मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २ रा| श्लोक ३१ ते ३२ अध्याय २ रा प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ ते ३४ श्लोक ३५ श्लोक ३६ श्लोक ३७ ते ३८ श्लोक ३९ ते ४० श्लोक ४१ ते ४२ अध्याय २ रा - श्लोक ३१ ते ३२ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३२ Translation - भाषांतर स्वयं समुत्तीर्त्य सुदुस्तरं द्युमन् भवार्णवं भीममदभ्रसौहृदाः भवत्पदाम्भोरुहनावमत्र ते निधाय याताः सदनुग्रहो भवान् ॥३१॥देवी म्हणती स्वप्रकाशा । भवार्णवीं तुझिया दासां । तुझिया चरणाचा भरवंसा । कृतमानसां निस्तरणा ॥४४॥चरणप्रभेच्या उजियेडें । भवार्णवाचें भानचि उडे । निस्तरणाचेंकाय कोडें । गोष्पदपाडें न गणिती ॥५४५॥ऐसा तुच्छ अतिहळवट । तया निस्तरणीं काय संकट । भवसिंधूचा भरिला घोंट । महिमा उद्भट चरणाचा ॥४६॥ऐशा श्रीचरणप्रसादें । भव निस्तरला संतवृंदें । पुढें तारावयासि मुग्धें । नौका विनोदें स्थापिली ॥४७॥संप्रदायपरंपरा । नवविध भजनाचिया आधारा धरोनि तरती भवसागरा । अति दुस्तरामाजिवडे ॥४८॥भवार्णव भयंकर । तेथ भज्जती सुरासुर । खोलियेचा न कळे पार । चराचर बुडालें ॥४९॥स्वयें तरोनि गेले संत । जे काम अपार करुणावंत । ज्याम्चे दयेचा ब्रह्मांडभरित । सुहृद्भाव कोंदला ॥५५०॥भूतमात्रीं आत्मप्रेम । जेथ नुदैजे भाव विषम । भाविकांचे कल्पद्रुम । आत्माराम जगदात्मे ॥५१॥ते तरोनि गेले भवाब्धिपार । हरिपदनौकेचा उतार । केला मागिलां आधार । भव दुस्तर तरावया ॥५२॥तव पदभजननौकापथ । जेथें तरोनि गेले संत । मागें निरविले तुज भक्त । त्यां तूं अनंत अनुग्रहीता ॥५३॥संतीं निरविलें भक्तां । म्हणोनि वाहसी त्यांची चिंता । नाना संकटीं संरक्षिता । सदनुग्रहता रक्षावया ॥५४॥संती निरविलें भक्तां । म्हणोनि धरिसी सापत्नता । प्रकटूणियां एकात्मता द्वैतवार्ता नुरविसी ॥५५५॥म्हणसी भक्तीचें कारण काय । अनेक असती साधनोपाय । योगयागतपें काय । प्राप्त होय परम पद ॥५६॥शास्त्राभ्यासाचा आधार । करूनि कित्येके चतुर । मुक्तपणें स्वेच्छाचार । विधिकिंकर न हों म्हणती ॥५७॥तरी ऐकें गा अरविंदनेत्रा । त्यांची निष्फल देहयात्रा । ज्ञानाभिमानें भरिलें गात्रा । भजनसूत्रा भंगविलें ॥५८॥येऽन्येऽरविन्दाक्ष विमुक्तमानिनस्त्वय्यस्तभावादविशुद्धबुद्धयः ।आरुह्य कृच्छ्रेण परं पदं ततः पतन्त्यधोऽनादृतयुष्मदङ्घ्रयः ॥३२॥ते म्हणसी कोण गा जरी । जे श्रीपदभक्ति अनादरी । पूर्वपक्षें भरले भरीं । कर्कशाचारी कर्मठ ॥५९॥पठण करूनि वेदशास्त्र । आपणा मानूनि देहमात्र । तो देह करावया पवित्र । करिती कृच्छ्र चांद्रायणें ॥५६०॥करिती अनेक कर्कश तपें । त्या तपाभिमानाचेनि जल्पें । मानिती तीन्हीं भुवनें अल्पें । नानाविकल्पें जल्पती ॥६१॥एथ परीक्षिति आशंका करी । जें तप विधीसि बोधी हरि । त्या तपें हे अनधिकारी । त्या तपामाझारीं काय विघ्न ॥६२॥शुक म्हणे गा सौभद्रसुता । जंव न जोडे अंतर्मुखता । तंववरी घाली विघ्नावर्ता । करी अधःपाता वरपडे ॥६३॥अंतर्मुखतेचें हेंचि वर्म । सर्वभूतीं आत्माराम । त्याच्याठायीं उपजे प्रेम । देहसंभ्रम नाठवे ॥६४॥विवर्त्ताचें विसरे भान । न धरी देहाचा अभिमान । करी विध्यक्त कर्माचरण । जैसें जीवन जळगा रे ॥५६५॥बाह्य सत्कर्में झिजवी काया । अंतरीं भरिली भूतदया । वसती गेला भजनालया । म्हणावें तया अंतर्मुख ॥६६॥नातरी धोधां महापुरीं । बुडवितां उफळोनि ये बाहेरी । तैसा देहाभिमानें करी । कव्र्में शरीरीं बहिर्मुख ॥६७॥अंतरीं दयेचा नाहीं शेष । भूतद्रोहें न मानी त्रास । देहबुद्धि पाहे गुणदोष । फलाभिलाष मानसीं ॥६८॥ध्यानीं निश्चळ नोहे मन । बाहेर धांवे निर्बुजोन । न रुचे स्वरूपानुसंधान । विषयभान विसरेना ॥६९॥भक्तिसुखीं गोंवितां बळें । बळेंचि बाहेर उफाळे । लौकिकगजबजेचेनि मेळे । धरी आगळें वालभ ॥५७०॥मरतां तृषेनें ब्राह्मण । नेदी शौचाचें जीवन । करी चरणप्रक्षाळण । मृदालेपनपूर्वक ॥७१॥क्षुधेनें बालक मुके प्राणा । तया नेदी अन्नजीवना । अनुच्छिष्ट भंगूं देना । करुणा येना मानसीं ॥७२॥कृतनेमाचा होतां भंग । क्रोधें खवळे जैसा मांग । तेणें सुकृता होय भ्म्ग । हें अव्यंग उमजेना ॥७३॥सकाम कर्माचिया आवडीं । परोपकारीं नच सुटे काडी । विषयलोभें वेंची कोडी । स्वार्थें मोडी परकार्य ॥७४॥लोकीं रूढवी आपुली ख्याति । मानी सन्मानें विश्रांति । न मानितां मानी खंती । जैशी वोखती सुखदुःखीं ॥५७५॥जातिकुलशीलधन - । विद्यावयस्वरूपसंपन्न । अंगवळाचा अभिमान । मुसमुसी पूर्ण मदाष्टकें ॥७६॥दुजा मान्य देखोनि पुढां । जैसा पेटला उकरडा । तैसा धुपधुपी आंतुली कडां । दर्पें कडकडां कढों लागें ॥७७॥पूर्ण स्वहिताची सामग्री । जेथ भरावी अंतरीं । तेथ भरिले साही वैरी । बाह्यशरीरीं कर्मठ ॥७८॥पुंश्चळीचें पातिव्रत्य । त्र्यक्षरीचें बोलणें सत्य । तैसें जयाचें बाह्य कृत्य । तें औद्धत्य गुणांचें ॥७९॥शरीर शोषूनि नाना तर्पी । देवता आराधी साक्षेपीं । र्पसन्न करूनि शास्त्रजल्पीं । सिद्धि कल्पी प्रज्ञेची ॥५८०॥तये क्षुद्रा सिद्धिबळें । भोगी मुक्तत्वसोहाळे । कोठें न माये तोंडवळें । लोक भोळे भांबावी ॥८१॥मुक्तपणाचा अभिमान । करिती देहाचें मंडन । चामरें छत्रें सूर्यपर्णें । सिंहासनप्रतिष्ठा ॥८२॥मिलवूनि शिष्यमांदी । स्वार्थोपयोगें त्यांसि बोधी । यथेष्टाचरण प्रतिपादी । न मानी अविधि अभिचार ॥८३॥शम दम निरूपी वैखरीं । षड्रिपु नांदवी अभ्य़ंतरीं । बोले अमानित्वकुसरी । दंभाचारी मुक्तत्वें ॥८४॥देव म्हणती कमलनयना । ऐसा मानूनि मुक्तपणा । विमुख झाले तुझिया भजना । असद्भावना रूढविली ॥५८५॥विश्वव्यापक परमात्मा । तत्प्राप्तीचा भजनप्रेमा । मावळोनिया झाली अमा । रूपनामा भुलले ॥८६॥आत्मा अस्ति भाति प्रिय नामरूप मायामय । तेंही मानी केवळ विषय । भक्तिसोय लोपली ॥८७॥म्हणाल काम पां लोपली भक्ति । तरी चित्तशुद्दि केली नव्हती । बाह्यकर्माची व्युत्पत्ति । तेणें महती वाढली ॥८८॥पडिला लौकिकाचा भार । रूढ केला दंभाचार । दर्शना येती थोर थोर । त्यांचा आदर वाढला ॥८९॥न्यून पूर्ण सांभाळावें । बरें वाईट संपादावें । चित्त भरलें येचि हावें । नाहीं ठीवें निजहित ॥५९०॥अनेक वस्तु मिळवाव्या । प्रयत्नपूर्वक संरक्षाव्या । परस्परें द्याव्या घ्याव्या । वाढवाव्या स्फीतिलोभें ॥९१॥आपणा वेगळी न हाले काडी । ऐशी लोकीं झाली रूढी । पायीं पडली प्रपंचबेडी । नेणें आवडी स्वहिताची ॥९२॥लोहाचेचि तवे आरिसे । तवां प्रतिबिंब न भासे । आरिशामाजीं स्वच्छ दिसे । मळविनाशें ज्यापरी ॥९३॥नाहीं झाली चित्तशुद्धि । अस्त पावली आतिक्यबुद्धि । परोक्षज्ञानें शब्दवादी । बाह्योपाधि वाढवी ॥९४॥बहुतां कष्टीं मनुष्ययोनि । तेथहि अग्रजन्म पावोनि । बैसोनिया दुंगासनीं । मुक्तपणीं मिरवले ॥९९५॥एथूनि आतां सायुज्यपदीं । समरसावें भजनसिद्धि । ज्ञानें निरसूनि उपाधि । पूर्ण बोधीं मिळावें ॥९६॥परंतु अनादरिले हरिगुरुचरण । तेणें अस्त पावलें ज्ञान । मुक्तपणें यथेष्टाचरण । तेणें अधःपतन पावले ॥९७॥तैसे न पावतचि ते पतन । जे काम तुझिया चरणा शरण । त्यांच्या स्मरणें पळे विघ्न । तेंचि सुरगण बोलती ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP