श्रीदामोदराचें पद

श्रीसमर्थ रामदास वैष्णव सद्गुरु श्रीकृष्ण जगन्नाथ चरणारविंदेभ्यो नमः ।


देइं स्मरण चरणाचें, सदया तुज मी मागत साचें ॥धृ०॥
श्रीदामोदर नाम निरंतर, गातों धाम सुखाचें ॥दे०सदया०॥१॥
या संसारीं श्रमलों भारीं, वारीं ताप मनाचे ॥दे०सदया०॥२॥
क्षण न मला विश्रांति खचित, भय वाटे फार भवाचें ॥दे०सदया०॥३॥
गृह धन दारा सर्व पसारा, पाहुनियां मी नाचें ॥दे०सदया०॥४॥
पूर्णविचारें पाहतां संकटिं, कोणि न हे कामाचे ॥दे०सदया०॥५॥
अद्वय परमानंदीं मिळवीं, मन हें कृष्णसुताचें ॥दे०सदया०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP