अभंग ५
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - मांडपहाडी
( चाल : दिलरुबा हा या जिवाचा )
धाव देवा धाव विठ्ठला ॥
या संकटसमयीं रक्षण्याला ॥धृ॥
कैसें कंठावें हें जीवन आतां ॥
तूंची देवराया सर्व जाणता ॥१॥
सती द्रौपदीच्या हकिसरसी ॥
कैसा धावलासी तूं हृषीकेशी ॥२॥
मग या दीन अबलेच्या हाकेसी ॥
काम न देवराया तूं येसी ॥३॥
सर्वस्व जीवन अर्पिलें तुजसी ॥
दयाळु देवा तूंची सर्व जाणसी ॥४॥
तारी वा मारी लज्जा रक्षी सर्वस्वीं ॥
साष्टांग नमन दासीचें चरणांसी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP