मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग नववा| पतिव्रता प्रसंग नववा प्रसंग प्रशस्ति ईश्र्वरी कर्तृत्वांतील गुणदोष गुणदोषी कर्तृत्त्वहि कल्याणासाठींच सगुण-निर्गुण ‘माझें’ पणापासून वेगळेंपण जनाचें अवलक्षण चंचल-धांगडी पतिव्रता प्रसंग समाप्ति प्रसंग नववा - पतिव्रता श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत पतिव्रता Translation - भाषांतर आतां सांगेन पतिव्रतेचे गुण । शुभ आचार सांगती धांगडीलागून । वाचेस न ये ढवाळीचें वचन । हे पवित्र दीक्षा त्यांची ॥१०१॥वेश्या बसल्या त्यांचे शेजारीं । त्याहि पवित्र होतील विचारी । तुळसी सडे घालिती द्वारीं । ईश्र्वरीं भजोनियां ॥१०२॥पतिव्रता शुभाचारें निमाल्या । त्यांच्या नांवे चंचळा विकों लागल्या । कमळजा दमयंती चांगुणा अनुसुया सांगितल्या । दृष्टांतालागी ॥१०३॥बत्तीस लक्षणीं पतिव्रता पद्मिनी । नरनारायण जोडल्या लागुनी । तेथें मज निपज निर्गुण भजनीं सोऽहं लक्ष लागावी ॥१०४॥मज ऐसें चिंतिलें पाववी ईश्र्वरा । प्रेमबोधें भजन करीन दातारा । जाळीन अविद्येच्या अनाचारा । सद्गुरु स्वामी सेवूनियां ॥१०५॥हें इतुकें बोलतां वचनीं । अंतरीं हरुषली कृपा पद्मिनी । म्हणे ऐसा पुत्र व्हावा मजलागुनी । पुढती पुढती उद्वरावया ॥१०६॥घेऊनि नरा पद्मिनीचा आशिर्वाद । पुढतीं अवतरणीं करी प्रबोध । निर्गुणा नांवें सत् सिद्ध साधे । सगुण स्थूळ धरूनि ॥१०७॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP