श्रीनरहरिरायाचें पद

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।


अर्पिली चरणिं हे काया । मज तारीं नरहरिराया ॥धृ०॥
कुलदेव आमुचा कळला । प्रेमभाव हृदयीं बळला । बहु जन्म घेउनी मळला जीव हा तवपदीं वळला ॥चाल॥ तूं तारक एकचि साचा । हा निश्चय जाण मनाचा । मज लाविं छंद भजनाचा । बहु आवडि तव गुण गाया ॥अ० मजतारीं०॥१॥
प्रर्‍हाद भक्त तुज स्मरला । म्हणुनि तुं स्तंभिं गुरगुरला । त्रिजगांत भरुनि जो उरला । होउनि सगुण अवतरला ॥चाल॥ तुज काय कठिणजी देवा । मजकडुनि घेइं निज सेवा । दे प्रेम भक्ति रस मेवा । पथ अन्य न गमत तराया ॥अ० मजतारीं०॥२॥
अन्न वस्त्र देउनि साचें । कल्याण करीं सर्वांचें । मागणें हेंचि प्रेमाचें । कथिलें तुज कृष्ण सुताचें ॥चाल॥ नयनीं निजरूप पहावें । स्वरुपीं स्थिर चित्त रहावें । भवसागर तरुनी जावें । कर जोडुनि वंदन पाया ॥अर्पिली० मज तारीं०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP