अभंग ३
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - गारा
( चाल : विठ्ठल तो आला )
या हो या हो विठ्ठला आतां भजना ॥
तुझ्याविण रंग येईना माझ्या भजना ॥धृ॥
मनोभावें भक्तिप्रेमें आळविते तुजला ॥१॥
जाणतोसी भावना, दयाळु दयाघना ॥२॥
नामयाच्या भजनीं देवा, कसा नाचु लागला ॥३॥
मी दीन दुबळी देवा, दासीवरी करी कृपा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP