मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग दहावा| प्रसंग प्रशस्ति प्रसंग दहावा प्रसंग प्रशस्ति सद्गुरूची पृच्छा सद्गुरूची पृच्छा विषयेंद्रिये व अविद्या वृत्ति निरोध उपाय चंचळ मन कसें आवरावें? मन मुरडून दमन करणें उपाय भवयातना किंवा देहजाचणी प्रारब्धभोग तारुण्यावस्था-मदनपीडा वृद्धावस्था गर्भवास बाळपण सद्गुरुचा ‘ना-भी’ कार प्रसंग समाप्ति प्रसंग दहावा - प्रसंग प्रशस्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रसंग प्रशस्ति Translation - भाषांतर ॐ नमोजी भाव भक्ति अक्षर ओळी । चरणबंध कवित्व प्रभावळी । नित्य निजानंद अक्षरें सोंवळीं । समाधान पावोनियां ॥१॥अहो जी धीर निष्कलंक सद्गुरु । पुरता परिसोनि माझा विचारु । मज सनाथ करुनी वेरझारु । चुकवावी माझी ॥२॥माझेंनि मुखें माझी भव यातना । ऐका जी सद्गुरु निजलोचना । तेणें तुमचिया समाधाना । निपजेल माया ॥३॥रंकास जालिया जुलुम जांचणी । ते आड पडावया धांवे दिवाणीं । तैसा माझा सोस तुमच्या चरणीं । चित्त मनसेंसी एकाग्र ॥४॥तंव सद्गुरूस आली महा करुणा । शम सम अवलोकी उदार राणा । शेख महंमद सांगे भवयातना । ते परियेसा स्वामी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP