प्रसंग नववा - ‘माझें’ पणापासून वेगळेंपण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


घृताची चवी साखरेची गोडी । ऐसी वेगळी परवडी निवडी । मग षड्रसी फिकी वेलाडी । लागल्‍याविण लागे ॥७२॥
शुच सुवर्णाचा तेजाकार । निवडोन केला असे भांगार । लेऊनियां स्‍थळेंविण सुंदर । मिरविणार मिरवित ॥७३॥
देह असोनि वेगळेपणा । जैसी आपली छाया न दिसे आपणा । दिसे उदकामाजी वेगळेपणा । अलिप्तपणें असें ॥७४॥
नभास तेजाची गवसणी घालून । महीस केलें वायूचें पांघरूण । वरी स्‍थूळेंविण निज शयन । करूनि अकर्ता असे ॥७५॥
मिरवीन मजपण अवधारा । मायबापाविण जाणें माहेरा । चरणेंविण रवि शशि तारा । जैसे फिरत असे ॥७६॥
अंतराळेंविण न उडतां उडणें । उदकाविण न बुडतां बुडणें । दृश्य द्वैतपणें दुःखातें ग्रासणें । मुख मुखेंविण ॥७७॥
वीर्य खळल्‍यासिण खळणें । विषयें इंद्रियाविण सुख घेणें । मरण आल्‍याविण जालें मरणें । त्‍या ठायाविण ठायीं ॥७८॥
जना विजनाविण वस्‍ति असे । सकळ कोंदोन बिंबाविण प्रकाशें । आशे निराशे वेगळे परमहंसे । हंसेविण हंसे ॥७९॥
माझी पुजा मी मजविण करिता । मी गंधधूपपुष्‍पाविण तत्त्वतां । माझें स्‍तवन मी मजविण करितां । अहं सोडूनियां ॥८०॥
ऐसा स्‍वयें मी माझेपणा वेगळा । बोलूनि अबोलता अरूपीं लीला । तो सद्‌गुरुनें वदन कमळा । निवडूनि धरियेलें ॥८१॥
हृदयीं वदनीं म्‍हणितलें आकारें । म्‍हणती नको उद्‌बोधूं गुह्यात्‍कारें । आतां बोलावें तुवां परउपकारें । जनाचें वेडेपण ॥८२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP