श्रीगणपतीचीं पदें

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।


पद १ लें
नमिला तो गणराजा । आजि मी, जो प्रभु धांवे दासांचा काजा ॥धृ०॥
दनिजनांचा पालक साचा, आई बाप जगाचा । साधि निरंतर निजजन काजा ॥न०॥१॥
लाजे रति पति पाहुनि ज्या अति, आत्मज जो शंभूचा । दोंहीं भागीं ऋद्धि बुद्धि भाजा ॥न०॥२॥
गातां वाचे नाम जयाचें, होय उत्साह मनाचा । निशिदिनि आवडे संत समाजा ॥न०॥३॥
जगताचा धणि, देव - मुकुटमणि जो कां जिवन जिवाचा । पालक कृष्णसुताचा माझा ॥न०॥४॥

पद २ रें
गणराया तुज वराया रे आवडी मना ॥धृ०॥
मंगलमूर्ति, त्रिजगिं तुझी कीर्ति । रक्षिसि तूं भक्त जना ॥रे आव०॥१॥
सुप्रसन्न होईं आत्मभक्ति देईं । पार्वतिच्या नंदना ॥रे आव०॥२॥
येइं बा उदारा, चरणिं देइं थारा । करितों मी वंदना ॥रे आव०॥३॥
विघ्नसमुहवारीं कृष्णसुता तारीं । हरिं भव बंधना ॥रे आव०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP