प्रसंग दहावा - तारुण्यावस्था-मदनपीडा
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
मग आवरे ना मदनाचा उत । चंचळ पाहे जैसे लागलें भूत । निशिदिनीं स्थिर न राहे चित्त । वीर्य व्याकूळ पडे ॥६५॥
मज मदनाचे भरतें पंचविशी । कामबाण खडतरती दिननिशीं । उन्मते उमगी गंधर्व दासी । चवी सांडूनियां ॥६६॥
तेव्हां प्रालब्धें तिडका लागती । दुःखें कान नाक जाती गा श्रीपति । बांदखुरें फिरंगी माशा वारिती । ऐसी दुःखें विषयांचीं ॥६७॥
जो मदनें पिसाळला पापी । तो या सूर्याचांदण्यातें श्रापी । परद्वारालागीं घेतसे लिंपी । शुभ अशुभ नेणें ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP