अप्रकाशित कविता - देवाच्या द्वारीं
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[अभङग]
आलों देवाचिया द्वारीं
हाच शेवटीं कैवारी
ज्याला नको हा आधार
त्यानें वर्जावें हें दार
पैके पदव्यांच्या साठी
घ्याव्या जनांचिया गाठी
तसें नाही माझें काज
नको भक्तीची या लाज
गाभार्यांत लखलखाट
पूजा शृङगाराचा थाट
पडे सौन्दर्याची झड
देवदर्शन न धड
सुखें हिण्डतों बाहेर
येथे शान्तीचें माहेर
प्रदक्षिणा देवळास
घालितों मी सावकाश
प्रदक्षिणा देऊळाची
होय देवाचीही साची
भव्य देवळाशेजारीं
नर लघुतेतें वरी
लघुतेंत मिळे बळ
समाधानही केवळ
पडे बेताचें चान्दणें
कोण अमुक हा म्हणे ?
देवळात्त्या जातां भोती
चित्रितों मी माझ्या मनीं
नित्य कष्टतांना जनीं
प्रेमें करितां प्रपञ्च
व्हावा भक्तीचाही सन्च
घडो घडो लोकसेवा
हेंचि दान देगा देवा !
२४ नोव्हेम्बर १९३६
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP