प्रसंग अकरावा - हरि व अल्‍ला एकच

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



मग सद्‌गुरु बोलती कृपादृष्‍टी । घ्‍यावी ब्रह्माविष्‍णुरुद्राची भेटी । परतोन करावा संग्राम सृष्‍टी । आपुलियांत आपण ॥९१॥
नाभीकार घेऊनि शिरावरी । देवतांची नांवे सांगतों परोपरी । तीं ऐकावीं सावध होऊनि क्षणभरी । संतश्रोतेजनीं ॥९२॥
देवतां नांवें सांगेन साक्षीकारणें । मग संग्राम करीन शूरत्‍वपणें । तें ऐकिलिया तुटतीं बंधनें । देह अभिमानाचीं ॥९३॥
आतां अल्‍ला म्‍हणा वो तुम्‍हीच वाचे । हरि म्‍हणतां तुमचें काय वेचें । हरि अल्‍ला न म्‍हणतील ते काचे । अघोरी जाणारे ॥९४॥
ऐका हरि अल्‍ला जरी दोन असते । तरी ते भांडभांडोच मरते । वोळखा कांही ठाव उरों न देते । येरून येराचा पैं ॥९५॥
पहा पहा दोन्हीं राजांचे लक्षण । द्वैतनष्‍टपणें लागलें भांडण । तैसें अविनाश परब्रह्म संपूर्ण । आद्य अद्वैतपणें ॥९६॥
अंगसंगें व्यापूनि असे श्रीहरि । त्‍यास मूढजन भावी दुरच्यादुरी । अभिलाषितील सोगया नारी । ते गोडी परियेसा पां ॥९७॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP