मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १ ला| श्लोक ४४ते ४७ अध्याय १ ला श्लोक १ ते ७ श्लोक ८ ते १० श्लोक ११ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २९ श्लोक ३० ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६९ श्लोक ७० ते ७२ अध्याय १ ला - श्लोक ४४ते ४७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४४ते ४७ Translation - भाषांतर ज्योतिर्यथैवोदकपार्थिवेष्वदः समीरवेगानुगतं विभाव्यते ।एवं स्वमायारचितेष्वसौ पुमान्गुणेषु रागानुगतो विमुह्यति ॥४४॥आतां जीवदशेची गति । दृष्टान्तें सांगेन भूपति । ते ऐकोनि स्वप्रतीति - । माजीं निगुती आणावें ॥७२०॥जैशी चंद्रसूर्यादि ज्योति । ऊर्ध्व असोनि अधोगति । उपाधियोगें आभासती । विपरीतमति देखतां ॥२१॥पृथ्वीसंबंधी जलाशय । कां शरावादि सकल होय । घृततैलादि तृतीय । धातुमय अश्मादि ॥२२॥ऐशा अनेक उपाधि । तितुकी प्रतिबिंबाची वृद्धि । वायुवेगें पृथग्विधि । चंचलता त्या होय ॥२३॥स्वमाया म्हणिजे जीवोपाधि । आत्मप्रभा ते अहंबुद्धि । हें मी म्हणोनि नाना विधि । चेष्टा त्रिशुद्धि ममत्वें ॥२४॥राग म्हणजे प्रीति प्रेमा । त्यासि वायूची उपमा । तेणें गुणें चांचल्यधर्मा । नाना कर्मां आचरवी ॥७२५॥अविद्योपाधिविषयस्फुरण । तेंचि स्वमायारचित गुण । त्याच्या ठायीं प्रेमबंधन । देह होऊन परिणमे ॥२६॥विषय आणि विषयज्ञान । संग्रहूनि अंतःकरण । पावे जन्म अथवा मरण । जीवलक्षण हें राया ॥२७॥प्रेमास्पद होऊनि मन । मरणीं राखे जेथें स्मरण । तेंचि देह परिणमोन । मग जन्मोन व्यवहारे ॥२८॥मग ते प्रीतीच्या वालभें । तेथ आत्मत्व उपलभें । अन्योन्य प्रेमभावक्षोभें । शुद्धि न लभे मागिली ॥२९॥मग त्या देहाची जे जाति । ते आपुली म्हणे अहंमति । देहाची जे कुटुंबवसति । स्वप्रतीति कवळीत ॥८३०॥देह दीर्घ पीन रोड । देह चतुर चपळ मूढ । पापी पुण्यात्मा कर्मजड । तें तें दृढ मी मानी ॥३१॥जेव्हां जेथ ज्या देहाची प्राप्ति । तेथ त्याचीच अत्यंत प्रीति । श्वान शूकर हो भूपति । सुखसंपत्ति ते ठायीं ॥३२॥त्याचि देहासि इच्छी राज्य । तोचि देह मानी पूज्य । त्याचि देहासि भक्ष्यभोज्य । रूपगामज्य मानितो ॥३३॥देह टाकितां त्रिवेणीं । मनीं चिंतिलें पावती प्राणी । ऐशी ऐकतां ही कहाणी । देह कोणी न टाकिती ॥३४॥अत्यंत प्रियकर जरी देह । तथापि काळें पापें क्षय । पुढें नूतन तैसाचि होय । तरी भय काय मरणाचें ॥७३५॥देहरक्षणीं पाप घडे । देह तो यथाकाळें पडे । पाप अवश्य भोगणें पुढें । तरी हें कुडें न करावें ॥३६॥जशी मार्गीची शिदोरी । बरवी संग्रहावी घरीं । विष मिळवितां माझारीं । तैं आपुला वैरी आपणचि ॥३७॥म्हणोनि करितां शुद्ध पुण्यें । जन्मांतरीं सुख भोगणें । भूतद्रोह नाना विघ्नें । दुःखें दारुणें न चुकती ॥३८॥ऐसा कथूनि सामोपाय । पुन्हा भेदाभिप्राय । इहामुत्र द्विविध भय । तो उपाय बोलतो ॥३९॥तस्मान्न कस्यचिद्द्रोहमाचरेत्स तथाविधः । आत्मनः क्षेममन्विच्छन्द्रोग्धुर्वै परतो भयम् ॥४५॥कृतकर्माचें फळ भोगणें । जयासि अचुक जन्ममरणें । त्यासि भूतद्रोह करणें । जीवें प्राणें अयोग्य ॥७४०॥जैसा पक्षी गगनीं उडे । तो न पाहे पृथ्वीकडे । तैसा जन्ममृत्यूसि जो नातुडे । तयापुढें भव मिथ्या ॥४१॥कां पृथ्वीवरी जो चाले । तो पाहूनि ठेवी पाउलें । ज्यासि भोगावें लागे केलें । तेणें द्रोहिलें न पाहिजे ॥४२॥ज्यासि आपुलें क्षेम करणें । भूतद्रोह न कीजे तेणें । दर्पणींचें अलंकरणें । तेंचि लेणें स्वमुखाचें ॥४३॥देहलोभें धरितां मोहो । संपादिजे भूतद्रोहो । तेणें वैरासि होय रोहो । तो द्वेष हो नुपसवे ॥४४॥जयाचा द्रोह करणें घडे । तेंचि उसणें देणें पडे । परस्परें उतरे चढे । आंगगाडें चाकाचें ॥७४५॥आपण ज्यां दिधला खेद । ते स्नेह सांडूनि करिती द्वंद । साधूनि करिती छेदभेद । आप्तवाद न धरिती ॥४६॥साह्य करूनि बलिष्ठासि । वैर स्मरोनि निजमानसीं । संधि साधूनि एके दिवशीं । विपत्तीसी भेटविती ॥४७॥आणि यमाची जाचणी । अचुक भोगावि मरोनि । कुंभीपाकादि नरकश्रेणी । तेथ कोणी न पवती ॥४८॥पंचभूतें चंद्रसूर्य । काल आणि कर्तृहृदय । ऐसा नवांचा समुदाय । साक्ष होय शुभाशुभां ॥४९॥म्हणोनि भूतद्रोहगुणें । पात्र होइजे यमयातने । मग तें अपकीर्तीचें जिणें । तुज हें करणें अनर्ह ॥७५०॥ऐसा द्विविध भेदवाद । जो कां उभयभेदप्रद । तो उअपसंहरूनि कोविद । साम विशद संहरी ॥५१॥एषा तवानुजा बाला कृपणा पुत्रिकोपमा । हन्तुं नार्हसि कल्याणीमिमां त्वं दीनवत्सलः ॥४६॥तूं तंव दीनदयाळ कंसराजा । प्राणिमात्रासि आधार तुझा । कृपापांगें पाळिसी प्रजा । हे तवानुजा प्रिया तुज ॥५२॥तुझिये कृपेचें भाजन । कन्येतुल्य प्रतिपालन । बाला अज्ञान परम दीन । इचें हनन अनर्ह ॥५३॥निरपराध हे वेल्हाली । अप्रतिकारी अचेतनपुतळी । ऐशी मारितां विवाहकाळीं । अकीर्तिटाळी वाजेल ॥५४॥अष्टवार्षिकी कल्याणी । नववार्षिकी ते रोहिणी । दशवार्षिकी पाणिग्रहणीं । गौरी म्हणोनि बोलिजे ॥७५५॥द्विजकुलींचे कुमारीस । अब्दमर्यादा एकादश । होतां स्पर्शला रजोदोष । नाम तीस वृषली हें ॥५६॥वृषली म्हणजे शूद्रयाति । त्याचिसमान तिचा पति । हव्यकव्य त्याच्या हातीं । कदा न घेती सुरपितर ॥५७॥हे तो यथोक्त कल्याणी । तुझी लडिवाळ धाकुटी बहिणी । प्रवर्ततां लक्ष्मीपूजनीं । तुज हे करणी अयोग्य ॥५८॥श्रीशुक उवाच - एवं स सामभिर्भेदैर्बोध्यमानोऽपि दारुणः । न न्यवर्तत कौरव्य पुरुषादाननुव्रतः ॥४७॥कौरवकुलवृद्धिगौरव । म्हणोनि नामें कौरव्य । त्या परिक्षितीसि श्रीशुकदेव । म्हणे अपूर्व हें राया ॥५९॥मूर्खचित्ताचें समाधान । करूं न शके चतुरानन । शक्र भास्कर कां ईशान । वृथा श्रमोन रहाती ॥७६०॥पंच लक्षणें सामोपाय । भेद उभय लोकींचें भय । बोधिलें तें वृथा जाय । न धरी सोय करुणेची ॥६१॥कुरुभूषणा परीक्षिति । कंस बोधिला नानायुक्तीं ।जैसा असुर मनुष्यघाती । राक्षसवृत्ति निष्ठुर ॥६२॥तैसें न मानीच दुरात्मा । जैसा दावाग्नि न करी क्षमा । न परतेचि कारुण्यधर्मा । दारुण यमासारिखा ॥६३॥तेणें गजबजिला वसुदेव । कांहीं न चलेचि उपाव । कैसा देवकीचा जीव । श्रीकेशव रक्षील ॥६४॥ N/A References : N/A Last Updated : April 25, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP