मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक ६१ ते ६९ अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक ६१ ते ६९ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६१ ते ६९ Translation - भाषांतर प्रतियातु कुमारोऽसौ न ह्यस्मादस्ति मे भयम् । अष्टमाद्युवयोर्गर्भान्मृत्युमें विहितः किल ॥६१॥हा मागुता ना हो तनय । यापासूनि मजला भय । नाहीं नाहीं हा निश्चय । प्रमाण काय तें ऐका ॥१७॥तुमचा गर्भ देवकीउदरीं । अष्टम होईल तो मज मारी । ऐशी वाचा अशरीरी । गगनोदरीं बोलिली ॥१८॥अष्टम गर्भापासूनि मृत्यु । ऐसा भविष्यवृत्तांतु । मज कळतां मी याचा घातु । करूनि दुष्कृत नाचरें ॥१९॥तथेति सुतमादाय ययावानकदुंदुभिः । नाभ्यनन्दत तद्वाक्यमसतोऽविजितात्मनः ॥६२॥अंगीकारूनि कंसवाणी । बाळक धरूनि दोन्ही पाणी । संशयापन्न अंतःकरणीं ॥ दुष्टापासूनि परतला ॥९२०॥नेदितां कंसवाक्यासि गौरव । नाहीं तोषला मनोभाव । ऐकोनि तयाचा अभिप्राव । तेथूनि वसुदेव निघाला ॥२१॥नाशिवंताचा अभिमान । तें चिदात्म्य पावोनि पूर्ण । ज्यांचें परिणमलें अंतर्ज्ञान । असज्जन तो प्राणी ॥२२॥वास्तवज्ञान नुमजे कदा । मानस अनावर सर्वदा । आयुष्य त्याचिया अनुवादा । शास्त्रकोविदां न वाटे ॥२३॥इंद्रियद्वारा धांवे मन । भरे विषयाचें आडरान । होऊनि ठेला मनाधीन । तोचि पूर्ण अजितात्मा ॥२४॥तरळ तरुणीचा कटाक्ष । चंचळ चक्रवाताचा वृक्ष । नटामाजील वक्ता दक्ष । कोण पक्ष दृढावी ॥९२५॥विद्युल्लता करवे स्थिर । जळीं निश्चळ राहे शफर । पुंश्चली होय नियमपर । परि अजितांतर अतिचपळ ॥२६॥खळाळीं बिंबचंद्रिका । ते जरी स्थिरावे धरूनि टेका । तरी नैश्चल्य अजितात्मका । विषयी लोकां मानिजे ॥२७॥अजितात्मे जे मनाधीन । त्यांचीं इंद्रियें वावधान । सत्यशौचमितभाषण । हें कोठोन ते ठायीं ॥२८॥गंधर्वनगर क्षणभंगुर । कां जळावरील अक्षर । तैसें अजितात्मयाचें उत्तर । सत्य साचार न मानावें ॥२९॥असंत आणि अविजितात्मा । कंस केवळ दुरात्मा । वसुदेव सर्वज्ञ साचार न मानावें ॥९३०॥जो अव्यवस्थितांतर । त्याचा प्रसादही भयंकर । म्हणोनि कंसवाक्याचा निर्धार । न मानी साचार वसुदेव ॥३१॥कंसें केलें समाधान । वसुदेव पावला स्वसदन । पुत्र देवकीतें देऊन । सर्व वर्त्तमान निवेदी ॥३२॥अथ कंसमुपावृत्तं नारदो ब्रह्मदर्शनः । एकांतमुपसंगम्य वाक्यमेतदुवाच ह ॥६३॥इतुकी सांगूनियां कथा । शुक म्हणे गा मात्स्यीसुता । हरिमायेची क्षोभकता । त्या वृत्तांता अवधारीं ॥३३॥कंसें अवलंबिली जे क्षमा । बालकरक्षणीं धरिला प्रेमा । अवतारकार्याच्या उपक्रमा । योग्य महिमा हा नव्हे ॥३४॥कंसे अवलंबिली शांति । तेणें देवकार्य पावे उपहति । यालागीं क्षोभोनि वैष्णवी शक्ति । पिशाच्या हातीं उल्का दे ॥९३५॥यानंतरें तेचि कथा । जिच्या श्रवणें हरती व्यथा । कैवल्यपदाचिये माथां । जे सर्वथा सुखदात्री ॥३६॥जो परमब्रह्म मूर्तिमंतु । ब्रह्मविद्येचा अहेवतंतु । ब्रह्मर्षीमाजीं विख्यातु । तो ब्रह्मसुतु नारद ॥३७॥कंस पावतां उंपरम । वसुदेव पावतां निजाश्रम । कंसाप्रति मुनिसत्तम । सांगे वर्म एकांतीं ॥३८॥नारद उवाच - नंदाद्या ये व्रजे गोपा याश्चामीषां च योषितः । वृष्णयो वसुदेवाच्या देवक्याद्या यदुस्त्रियः ॥६४॥सर्वे वै देवताप्राया उभयोरपि भारत । ज्ञायतो बंधुसुहृदो ये च कंसमनुव्रताः ॥६५॥नारद म्हणे कंसराया । फिरतफिरतां लोकत्रया । अपूर्व वृत्तांत सांगावया । तुझिया ठाया पातलों ॥३९॥मज समान शत्रुमित्र । सुरासुर मनुष्य पितर । कोठें विषमतेचा पदर । माझें अंतर स्पर्शेना ॥९४०॥असुरभारें दाटली धरा । कष्ट सांगतां भारतीवरा । तेणें घेऊनि सुरवरां पयोब्धितीरा पातला ॥४१॥तेथ स्तवितां वृषावापि । ब्रह्मादिदेवां वर ओपी । म्हणे अवतरोनि निजप्रतापीं । महापापी मारीन ॥४२॥तुम्ही सकळ देवतागण । भूमंडळीं अवतरोन । मथुरा गोकुळ वृंदावन । क्रीडास्थान वसवावें ॥४३॥तरी हे वृंदादि व्रजनिवासी । वसुदेवादि मथुरावासी । देवतावतार हे तुजपाशीं । निश्चयेशीं सांगतों ॥४४॥यांचिया स्त्रिया समस्त जनीं । यशोदाप्रमुख ज्या गौळणी । तैशाच देवकी रोहिणी । आदिकरूनि यदुवनिता ॥९४५॥मर्दावया राक्षस क्रूर । पूर्वीं अवतरला रघुवीर । तेव्हां सुरवर वानर । होऊनि असुर संहरिले ॥४६॥तैसेंचि आरंभिलें आतां । त्या तुज निवेदिलें वृत्तांता । तुझा उग्रसेन जो पिता । तोही देवतामय जाण ॥४७॥तुझे सुहृद आणि स्वगोत्र । बंधुवर्ग जे अनुचर । अवघे देवतावतार । दुष्टसंहार करूं आले ॥४८॥मथुरायां स्थिताश्चैव अक्रूराद्या विशांपते । भूमेर्भारायमाणानां दैत्यानां च वधोद्यमम् ॥६६॥कर्तुं विद्धि महाराज इत्युक्त्वान्तरधीयत । एतत्कंसाय भगवान् शशंसाभ्येत्य नारदः ॥६७॥अक्रूर उद्धव शतधन्वान । ऐसे अनेक यादवगण । तुज सेविती बंदीजन । प्रायः लपवून निजवर्म ॥४९॥गोवळ आणि यादवकुळ । दोहींमाजीं देवता सकळ । दैत्यपादपाचें मूळ । खननशीळ सर्वदा ॥९५०॥इहीं अवतरोनि करणें काय । ऐसा झणीं धरिसी विस्मय । भूमिभारणहरणकार्य । लक्षूनि स्वयें अवतरले ॥५१॥प्रजांसि तुझेनि विश्रांति । म्हणोनि म्हणिजे विशांपति । महाराज तूं भूपति । विख्यात कीर्ति त्रिलोकीं ॥५२॥भूमिभार जे दुष्कृत । वेदबाह्य विषयासक्त । त्यांचा करावया निःपात । देव समस्त अवतरले ॥५३॥तुज कळावी हे मात । म्हणोनि सांगितला वृत्तांत । इतुकें बोलोनि ब्रह्मसुत । झाला गुप्त तत्काळीं ॥५४॥शुक म्हणे गा परीक्षिति । नारदें येऊनि कंसाप्रति । गुप्त कथिलें जें एकांतीं । तें भूपते बोलिलों ॥९५५॥षड्गुणैश्वर्याचे मुकुटीं । हरिहर वर्णिती ज्याची रहाटी । त्याचे मुखींची ऐकतां गोठी । कंस पोटीं दचकला ॥५६॥ऋषेर्विनिर्गमे कंसो यदून्मत्वा सुरानिति । देवक्या गर्भसंभूतं विष्णुं च स्ववधं प्रति ॥६८॥जैशीं सूर्याचिये ज्योती । रत्नें सुरंगें विराजती । काम अग्निद्रव्यें पावती विकृति । चंद्रज्योति आणि नळे ॥५७॥तैसा सत्संगें संसारीं । सज्जन सद्बुद्धि स्वीकारी । दुर्जन दुर्मति अंगीकारी । महा आसुरी कुविद्या ॥५८॥करितां सद्ग्रंथश्रवण । सज्जन सांडी दृष्ट गुण । पराचे पाहूनि दुर्गुण । पापी पूर्ण दुरात्मा ॥५९॥महाकवींहीं महाग्रंथीं । त्यागार्थ बोलिल्या कुयुक्ती । त्याचि धरूनिया चित्तीं । करी व्यत्पत्ति दुर्जन ॥९६०॥तैसा असुरस्वभाव कंस । ऐकोनि नारदोक्तीचा लेश । खवळे जैसा कां त्रिदोष । होतां विशेष पांचवा ॥६१॥नारदाचेनि दर्शनें । कांहीं अलभ्य लाभ होणें । तों तो ठेला या दुर्जनें । काय निजमनें विवरिलें ॥६२॥ऋषि जातेक्षणीं तेथ । कंस म्हणे हें यथार्थ । हाचि गगनवाणीचा अर्थ । सुरकार्यार्थ मम मृत्यु ॥६३॥बल्लव आणि हे यादव । मनें मानूनि सर्वही देव । देवकीगर्भीं वासुदेव । निजवधार्थ मानिला ॥६४॥देवकीं वसुदेवं च निगृह्य निगडैर्गृहे । जातं जातमहन्पुत्रं तयोरजनशंकया ॥६९॥मग क्षोभला अंतःकरणीं । देवकीवसुदेव धरूनि दोन्ही । कारागारीं निगडबंधनीं । निग्रहूनि रक्षिलीं ॥९६५॥वसुदेवदेवकीच्या पोटीं । पुत्र जन्मतांचि कंस निवटी । हरिजन्माचा धाक पोटीं । गगनगोठी विसरेना ॥६६॥जें जें उपजे पुत्ररत्न । तें तें मारी करूनि यत्न । ऐसेचि बहुतेक दुर्जन । स्नेहबंधन न धरिती ॥६७॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP