मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित असंग्रहीत कविता|अप्रकाशित कविता| कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीं १२ वाजतां अप्रकाशित कविता आता काय देवा वदूं नैराश्याचें गीत चन्द्रास सुखास आता मिती नसे ग निनावी पक्षी माझें प्रेम समुद्र मी आणि माझी आऊ To My Mother खळखळ जसा ओढा To T. R. नयनां न दिसो, दिसो रवि बहुत हट्ट करूनि पदोपदीं ताई, कां रडतेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीं १२ वाजतां प्रणयचञ्चले प्रणयीं तव बद्ध जाहलों सन्मित्रांनो, हे गुलाबी फुलांनो ? एक शोकपर्यवसायी नाटक अभङग देवाच्या द्वारीं कणिका वाटे तुझ्यापाशी धावतच जावें अप्रकाशित कविता - कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीं १२ वाजतां डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीं १२ वाजतां Translation - भाषांतर [वियोगिनी वृत्त]सखये, किति शुभ्र चन्द्रिका !तनुची कान्ति तुझ्या जशी असे,सखये, किति वायु शीतल !सुखद स्पर्श तुझा जसा गमे ! १मधु वायु सुमन्द वाहतो,स्थिर हे वृक्ष तथापि राहती,विहरे जरि तेज सारखें,तव डोळे स्थिर, शान्त मोहक. २पडती बघ तारका फिक्या,अतर स्त्री तुझियापुढे जशा;खुलवी परि चन्द्रिकेस ती,तुज हो ती जशि भूषणावह. ३फुलतात हळूहळू फुलें,खुलताहेत जसे तुझे गुण;थकली दुनिया, व झोंपलीजशि चिन्ता तुझिया मनीं प्रिये ! ४किरणें रमतात अन्दुचींतव भावी स्थितिचे विचार ते !चढते वर लाट सागरीं,प्रणयौत्सुक्य तरङग हृत्सरीं. ५सखये, परि चन्द्र चन्द्रिकान कधी दूर; परन्तु दूर तूमजपासुन मैल तीनशें -स्मृति ही आणि वियोग दु:खद ! ६३ ऑक्टोबर १९१४ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP