राग - मांडपहाडी
चाल : श्री ज्ञानेश्वरा

देह देउळांत आत्मदेव विराजे ॥
त्या देउळाशीं असती दश दरवाजे ॥धृ॥
त्यांत तेवत असे अखंड ज्ञानदीप ॥
त्या ज्योती प्रकाशे दिसे निरंजनरूप ॥१॥
कुवासनामय काढुनी टाका केर ॥
दृढ श्रद्धेतें स्वच्छ करावें मंदिर ॥२॥
चंचल मन हें धरावे आवरून ॥
ध्यान धारणें स्थिर करावें ठायींच मन ॥३॥
गुरु कृपेनें शांति लाभतां स्थिर होईल मन ॥
अघतित घटना घडेल हरीकृपेनें ॥४॥
निजानंदे रंगुनी जातां अति समाधान ॥
हरिप्रेमें सुखमय झालें दासी - जीवन ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP