अभंग ४
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - खमाज
( चाल : हे गोविन्द हे गोपाळ )
हे प्रभु दीनबंधु । हे कृष्ण देवराया ॥
दया नये का माझी तुम्हां ॥१॥
अंत किती पाहसी आतां ॥
दीन दयाळु म्हणवीतां ॥२॥
मनमोहना कृष्णनाथा ॥
झणी दे दर्शन अनाथ नाथा ॥३॥
तुजसाठी जीव व्याकुळला ॥
भेटुनी कृतार्थ करी दासीला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP