प्रसंग नववा - प्रसंग प्रशस्‍ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ॐ नमो सुरंग निज गुज गोविंदा । तुवां सकळ गोंवून लाविला धंदा । म्‍हणऊन गोविंद विश्र्वकंदा । म्‍हणितलें तुजलागुनी ॥१॥
सर्व गोंऊन वेगळेपणें । सर्व चाळक सत्ता महिमानें करुनी अकर्तेपणाचीं विंदानें । कळोनि कळज्ञें नेदिसी ॥२॥
नवव्या प्रसंगाची नवलाव गोडी । ईश्र्वराचें कर्तृत्‍वीं काढिली खोडी । सद्‌गुरुकृपेनें आत्‍मज्ञान जोडी । शेख महंमदा जालिया ॥३॥
शेख महंमद म्‍हणे जगदात्‍मा । पूर्ण पुरता म्‍हणविशीं विश्र्वकर्मा । परी दुबळा देखलासी परब्रह्मा । तें सांगतों परियेसी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP