अप्रकाशित कविता - प्रणयीं तव बद्ध जाहलों

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[वृत्त वियोगिनी : सखये, रजनी तुझ्यासम०]

प्रणयीं तव बद्ध जाहलों समयीं त्या गमलीस देवता;
दिसशी न परी अता तशी - सखये, हाय ! कसा प्रसङग हा ! १

किति दु:खद हो विचार हा - दगडी मूर्तिच पूजिली सदा;
नव्हती, दिसली जशी, तशी; कळुनी मागुनि काय फायदा ? २

मजला नहि शक्य यापुढे करणें प्रेम कुणा दुज्यावरी;
समजे, नुमजे परी तया, मन घे धांव पुन्हा तुझ्याकडे. ३

दगडासहि, थोर बोलती, कधि ये देवपणा खरोखरी;
मज आस तशीच. होशिल हृदयस्वामिनि, तूहि देवता. ४

नयनीं पुरतें न पाहिलें, दिल हो तोंच तुझ्यावरी फिदा;
कितिदा वदलीस की ‘नको’ परि आता परतेल काय ? छे ! ५

धरिलें तुज ऐकदा, अता सुख का दु:ख नसे विचार हा;
निकरावर गोष्ट ठेपली पुढती मीलन का वियोग हा ६

रजनी असुनीहि काजळी ग्रह तारे नच सोडिती तिला;
अतुकेंच नव्हे, प्रमोदित करिती हांसुनि हांसुनी तिला. ७

न गुलाब कधी त्यजी तरू जरि कांटे असती अथे तिथे,
अधिकाधिक भूषवूनि त्या, जनचित्ता वळवी तयाकडे. ८

दिसले तुझियामधे सखे, मजला दोष जरी, तरी त्यजूं ?
नहि शक्य मला अगोदर, नहि अच्छा लवही मनामधे. ९

जरि श्यामल शून्यभाव तू दिसशीं आज तरी तुला कधी
करणार सतेज सुन्दर अचल प्रेमरची प्रेमरवी मदीय गे ! १०

२८ नोव्हेम्बर १९१४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP