प्रसंग तेरावा - व्रतें तपें साधनें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


आपला आत्‍मा आपण वोळखणें । तरी कांहीं बाधूं न शकती बंधनें । नानापरीचीं तपें साधनें कार्यार्थाकारणें ॥३८॥
जळी वास केल्‍या होतें उद्धरण । तरी उदकांत जळचरें गहन । ती कां न होतींच पावन । नित्‍य आंघोळी करतां ॥३९॥
उभे राहो न म्‍हणविती ठाडेश्र्वरी । कस्‍तुर्‍या मृग उभा अद्यापवरी । टोणगाहि असे दुधाहारी । परी तो साधु न होय ॥४०॥
एक त्‍यजूनियां सुंदरा नारी । म्‍हणवी आम्‍ही बाळब्रह्मचारी । स्‍वप्नीं भूतांसी रमण करी । तें प्रायश्र्चित्त कैसें फिटे ॥४१॥
शिश्र्न दंडिल्‍या जोडे श्रीहरि । तरी खोजे सौरी कां न म्‍हणावे ब्रह्मचारी । पैल पाहा ते चकोर निराहारी । चंद्रामृत सेवी ॥४२॥
एक नग्‍न मोहन वस्त्रा हारी । श्र्वापदें नग्‍न मोहन वनांतरी । वस्त्रेंहीन ते फिरती अघोरी । त्‍यांला साधु म्‍हणों नये ॥४३॥
भुजंगानें पवन अभ्‍यास केला । तो कोडिभरी वरुषें वांचला । परी तो सत्‍पुरुष नाहीं जाला । तदन्यायें काळवंचना ॥४४॥
एक कंद फळें पाले आहारी । बरी मर्कटा पक्षांचीं कां न मनावी थोरी । नट कोल्‍हाटी बगड्या ध्यान धरी । त्‍या काय तपस्‍वी म्‍हणावें ॥४५॥
एक उडत गडत बुडत साधिती । मूषक गडत घारी अंतरिक्षीं उडती । वडवाघुळें अधोमुखें टांगती । तैसें जाणा धूम्रपान ॥४६॥
बुडत साधु म्‍हणविती थोर । जरी जळांत जळचरें अपार । अनेक चरांचर भूमीवर । सुखदुःख भोगिती ॥४७॥
आत्‍मज्ञानाविण अरण्यवास करणें । तेथें तरसा शूकरा खोकडा काय उणें । रक्षेंत अखंड उग्र असे सुनें । तरी तें काय योगी जाहले ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP