प्रसंग अकरावा - अद्वैत परब्रह्म
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
कोणी म्हणती याचें ज्ञान बरळलें । यानें हे अवघेच नमस्कारिले । सुष्ट दुष्ट नाहीं निवडिले। विवंचना करूनियां ॥८॥
समस्त ऐका विवंचना केली देवें । त्याचें गुह्य मज पउलें ठावें । कळलें जे सकळ नमस्कारवें । द्वैत प्रपंच सांडोनियां ॥९॥
श्रोते हो सांगतो उघड प्रचीती । तेणें उडेल द्वैत भ्रांत वित्पत्ति । कर्मनिष्ठ वैदिकांची अहंमती । मिथ्या दिसों लागली ॥१०॥
पहा विश्र्व पंचभूतें ठसावलें । वस्तूनें याति कुळ नांव पावलें । परी तें यातिनांवासारिखे नाहीं जालें । स्वरूप तें अतीत असे ॥११॥
श्र्वान शुकराचे देहीं अवधारा । पंचतत्त्व चित्त मन वस्तूचा थारा । नासत् पहावया चातुरा । ठाव रिता उरला नाहीं ॥१२॥
पांच तत्त्वांचा सहजें एकवटा । घडामोडीच्या होती खटपटा । परी वस्तु ते स्वयंभू चतुष्टा । अभिन्नत्व असे ॥१३॥
क्षीरसागरी रविबिंब भासे । निळेचे कुंडीं काय नाथिलें दिसें । तैसा तो परब्रह्म सम असे । सर्वांठायीं व्यापुनी ॥१४॥
स्वयें ते वस्तूस नमस्कार केला पाही । कुंडन्यायें अवगुणासी ठाव नाहीं । या गोहीनें कर्मिष्ठा निवांत राही । जाणीव सांडूनियां ॥१५॥
Last Updated : November 11, 2016
TOP