प्रसंग तेरावा - हरिकंदार
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ऐका धरामर नांव थोर । कार्याचेंहि नांव हरिकंदार । तेथें काय हा अनाचार । पंडितीं अजापुत्र घातले ॥१०॥
आपणांस पंडित म्हणवणें । मद्यमांसाचें भक्षण करणें । जगत्रय ठकिलें भोंदू चांडाळपणें । मूर्ख हीन मूढमती ॥११॥
राग अहंकार कंटकाची थार । असे पंडितांच्या हृदयाभितर । कांदा चिरून उन्मत्त आचार । कंटक पाहारा म्हणती ॥१२॥
करीं सद्बुद्धीची घेऊनि सुरी । राग अहंकार कंटका पाहारी । मनाची कवळी पांचामधीं फेरी । मद सत्रावीचा सेऊनी ॥१३॥
आत्मज्ञानाचा स्तंभ स्थावरी । उन्मनिमाळा लावी त्यावरी । अनिर्वाच्य चौपद परोपरी । अनुहात सिंगी गर्जें ॥१४॥
स्वनंदाचें करुनि हरिकंदार । छत्तीस गण बैसवी चौफेर । विवेकें सोऽहं धर्म उच्चार । करी तो पंडित बोलिजे ॥१५॥
प्रेमबोधें वोसंडें तो पंडित । क्षमा दया शांतीसी गर्जत । स्वयें तरोनि आणिकांतें तारित । विश्र्वास निश्र्चय करी ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP