मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग दहावा| विषयेंद्रिये व अविद्या प्रसंग दहावा प्रसंग प्रशस्ति सद्गुरूची पृच्छा सद्गुरूची पृच्छा विषयेंद्रिये व अविद्या वृत्ति निरोध उपाय चंचळ मन कसें आवरावें? मन मुरडून दमन करणें उपाय भवयातना किंवा देहजाचणी प्रारब्धभोग तारुण्यावस्था-मदनपीडा वृद्धावस्था गर्भवास बाळपण सद्गुरुचा ‘ना-भी’ कार प्रसंग समाप्ति प्रसंग दहावा - विषयेंद्रिये व अविद्या श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत विषयेंद्रिये व अविद्या यांपासून मुक्ततेचे उपाय कोणते Translation - भाषांतर जैसा शेळका बोकड खेळती मुलें । एक लांडगा होऊनि घोळविलें । फेरी फिरतां चहूंकडे ताणिलें । एकाच पोरें ॥१०॥ऐसा शेळका बोकड शरीरीं । मांडिला छत्तीस पन्नास पोरीं । यावेगळीं विध्वाकरण कुमारी । सळिलें मातें स्वामिया ॥११॥कल्पना धांगडी मजला खुणावी । तों शीघ्र वासना परद्वार करवी । वीर्यें व्याकुळ चित्त जाजावी । वीर्य खळोनियां ॥१२॥रानश्र्वान भुंकत असें तोंडें । शरीरीं छिद्रें वाजती प्रचंडें । तैसें अंगभूतांनीं घेतले धेंडें । संवादा न मिळती ॥१३॥जैसा एक जंबुक भुंकी करी । अनेक जंबुक भुंकती परोपरी । तैसी मज घालमेल मेली थोरी । विषयभूतांनीं ॥१४॥निमिष्यें निमिष्याचें लक्षावें पळ । स्वरूपीं होऊं नेदीती निश्र्चळ । निशिदिनी करिती तळमळ । विषयलोभाची ॥१५॥ममता बोलवितसे बरवेंपण । तंव चिंता सत्ता करी अपमान । अविद्या चाळवूनि दाविती दूषण । लोकत्रयामध्यें ॥१६॥करितां देहाचें विविधपूर्वक कर्म । तों अधिक होतसे श्रम । कळों न येचि शुद्ध कर्म वर्म । आत्मतत्त्वाचें ॥१७॥आंघोळ करोनि बैसों जातों ध्यानीं । तो अनेक तरंग उमटती मनीं । इच्छेसी फिरे लिंगदेह कामिनी । चौर्यांशी सोंगें नटोनियां ॥१८॥जीवबुद्धिनें करितां साधन । तों अधिक चढें देहीं अभिमान । तेणें सकळ संचरें अवगुण । तिमिर कंदर्प पसरे ॥१९॥जैसा उदकीं तेलाचा थेंब पडे । तो चोपडे विस्तारे चहूंकडे । तैसे देहामाजी उठतील हुडे । अहंतकाचें ॥२०॥कांही न करितां साधी उपाधि । अविद्येच्या उठती नाना व्याधी । ऐसी सांगावी जी मजला बुद्धि । सद्गुरु कृपा करुनी ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP