प्रसंग नववा - गुणदोषी कर्तृत्त्वहि कल्‍याणासाठींच

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ईश्र्वरें निजप्रेमाचा लांध दिधला । भक्तिपूर्वक शिरीं घेतला । आहिक्‍यीं द्वैतपणाचा छेद जाला । तन्मय तदाकार ॥४२॥
स्‍वयें ईश्र्वर आपुली लीळा बोलती । म्‍यां विश्र्वास कळा नाहीं दिधला पुरती । आपुलाले ठायीं सत्ता भाविती । मजला विसरोनियां ॥४३॥
निर्गुण म्‍हणे आहिक्‍यें सायेकी । मज माझें कर्तृत्‍वीं काढिली चुकी । चुकलों नाहीं आहिक्‍यें सायेकीं । थोड्यांत बहुमतांचीं ॥४४॥
एका दहा गुणीं केला अपुरता । एक विसा गुणीं केला अपुरता । एकाहूनि एक केला चढता । गर्व भाजावयालागीं ॥४५॥
जो भावभक्तीनें केला पुरता । त्‍यासी भाग्‍य नाहीं दिधलें तत्त्वतां । भाग्‍य देतां होईल पूर्ण पूरता । पवित्र भजोनियां ॥४६॥
पवित्रांस देतां धनधान्य संपत्ति । ते अवघे धर्म आत्‍माच करिती । नरिये यमपुरी पडेल रिती । यालागी शुभअशुभ केलें ॥४७॥
मागें कृत त्रेत द्वापार युगें । नरिये यमपुरी नव्हती सवेगें । कलियुगीं धाडिलीं लागवेगें । पापरूपें आचारितां ॥४८॥
रात्रंदिवस पासाव सात वार । रवि सोम मंगळ बुध गुरुवार । शुक्र शनि आठवा निरंतर । गुप्त ईश्र्वर गुह्यें ॥४९॥
ऐसे सात वार सत्तावीस नक्षत्रें । पंधरा तिथीसीं फिरती फेरे । बारा राशी बारा महिने शास्त्रें । अनुमाना आणिली ॥५०॥
अनुमानेसी नाहीं ईश्र्वरकरणी । वेदे अनुमाना आणिलें दाटुनी । जैसे आकाश घटी मापिलें मापुनी । परी तें अमूप असे ॥५१॥
ती वारुषीं धोंड्याचा महिना चढे। तैसे कृत त्रेत द्वापारीं पुण्य वाढे । कलियुगीं पुण्य जालिया पाप जोडे। तैसी निद्रा ग्रासी जागृतीं ॥५२॥
ऐसे असंख्यात बुडाले बुडतील । कलियुग बुडावयाचें साल । पापें होतील नानापरीचीं नवल । जी वाचेसी न यावीं ॥५३॥
ऐसी कलियुगें असंख्यात बुडालीं । कृत त्रेत द्वापार असंख्यात आलीं । ईश्र्वर म्‍हणे माझी म्‍या संहारिली । क्षेत्राचें अंतकाळीं ॥५४॥
ऐकोनि प्रतिवचन परमेश्र्वरा । शेख महंमद देतां जाला अवधारा । ऐके निज नाटका सर्वेश्र्वरा । सांगतों तुझें तुज कर्तव्य ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP