प्रसंग अकरावा - निष्कलंक प्रबोध
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ऐसें सांगतो हे सकळ उघडुनी । कोणी ऐकेत ना ग्रंथालागुनी । यालागीं थोडा दृष्टांत दाउनी । उन्मत्त सावध केले ॥८४॥
बहुत कुसरें भरलें हें जन । विरक्त थोडा कोणी साधु सज्जन । अमान्य करितील या ग्रंथालागुन ।ज्यांस गुरुकृपा नाहं ते ॥८५॥
ज्यांस असेल सद्गुरूचा विश्र्वास । तेचि आनंदतील या ग्रंथास । अति नष्ट हीन दोषी मूर्खास । द्वैत चढेल अज्ञानें ॥८६॥
देखोनि व्युप्तन्न कुशळ ज्ञानी । भ्रष्ट पाखांडी खांचती मनीं । परी भावें न लगती सद्गुरुभजनीं । सगुण गुण धरूनियां ॥८७॥
आतां असो हे ज्ञानाची निगुती । श्रोत्यांस सांगेन भेदाची प्रवृत्ति । ज्यांनी हें जन गोंविलें अधोगती । तें सांगों आरंभिलें ॥८८॥
पांच पंचवीसांची छत्तीस जालीं । छत्तिसांची सव्वाशे विस्तारिली । तें पुढें सांगेन वेगळाली । श्रोत्यांस बयाजवारें ॥८९॥
शेख महंमद म्हणे सद्गुरुराजा । मजला आज्ञा द्यावी संग्रामकाजा । हीं दैवतें भूतें मारीन वोजा । देहसंगें लागलीं जीं ॥९०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP