ॥८३॥सप्रेम अनन्य आराधिती । क्रूर द्वेषे विरोधिती । उभय अनुग्रहाची स्थिति । तेहि रीति अवधारा ॥८४॥अभ्युदय सप्रेमभजनीं । सम्यग्ज्ञान कैवल्यदानी । सगुण भक्ताम अनुग्रहूनि । स्वानंदसदनीं नांदवी ॥६८५॥श्रीचरणाचें आराधन । करावया भक्तांचें प्रेम गहन । कायावाचा मन धन । अनन्यशरण सद्भावें ॥८६॥संसारसुखाची विरक्ति । स्वर्गापवर्ग तुच्छ करिती । ऐशी ज्यांची निःसीम भक्ति । करी श्रीपति अभ्युदय त्यां ॥८७॥विरोधी भक्तांचें लक्षण । दृढ करोनि देहाभिमान । द्वेषें करिती भगवद्ध्यान । विषयचरण यथेष्ट ॥८८॥त्यांसि विरोधें क्षोभोनि हरि । सर्वस्व हरूनि समरीं मारी । अपकीर्तीचें पात्र करी । मोक्षाधिकारी वैरेंशीं ॥८९॥ऐशिया उभय भक्तांसाठीं । सगुणावतार धरिसी सृष्टीं । ते भजनीं येची परंतु कष्टी । न करवे गोष्टी जाणिवेची ॥६९०॥नलगे गणना करितां अंत । न पुरे तर्काचाहि हात । ज्ञानेंद्रियें मनासहित । जासी म्हणत अगोचर ॥९१॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP