प्रसंग अकरावा - यमयातना

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


अठ्ठाविसा योजनांचा कुंभिपाक । अनेक जाचणुका पिळिती चरक । खिस्‍ती कळंत्री मत्तद्रव्य अभिलाषिक । यांस घालिती तेथें ॥७५॥
तप्त धगधगीत तांब्‍याच्या भूमिका । कसाबा पारधी काबाडी आइका । सुवर्णचोर खाटिक अवगुणिका । लोळविती तेथें ॥७६॥
सुरापानी मच्छाहारी अभक्त । अविश्र्वासी करिती मनुष्‍यघात । त्‍यांस शिसें पाजुनी करवत । वोढिती माथांवरूनी ॥७७॥
वैद्य देवताभजक पंचाक्षरी । गर्भ खचवोनि पुरुषातें मारी । त्‍यांस सांडस लाविती परोपरी । गुरगुजें पिटोनियां ॥७८॥
मैंद नष्‍ट अभाविक पाखांडी । अन्याय नसतां आणिकातें दंडीं । लांचखोरपणें अधर्म मांडी । त्‍यांस खारूचे मार होती ॥७९॥
ज्‍वाळें तापली तांब्‍याची सुंदरी । तीस भेटविती जे भोगिती परनारी । हिंसक विधवांसी रमण करी । त्‍यांस कढई पाक ॥८०॥
ज्‍या परपुरुषीं लंपटा धांगडी । त्‍यांस तप्त खांब पोटाळविती परवडी । वरून यम करील झोडी । तापले तिखियाची ॥८१॥
चौर्‍यांशी लक्षीचा भोंवून फेरा । मग हे दुखे दाविशीं सर्वेश्र्वरा । यालागी नर नारी शुभ आचरा । ईश्र्वरी भजोनियां ॥८२॥
शेख महंमद म्‍हणे श्रोत्‍यालागुन । कोणी असत्‍य मानाल हें वचन । निष्‍कलंक आधी गीता पहा वाचून । माझ्यालागीं तुम्‍ही ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP