प्रसंग अकरावा - विटंबनेचें शरीर

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ज्‍याचा उन्मत्त करिती अभिलाष । ते आतां सांगितले उदास । कळो यावें सकळ श्रोत्‍यास गुह्य अनुक्रम त्‍यांचें ॥९८॥
शरीर तंव हीन हाडांची मोळी । रक्त मांसानें असे लिंपिली । वरी बुंथी घातली असे जाळी । चर्म रोमावळीची ॥९९॥
भीतरी मेंदु शेंबुड आणि गुद । गळे घाम उठतसे दुर्गंध । यावेगळें उठे खांडुक खंवद । नश्र्वर म्‍हणोनियां ॥१००॥
लवथवित गळतसे मांसाचा गोळा । आणिक वोळखा विष्‍ठेचा पेटाळा । हुतहुती जंत कृमींचा उबाळा । जठराभीतरी ॥१०१॥
शरीराची सांड मुत्राची मोरी । तिची लालुच जनास परोपरी । निशिदिनीं ध्याती अंतरीं अविचारी । जिवापासूनि अधिकपणें ॥१०२॥
जैसें या जनास योनीचें ध्यान । तैसा जरी आठवे श्रीहरि संपूर्ण । तरी हेळामात्रें चुके भ्रमण । साधिल्‍याविण साधे ॥१०३॥
ऐसें हे विटंबनेचें शरीर । त्‍यास म्‍हणती आम्‍ही पर्णिली सुंदर । वरी घालूनि भूषण अलंकार । विषयलंपट होती ॥१०४॥
जैसें शेणाचें केलें अमृतफळ । वरी चितार्‍याकडून मारिला हिंगुळ । तेचि वोरंगल्‍या दिसे अमंगळ । तदन्यायें कांता असे ॥१०५॥
तैसेंच नारीचें पालटल्‍यापण । मग देखोन झांकिती लोचन । म्‍हणती मरे ना हे अवलक्षण । हगवण खोकला पिडिली ॥१०६॥
ऐसें देखतां झकले अघोरी । अष्‍टहि अंगें पै जाले कामारी । हटवरें पाहातां नाठवे हरि । कामपिसेपणें उन्मत्त ॥१०७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP