राग - खंबावती
चाल : विनवू किती किती कन्हया तुला ?

कां दया तुज येईना ॥
कां निष्ठुर केले मना ॥धृ॥
कुठे लोपली तुझी माया ॥
देवा येऊ दे माझी दया ॥१॥
तुज म्हणती दयाळू नाथ ॥
नको दूर लोटू ही अनाथ ॥२॥
देवा तूं अससी जग तारक ॥
मग ऐकना दासीची हाक ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP