प्रसंग तेरावा - खरें जाणतेंपण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आतां जाणता तो ऐका सांगेन । ज्याची बहु जाणीव विरे संपूर्ण । जैसी गोंवरी जळोनि होय निमग्न । त्याला साधुजन बोलिजे ॥७२॥
आतां शांतिक प्रबोधिक निवाला । तो सांगेन श्रोतीं पाहिजे ऐकिला । स्वयें आपल्यांत आपण निवाला । काष्टीं हुताशन जैसा ॥७३॥
काष्ठीं हुताशन निवडिला । तो काष्टाला मारून स्वयें मेला । तैसा पाहिजे सद्गुरु कृपेनें जाला । त्याला आयागमन नाहीं ॥७४॥
साधूला भोगीच त्याग तो कैसा । प्रचोनें सांगेन श्रोते परियेसा । देहविषयीं असोनि निराशा । पुढें दृष्टांत वोळखा ॥७५॥
अळंकार भूषणें मिरवे सती । गंधभोग पानें खाय जग प्रचीति । चवि रसनासुख ना वारे ती प्रति । चित्त दहनीं वेंचलेंसें ॥७६॥
प्रीतीचा भ्रतार निमाल्या नारी । अश्रुपातेंसी महा शोक करी । तयेला संबोखिती नगरनारी । प्रीतीचें तत्त्व तुटे ना ॥७७॥
अश्रुपातेंसी महा शब्द नादाळी । करित होती जनें संबोखिली बाळी । अंतरीं गुण आठवूनि तळमळी । तें वर्म जनास न कळे ॥७८॥
तदन्यायें अंतरीं साधूला तत्त्व बोधलें । तें अभाविकांस नाहीं कळों आलें । ज्याचें त्यास प्रेम गोड वाटलें । मुकियाला साखर जैसी ॥७९॥
जैसें तान्हेल्या बाळालागुन । विंचू झोंबिन्नला संपूर्ण । तंव माता मुखांमाजी घाली स्तन । त्याची वेदना नेणेचि ॥८०॥
जैसें खांडुक जालें असे मना । त्याचा फाड करूं नेणे वैद्यराणा । तैसीच आत्मबोधाची भावना । ज्याची तोची जाणे ॥८१॥
भ्रताराचा एकांत सुखसोहळा । पोखत्याला पुसती अबला । येरी म्हणती आम्हां ऐशा जाल्या । कळेल तुम्हांला ॥८२॥
जैसे उन्म त शब्दज्ञानी निगुरी । साधूसी खेटतील परोपरी । भावभक्ति सांडोनियां अघोरी । पाखांडा पातले ॥८३॥
दृष्टीस शेळीनें साप देखिला । वाचेनें सांगतां न ये आणिकाला । तैसा स्वयें तदाकार असे जाला । सोऽहं बोधाचा पैं ॥८४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP