श्रीमल्लिकेशाचें पद

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।


यारे पाहुं चला मल्लिकेश सदयाला । भक्तांसाठीं जो आला प्रभु उदयाला । तारिल निश्चय हा सत्यचि गमत मनाला । आत्म जनाला ॥धृ०॥
प्रेमें जे भरती मजला त्यां पदिं थारा । देउनि उद्धरिं मी वारुनियां जडभारा । जे नर कपटी त्यां घेउनियां अवतारा ॥चाल॥ करितों शिक्षा मी समजवि हें सकळांला । प्रत्यय आला ॥या०॥१॥
ज्यां निजभजनाची आवडि मानसिं मोठी । दासां त्यां नुरवी भव दुःखाच्या कोटी । सायुध संरक्षी राहुनि पाठि पोटीं ॥चाल॥ यास्तव चालविलें कीर्तन सप्ताहाला । घ्या लाभाला ॥या०॥२॥
चक्षू गुण गज भू शक साधारण नामे । वर्षी आषाढीं कृष्णाष्टभिला प्रेमें । केलें आरंभा या देवालयिं नेमें ॥चाल॥ श्रीमद्गुरुवारीं करुनि नाम गजराला । स्मरुनि चरणाला ॥या०॥३॥
सातचि वर्षे ही सेवा कीं न करावी । नित्यचि भजनाची आवड पोटीं धरावी । गिरिजानाथाची चिन्मय मूर्ति वरावी ॥चाल॥
पावन नाम खरें नुरवि कामलेशाला । सुख धामाला ॥या०॥४॥
जय जय राम हरे कृष्ण हरे गोविंदा । संगें सुजनाच्या नित्यचि हा करुं धंदा । मिळुनि सर्व आह्मीं सेवुं परमानंदा ॥चाल॥ सनकादिक तरले धरुनि या मार्गाला । जिव हा धाला ॥या०॥५॥
नामस्मरणाचा महिमा फारचि मोठा । स्मरत्यां संसारीं परमार्थीं नच तोटा । बोला विश्वासें जाळिल दुष्कृत कोठा ॥चाल॥ आला येत असे अनुभव कृष्ण सुताला । कथित सुजनाला ॥या०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP