प्रसंग दहावा - बाळपण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐसी नव मास स्‍थूळबद खाणीं । तंव वेळ सायासें प्रसवली जननी । सोऽहं जप थोर स्‍वहिताची वाणी । विसरोनि गेलों असे ॥८७॥
माझ्या दोहीं मुष्‍टी गेल्‍या उघडोनि । जागा जागा विखरलें अन्न पाणी । तें मज भक्षणें लागे वेंचुनी । ऐसी मर्यादा तोंवरी ॥८८॥
सुइणीच्या पायावरी पालथा नाहे । विष्‍टा मुत्र चिवडितां रडे को त्रहे । कोणी हेडावती भोंवते पाहे । परदेश वाटोनियां ॥८९॥
मी दिवसें दिवस झके अविचारें । मज अंगीं भरे उन्मत्ताचें वारे । तेव्हां मज गांजिती सवाशें पोरें । आपुलालिये मतीनें ॥९०॥
मरों जाये तो मज न ये मरण । निजों जाय तों देखे अवलक्षण । जागृतीं जागतां झोंप लागे व्याहान । दुःखसुखासंगे मज ॥९१॥
एक वोढी मज मान्यतेलागून । तों एक शीघ्र करी अपमान । एक वनास पळवी जीव घेऊन । भय धरूनियां पोटीं ॥९२॥
एक मजला धनधान्य मागे । एक मज झोटिंग होऊनि लागे । एक मज स्त्री होऊनि भोगे । स्‍वप्नामाझारीं ॥९३॥
मज एक रडवी हांसवी । एक निर्लज्‍ज द्वारेंद्वार फिरवी । होऊं नेदिती स्‍वयें अनुभवी । निजात्‍म सुखाचा ॥९४॥
जे जे मजला झकवी जैसे । त्‍यामागें लागें तैसाच हरुषें । आपुलिया स्‍वहिताच्या विश्र्वासें । प्रवर्तेच ना कांहीं ॥९५॥
भवदुःख सांगतां भागलें वदन । कां करुणा न ये जी सद्‌गुरु विलक्षण । येरु म्‍हणे ऐकावें संपूर्ण । तेव्हांच म्‍हणितलें होतें ॥९६॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP